'मुशाफिरी' हा २०१८ चा मी वाचायला घेतलेला तिसरा दिवाळी अंक. भटकंतीला वाहिलेले अंक माझ्या नेहमीच आवडीचे राहिले आहेत. आपल्याला सगळीकडे जायला जमणार नाही. मग लेख वाचून तिथे जाण्याचा आनंद आणि अनुभव दोन्ही मिळवता येतात. हो की नाही?
पहिलाच लेख 'रूपकुंड' वर पाहुन मस्त वाटलं. नुसतं बेस कॅम्पपर्यन्त जायचं तरी काय दिव्य करावं लागतं ते ह्या लेखातून चांगलंच समजलं. हे दिव्य करणाऱ्या लेखक असीम आव्हाड ह्यांना मनापासून दाद गेली. पुढला लेख म्यानमारवरचा. हां आपला शेजारी देश. मध्यंतरी रोहिंग्या मुस्लिमांच्या वादामुळे बराच गाजलेला. त्यापलीकडे त्याची फारशी माहिती नव्हती ती आतिवास सविता ह्यांच्या ह्या लेखामुळे झाली। काळ्या मानेच्या क्रौंच पक्षाच्या शोधमोहिमेवरचा श्री. द. महाजन ह्यांचा लेख, 'माणसं असलेल्या परग्रहावर' हां आईसलंडवरचा प्रकाश दिवाकर ह्यांचा लेख, 'सुई - दोरा ट्रेकची कहाणी ' (नचिकेत जोशी), पनामा कालव्यावऱचा जयप्रकाश प्रधान ह्यांचा लेख, राजस्थानमधल्या ऑफ़ -बीट ठिकाणांबद्दल माहिती देणारा आशिष महाबळ ह्यांचा लेख, यशोदा वाकणकरांचा मोरावरचा लेख, केरलवरचा स्मिता जोगलेकर ह्यांचा लेख खुपआवडले. नेहा घाटपांडेचा 'अवेळी पावसातलं कान्हा' वाचून आपणही पावसाळ्यात एखादं जंगल पहावं ऐसा नवा आयटम टूडु लिस्ट मध्ये जमा झालाय. बघू 'कायनात' कधी कृपा करते ते. ट्रेन हां अति-जिव्हाळ्याचा विषय असल्याने विनय खण्डागळे ह्यांचा भुसावल-दिल्ली प्रवासावरचा लेख जाम आवडला. दूसरा जिवलग विषय म्हणजे खाणं। जुई जोशींचा 'पूर्णब्रह्माशी गळाभेट' आणि पदमनाथ डुंबरे ह्यांचा 'परमहंसांची दाल -बाटी' आवडले त्यामुळे. जुई जोशींची करिड एग सेण्डविचची रेसिपी मेल करून विचारली आहे. मिळते का पाहु.
'मेरु' नावाचा पर्वत अस्त्तित्त्वात आहे हेच मला माहित नव्हतं. त्यामुळे त्यावरचा सायली महाराव ह्यांचा लेख उत्सुकतेने वाचला. अगदी जवळ पोचून चढ़ाई न करण्याचा निर्णय घेणं खरंच कठिण। सायली घोटीकर ह्यांचा जॉर्जियामधल्या गर्दबनीतल्या प्रवासाचा वाईट अनुभव वाचून खंत वाटली. जॉर्जियासारख्या टिनपाट देशातसुध्दा 'इथे भारतीय लोक नकोत। ते आले की जात नाहीत' हे स्थानिकांचं मत बनण्यासारखी परिस्थिती आपण आणली आहे हे पाहुन खरोखर लाज वाटली. 'शेवटी फ्लाईट मिळतेच आपल्याला' (रोहित भोसले) आणि 'पर्यटन म्हटलं की हेही आलंच' (उर्मिला चाकुरकर) वाचून प्रवासात अडचणी येणारे आपणच एकटे नाही हे जाणवून हायसं वाटलं. :-)
'बागा त्यांच्या आणि आपल्या' (मैत्रेयी केळकर), 'दक्षिणेतल्या डोंगरवाटांवर' (अपर्णा करमरकर), 'परदेशतला एक उनाड डीवास (पूनम छत्रे), 'कच्छच्या रणातली सायकल सफर (अमित गाडगीळ), 'आधुनिक भारत प्राचीन भारत' (मनीषा चितले) हे लेख ठीकठाक वाटले.
Laptop ने राम म्हटल्याने टेम्पररी Laptop वरुन transliteration वापरून ही पोस्ट टाकताना जाम दमछाक झाली. तुर्तास इतकेच पुरे.