Collector Rajan Jayakar will be putting on show memorabilia from the late actor Shammi Kapoor’s films. His collection includes posters, movie stills, song books (containing information about the recording, as well as lyrics in Hindu and Urdu) and lobby cards (publicity material that was displayed in the foyers of cinema halls) from the 58 films in which Kapoor starred as a hero. Fans can reminisce about the “Yahoo” charmer at the exhibition aptly named Tum Mujhe Yun Bhula Na Paoge.
9-22 October, 10.15am-6pm. Curator’s Gallery, Chhatrapati Shivaji Maharaj Vastu Sangrahalaya, MG Road, Kala Ghoda, Colaba (22844519).
Source - Mint Planner
Saturday, October 8, 2011
Thursday, October 6, 2011
दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा!
झेंडूचे तोरण आज लावा दारी
सुखाचे किरण येऊ द्या घरी
पूर्ण होऊ देत तुमच्या सार्या इच्छा
विजयादशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा :-0

मस्तीकी पाठशाला
शाळेत जायचं होतं म्हणून की काय कोणास ठाऊक पण आज सकाळी अलार्म न लावताच लवकर जाग आली. सगळं आवरेपर्यंत ९ वाजलेच. अर्ध्या वाटेवर होते आणि मैत्रिणीचा फ़ोन ’कुठपर्यंत पोचलीस?’. ती बिचारी १० मिनिटांपासून ठरलेल्या ठिकाणी वाट पहात होती. तिथे पोचले तेव्हा एक हिरवंचुटुक आपट्याचं पान तिने हातात ठेवलं. मी इतकी गडबडीत आलेले की माझ्याजवळ तिला द्यायला पानच नव्हतं. :-(
दोघी शाळेजवळ पोचलो तेव्हा बाहेर हीsss गर्दी. ’बरं झालं बाई आपण दुसरीकडे भेटलो. तू म्हणालीस तसं इथे एकमेकींना शोधताच आलं नसतं". आत शिरलो तेव्हा प्रवेशद्वाराजवळच ’सुस्वागतम’ सोबत दसयाच्या शुभेच्छा देणारी रांगोळी पाहून मन एकदम अनेक वर्षं मागे मागे गेलं. इथेच फ़ळ्यावर दरवर्षी वार्षिक परिक्षेत पहिला क्रमांक मिळवलेल्यांची नावं झळकत असायची. आणि तिथे आपलं नाव नाही म्हटलं की आभाळ कोसळल्यासारखं वाटायचं.

जिन्याने वर जाताना दोन्ही बाजूंना भिंतीवर शाळेतल्या मुलांनी काढलेली चित्रं पाहून मजा वाटली. गंमत म्हणून मी फ़ोटोही काढले.

एका मजल्यावर एक रिकामा वर्ग बहुतेक विद्यार्थ्यांना फ़ोटो काढायला मोकळा ठेवला होता. तिथे बाकांवर बसून फ़ोटो काढायची नुस्ती झुंबड उडाली होती. आम्हीही एकमेकींचे फ़ोटो काढले. मजा म्हणजे तेव्हा मोठे वाटणारे वर्ग आता किती छोटे वाटत होते. मागच्या वर्षी माझ्या मित्राबरोबर आले होते तेव्हा आम्ही दोघं हेच बोललो होतो आणि त्याची बायको म्हणाली होती की वर्ग छोटे झाले नाहीत, आपण मोठे झालोय. खरं आहे. मला तर शाळेतून बाहेर पडून इतकी वर्षं झाली आहेत ह्यावर विश्वासच बसत नव्हता. असं वाटत होतं की कालपरवाच बाहेर पड्लेय.
एव्हाना शाळेच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर पोचलो होतो. रसायनशास्त्राची प्रयोगशाळा बंद होती. काचेतूनच आत पाहून घेतलं. वरती शिवणाच्या खोलीकडे जाणारा रस्ता पाहून ’इथे शिवणाची खोली होती नाही?’ असं एकदम म्हणून दोघी एकदम हसलो. मग खालच्या मजल्यावर आलो. कॆन्टिनमध्ये गर्दी होतीच पण आत घुसता आलं. चक्क वडे आणि सामोसे दोन्ही दिसले. ते बांधून घेताना देवाचा प्रसाद मिळाल्यासारखे भाव होते दोघींच्या चेहेयावर.
मजल्याला असलेल्या गॆलरीतून खाली वाकून पाहिलं आणि ’आपल्या वेळेला बैठ्या इमारती होत्या नाही’ असं म्हणालो तेव्हा जाणवलं की बरीच वर्षं उलटून गेली आहेत. हॉल बंद होता पण ग्रीलच्या दरवाज्यातून पाहून श्री शांतादुर्गेचा फ़ोटॊ दिसतो का ते पहायचा मोह आवरला नाही. पुन्हा खाली येताना एका बंद असलेल्या कॉरिडोरमध्ये गेलो तेव्हा तिथे काम करत असलेला शिपाई ओरडला ’ए, तिथे जायचं नाही.’ आम्ही दोघी हसतच सुटलो. ’बघ, आपण किती तरुण दिसतो ह्याचा पुरावा मिळाला आज’ माझी मैत्रिण म्हणाली. एकदम पुन्हा शाळेत असल्यासारख वाटलं.

खाली आलो तेव्हा जनता दिसेल त्या वस्तूंचे फ़ोटो काढत होती. शेजारच्या फ़ळ्यावर द्सयाचं महत्त्व विशद करून सांगितलं होतं. मी फ़ोटो काढला तेव्हा आत कुठेतरी गलबललं.
शाळेतून पास होऊन बाहेर पडल्यावर कधीच परत जावंसं वाटलं नव्हतं. आठवी ते दहावी शाळेच्या सराव वर्गांत प्रवेश न घेता खाजगी क्लासेस लावल्यामुळे एका शि़क्षकांनी उभा दावा मांडला होता. आणि त्याचं खापर मी शाळेवर फोडलं होतं. तो कडवटपणा कित्येक वर्षं मनात होता. पुढे कधीतरी लक्षात आलं की ह्यात शाळेची काहीच चूक नव्हती. ह्या वास्तूने मला खूप काही दिलं. शाळेतून बाहेर पडल्यावर काही वर्षांत दसर्याला शाळेत गेले असते तर काही शिक्षक-शिक्षिका भेटलेही असते. पण आता त्यांच्या नुसत्या आठवणी आहेत - एक्स्ट्रा पिरियडला भुताची गोष्ट सांगणार्या परळकर बाई, शामाताई, एखाद्या पुस्तकाचं नाव सांगून 'तुम्ही वाचलं नसेलच' अशी खवचट कमेन्ट मारणार्या पण तसं करतानाच आम्हाला मराठी साहित्यातलं आणि आयुष्यातलं बरंच काही शिकवणार्या चौबळ बाई, शास्त्राचे विषय सोपे करून शिकवणार्या चौधरी बाई, इंग्लिशशी तोंडओळख करून देणाया भटबाई, चित्रकला शिकवणारे राजाध्यक्ष सर, दर नवरात्रात 'उदो उदो ग उदो उदो, आई अंबेचा उदो उदो' गाणार्या कुसुमताई....किती नावं आठवणार? असे शिक्षक मिळाले हे आमचं भाग्य होतं. तेव्हा लक्षात नाही आलं. आता कळतंय. ते काय म्हणतात ना - एखाद्या वस्तूची किंमत ती मिळेपर्यंत आणि व्यक्तीची किंमत ती निघून गेल्यावर. :-(
ती किंमत आता कळतेय. बाहेर पडलो तेव्हा बाहेरून शाळेचा एक फोटो काढायचा मोह आवरला नाहीच.

पुढल्या वर्षी नक्की येईन हं असं त्या वास्तूला सांगून मी निघाले. बाजूला एक मुलगा फोनवर बोलत चालला होता 'अरे, सोडताहेत आत. तू ये लवकर'. आज सगळ्या बालमोहनकरांची पावलं इथेच वळणार होती तर - मस्तीकी पाठशाला जिथे आहे तिथे. :-)
दोघी शाळेजवळ पोचलो तेव्हा बाहेर हीsss गर्दी. ’बरं झालं बाई आपण दुसरीकडे भेटलो. तू म्हणालीस तसं इथे एकमेकींना शोधताच आलं नसतं". आत शिरलो तेव्हा प्रवेशद्वाराजवळच ’सुस्वागतम’ सोबत दसयाच्या शुभेच्छा देणारी रांगोळी पाहून मन एकदम अनेक वर्षं मागे मागे गेलं. इथेच फ़ळ्यावर दरवर्षी वार्षिक परिक्षेत पहिला क्रमांक मिळवलेल्यांची नावं झळकत असायची. आणि तिथे आपलं नाव नाही म्हटलं की आभाळ कोसळल्यासारखं वाटायचं.

जिन्याने वर जाताना दोन्ही बाजूंना भिंतीवर शाळेतल्या मुलांनी काढलेली चित्रं पाहून मजा वाटली. गंमत म्हणून मी फ़ोटोही काढले.

एका मजल्यावर एक रिकामा वर्ग बहुतेक विद्यार्थ्यांना फ़ोटो काढायला मोकळा ठेवला होता. तिथे बाकांवर बसून फ़ोटो काढायची नुस्ती झुंबड उडाली होती. आम्हीही एकमेकींचे फ़ोटो काढले. मजा म्हणजे तेव्हा मोठे वाटणारे वर्ग आता किती छोटे वाटत होते. मागच्या वर्षी माझ्या मित्राबरोबर आले होते तेव्हा आम्ही दोघं हेच बोललो होतो आणि त्याची बायको म्हणाली होती की वर्ग छोटे झाले नाहीत, आपण मोठे झालोय. खरं आहे. मला तर शाळेतून बाहेर पडून इतकी वर्षं झाली आहेत ह्यावर विश्वासच बसत नव्हता. असं वाटत होतं की कालपरवाच बाहेर पड्लेय.
एव्हाना शाळेच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर पोचलो होतो. रसायनशास्त्राची प्रयोगशाळा बंद होती. काचेतूनच आत पाहून घेतलं. वरती शिवणाच्या खोलीकडे जाणारा रस्ता पाहून ’इथे शिवणाची खोली होती नाही?’ असं एकदम म्हणून दोघी एकदम हसलो. मग खालच्या मजल्यावर आलो. कॆन्टिनमध्ये गर्दी होतीच पण आत घुसता आलं. चक्क वडे आणि सामोसे दोन्ही दिसले. ते बांधून घेताना देवाचा प्रसाद मिळाल्यासारखे भाव होते दोघींच्या चेहेयावर.
मजल्याला असलेल्या गॆलरीतून खाली वाकून पाहिलं आणि ’आपल्या वेळेला बैठ्या इमारती होत्या नाही’ असं म्हणालो तेव्हा जाणवलं की बरीच वर्षं उलटून गेली आहेत. हॉल बंद होता पण ग्रीलच्या दरवाज्यातून पाहून श्री शांतादुर्गेचा फ़ोटॊ दिसतो का ते पहायचा मोह आवरला नाही. पुन्हा खाली येताना एका बंद असलेल्या कॉरिडोरमध्ये गेलो तेव्हा तिथे काम करत असलेला शिपाई ओरडला ’ए, तिथे जायचं नाही.’ आम्ही दोघी हसतच सुटलो. ’बघ, आपण किती तरुण दिसतो ह्याचा पुरावा मिळाला आज’ माझी मैत्रिण म्हणाली. एकदम पुन्हा शाळेत असल्यासारख वाटलं.

खाली आलो तेव्हा जनता दिसेल त्या वस्तूंचे फ़ोटो काढत होती. शेजारच्या फ़ळ्यावर द्सयाचं महत्त्व विशद करून सांगितलं होतं. मी फ़ोटो काढला तेव्हा आत कुठेतरी गलबललं.
शाळेतून पास होऊन बाहेर पडल्यावर कधीच परत जावंसं वाटलं नव्हतं. आठवी ते दहावी शाळेच्या सराव वर्गांत प्रवेश न घेता खाजगी क्लासेस लावल्यामुळे एका शि़क्षकांनी उभा दावा मांडला होता. आणि त्याचं खापर मी शाळेवर फोडलं होतं. तो कडवटपणा कित्येक वर्षं मनात होता. पुढे कधीतरी लक्षात आलं की ह्यात शाळेची काहीच चूक नव्हती. ह्या वास्तूने मला खूप काही दिलं. शाळेतून बाहेर पडल्यावर काही वर्षांत दसर्याला शाळेत गेले असते तर काही शिक्षक-शिक्षिका भेटलेही असते. पण आता त्यांच्या नुसत्या आठवणी आहेत - एक्स्ट्रा पिरियडला भुताची गोष्ट सांगणार्या परळकर बाई, शामाताई, एखाद्या पुस्तकाचं नाव सांगून 'तुम्ही वाचलं नसेलच' अशी खवचट कमेन्ट मारणार्या पण तसं करतानाच आम्हाला मराठी साहित्यातलं आणि आयुष्यातलं बरंच काही शिकवणार्या चौबळ बाई, शास्त्राचे विषय सोपे करून शिकवणार्या चौधरी बाई, इंग्लिशशी तोंडओळख करून देणाया भटबाई, चित्रकला शिकवणारे राजाध्यक्ष सर, दर नवरात्रात 'उदो उदो ग उदो उदो, आई अंबेचा उदो उदो' गाणार्या कुसुमताई....किती नावं आठवणार? असे शिक्षक मिळाले हे आमचं भाग्य होतं. तेव्हा लक्षात नाही आलं. आता कळतंय. ते काय म्हणतात ना - एखाद्या वस्तूची किंमत ती मिळेपर्यंत आणि व्यक्तीची किंमत ती निघून गेल्यावर. :-(ती किंमत आता कळतेय. बाहेर पडलो तेव्हा बाहेरून शाळेचा एक फोटो काढायचा मोह आवरला नाहीच.

पुढल्या वर्षी नक्की येईन हं असं त्या वास्तूला सांगून मी निघाले. बाजूला एक मुलगा फोनवर बोलत चालला होता 'अरे, सोडताहेत आत. तू ये लवकर'. आज सगळ्या बालमोहनकरांची पावलं इथेच वळणार होती तर - मस्तीकी पाठशाला जिथे आहे तिथे. :-)
Tuesday, October 4, 2011
आज एका ब्लॊगवर कोणीतरी हाताने लिहिलेल्या मजकूराची इमेज पोस्ट केलेली पाहिली आणि वाटलं की खरंच माझं हाताने लिहिणं आता किती कमी होत चाललंय - टीव्हीवरचे कुकरी शोज पहाताना रेसिपीज लिहून घेण्यापुरतं. हे शोजसुध्दा बयाचदा इंग्लिशमध्ये असतात. त्यामुळे मराठी हाताने लिहिणं फ़ारसं होतच नाही. काही दिवसांपूर्वी झी मराठीच्या खवय्येत एक बयापैकी दिसणारी रेसिपी बघून टिपून ठेवायला गेले आणि माझंच अक्षर पाहून मलाच धक्का बसला. अक्षरांवर आडवी रेघ ओढायलाही आळस येत होता. ’स्वयम लिखति, स्वयमपि न वाचयति’ का काय म्हणतात तशातली गत. काही दिवसांनी पाहिलं तर माझं मलाच वाचता यायचं नाही कदाचित.
शाळेच्या दिवसात हस्ताक्षर चांगलं असणं हे कॊलर टाईट करायची गोष्ट होती. आम्हा बालमोहनच्या मुलांना तर वाईट हस्ताक्षर म्हणजे पापच वाटायचं. मराठीचा पेपर लिहायचा तर पहिल्या पानापासून शेवटच्या शब्दापर्यंत अक्षर बिघडता कामा नये हा कटाक्ष असायचा. आणि माझं हे आता असं झालंय. :-(
पूर्वी शनिवारी सकाळी शाळेत असायचं तसं आता शुध्दलेखन सुरु करायला हवं असं मनात आलं मात्र आणि हसायला आलं. कुठून काढायचा त्यासाठी वेळ? शाळा सोडून इतकी वर्ष झाली पण संस्कृतचा अभ्यास पुन्हा काही सुरु करता आला नाही. परवा आयडियलच्या जवळच गेले होते पण संस्कृतचं पुस्तक आणायचं सुचलं नाही. कसं सुचेल? त्यासाठी मनाचा निश्चय हवा ना? कधी काढणार ह्या जिव्हाळ्याच्या गोष्टींसाठी वेळ? साठी उलटल्यावर? तेव्हढं उत्तर असेल तर सांगा बुवा.
शाळेवरून आठवलं, दसयाला जायचंय की शाळेत. एका मैत्रिणीला तयार केलंय त्यासाठी. तसं मागच्याच वर्षी एक मित्र आणि त्याची बायको अमेरिकेहून आले होते तेव्हा गेले होते. पूर्वीच्या बयाच खुणा नाहियेत आता. पण प्रार्थनेचा हॊल होता तस्साच वाटला. दसयाला जाऊन देवीचं दर्शन घेऊन येते आणि बघते ह्यावर्षी तरी कॆन्टीनमध्ये सामोसे मिळतात का ते. काही वर्षांपूर्वी गेले होते तर नुसते बटाटेवडेच मिळाले होते.
निदान शाळेच्या दिवसांची थोडीतरी चव ह्या निमित्ताने परत मिळेल :-)

I had recovered from the episode of the malfunctioning ATM to the extent of venturing to go to another location to get some cash this weekend. A lady was already using the machine and there was a gentleman standing outside the door. I joined the queue.
Five minutes passed, then ten but the lady was showing no signs of concluding her transactions. From where I was standing, I could see her inserting the card multiple times and then fumbling in her purse. Just what in the name of God is going on? Is she withdrawing money for all her friends and neighbors?
Just when I was wondering why the attendant at the ATM in question (who was waiting inside against all rules) wasn't telling her to get a move on, he said something to her. The lady stole a glance outside and smiled sheepishly.
Still, it was another 5 minutes before she came out. Now it was the turn of the gentleman who was standing ahead of me. I prayed that he would be quick. No such luck, however! He seemed equally determined to take his own sweet time. Don't these people have anything else to do? What exactly do they do for so long at the ATM? If you have to withdraw cash and remember your pin, it happens almost in a jiffy, isn't it?
I was so mad I was having thoughts of breaking the door open the way it is done in Hindi movies. I was trying very hard to glare at the attendant - almost willing him to ask the gentleman to be quick. He eventually did just that. But to my dismay, the gentleman remained inside the room which was against the rules as well.
I so wanted to give him the piece of my mind. But fortunately for him, I was late for an appointment. So I gave him a sinister look, got my money and stormed out.
I seriously feel that the banks should think about having separate ATMs for 2 sets of users - the way the supermarkets have express lanes for 10 items or less. One, for those who want to only withdraw cash and/or print statements. And two, for those who want to use the ATM to apply for an FD, pay utility or credit card bills, feed their dog, divorce their spouse or save the world!
As for me, I have decided to go visit the brick-and-mortar structure for withdrawing my hard-earned money henceforth. If it 's not cost-efficient for the bank, to hell with it!

Subscribe to:
Posts (Atom)