दिवाळी संपून जवळजवळ ३ महिने होत आल्यावर वाचायला घेतलेला हा दुसरा दिवाळी अंक. 'मस्त भटकंती' वाचून झालेल्या निराशेनंतर हा अंक वाचायला घ्यावा की नको अश्या संभ्रमात मी होते. पण मुखपृष्ठावरचं हिरव्याकंच वाटेचं चित्र पाहून 'निदान उघडून तरी पाहू' असा मोह झालाच.
दोन अंकांची तुलना करत नाहीये मी. पण तरी 'प्रवास' ह्या विषयावर आधारित असलेला अंक कसा असावा ह्याचं हा अंक हे एक उत्तम उदाहरण आहे. सुरेख छायाचित्रे, मोठा फॉन्ट, ह्या पानावरून त्या पानावर टोलवाटोलवी असलीच तर फार थोड्या प्रमाणात आणि वाचकांशी गप्पा मारत असल्यासारख्या भाषेतले लेख. उगाच माहितीचा ओव्हरडोस नाही. दर पानाआड जाहिरात नाही. आणखी काय पाहिजे?
तसे मला सगळेच लेख छान वाटले पण सगळ्यात आवडलेले म्हणजे - सेरेंगेटी, दांडेलीची रानभूल, कान्हा, थाट डोंगरच्या मैनांचा, रात्रीच्या गर्भात ट्रेकर्सच्या विश्वात, 'खाद्य मुशाफिरी' तले सर्व लेख, वाराणसी:सारनाथ, शोधाशोध गोवा-पोर्तुगाल नात्याची, हिमबिबट्याच्या शोधात, पाउले चालती कैलासाची वाट, हंपी: काळाच्या उदरातली, सायकलस्वारी युरोपवारी आणि मंतरलेलं मियाजीमा. 'द टर्मरिक सिटी' चं फोटो फिचर हळदीचा एक नवा रंग दाखवून गेलं. "मंझिल से बेहतर ये रास्ते" सुध्दा छानच.
माझ्या प्रवासाच्या ToDo List मध्ये आणखी नव्या गोष्टींची भर पडली:
सेरेंगेटी - गोरोंगोरो क्रेटर, तिथले बिग-५ म्हणजे सिंह, हत्ती, गेंडे, पाणघोडा आणि जंगली म्हशी, लेपर्ड लेंड, मन्यारा लेक
हंपी - सिस्टर स्टोन्स, तेनालीराम व्ह्यू पोईंट, विरुपाक्ष मंदिर, त्रिमुखी नंदी, यंत्रोद्धार अंजनेय, हजारीराम मंदिर, सासविकाळू गणेश, कडलीकाळू गणेश, विजय विठल मंदिर,
पंचमढी - पांडवलेणी, चौरागड, धूपगड, राजगिरी, सुंदरगड
मियाजीमा (जपान) - इत्सुकूशिमा जिंज्या, मोमिजी मांजू, मिसेन पर्वत, ओमोतो पास, मोमिजीदानी पार्क, शिशिव स्टेशन मधलं मांजू बनवायचं दुकान
हेमिस नेशनल पार्क. लडाख
सीएसटी स्टेशन गाइडेड टूर
स्पेन - मिरादोर द सेन निकोला, फ्लेमेन्को टूर, रोमन ब्रीज (कोर्दोबा), अमाल्तिया रेस्टोरंट, मेझक्कीता मशीद
दांडेली-अणशी अभयारण्य
Toy Trains - दार्जिलिंग ट्रेन, कांग्रा व्हेली गाडी, कालका-सिमला गाडी
कैलास मानसयात्रा
गोवा - मार्टीन्स कॉर्नर हॉटेल (कोलवा बीच आणि माजोरडा बीच मध्ये), हंड्रेड मानैरास हॉटेल
सिडनी - द रॉक्स मार्केट, नाईट नुडल मार्केट, [पेंडीज मार्केट, मामक रेस्टोरंट, मलाय-चायनीज रेस्टोरंट, फूड टूर्स
मध्य प्रदेश खादाडी - आटेकी पंजिरी, माळवी पोहे, गराडू, भुट्टेका किस, गिले नारियल के पेटीस, दूध की शिकंजी, रतलामी शेव, भोपाल चटोरी गल्ली (बेकरी बिस्किटं, बनपाव, शिरमाल), दाल बाफले, मावाबाटी, खोपरापाक, पतीसा (सोनपापडी), निंबू/ आम शिकंजी, नारियल क्रश, गव्हाची थुली, गुजीया, ग्वाल्हेर (कलाकंद, तील गजक), सागर, बुंदेलखंड (चीवौजी की बर्फी, कुंदा के पेढे, माने की गुजीया, मगद का लड्डू), खूरई गावातली खुस्चन मिठाई, जबलपूर (खोये की जिलेबी, आलूबोंडा, राजगिरा चक्की, चवळीवडे), दाल-पानीए, चक्की की शाक, टापू
गुजराती खादाडी - सुरती लोचो, सुरत (घारी, नानकटाई, सुतरफेणी), मगज, सालमपाक, लीलवानी, लीलो चेवडो, भरूच (खारी शिंग), पाटण रेवडी, पोरबंदर खाजली, हलवासन, डाकोर गोटा
विदर्भ खादाडी - सावजी चिकन/मटण, खसखशीची भाजी, पातोडी रस्सा, दाल कांदा, पावटा उसळ