Showing posts with label Future Trips. Show all posts
Showing posts with label Future Trips. Show all posts

Wednesday, January 12, 2022

४. महाअनुभव (दिवाळी अंक २०२१) (किंमत २०० रुपये)

 गेली काही वर्षं महाअनुभवचा दिवाळी अंक घेते आहे. ह्या वर्षीही मॅजेस्टिकमध्ये गेले तेव्हा अनुक्रमणिका चाळून पाहिली. कथा-कविता ह्यांपेक्षाही ज्ञान वाढवणारे लेख असतील असा अंक घेण्याकडे माझा कल असतो. त्या कसोटीत हा अंक पुरेपूर उतरेल असं वाटलं म्हणून विकत घेतला. 

अंक वाचायला घेतला तेव्हा निर्णय योग्य असल्याची खात्री पटली. मुकुंद कुलकर्णींचा त्यांच्या करोना आजाराविषयीचा लेख वाचून त्यांचं  कौतुक वाटलं. साधं डोकं दुखलं तर आपण किती बेचैन होतो. पण करोनातून बरं होऊन म्युकरमायकोसिसमुळे कवटीचा काही भाग काढून टाकण्याचं ऑपरेशन करावं लागलं त्या सर्व काळाचं वर्णन त्यांनी किती सहजतेने केलं आहे. विनोदबुद्धी शाबूत असल्यानेच ते ह्यातून सहीसलामत बाहेर पडले असंच वाटलं. सुचिता पडळकर ह्यांचा मधमाश्या पालनावरचा लेख वाचून त्यांच्या चिकाटी ची दाद द्यावीशी वाटली. मधमाश्या पालनाबद्दल खूप मनोरंजक माहिती मिळाली. 

चित्रकला हा माझ्या शाळेतल्या नावडत्या विषयांपैकी एक कारण त्यात अजिबात गती नव्हती. ज्यांना देवाने चित्र काढायची देणगी दिली नाही त्यांचा वेळ ह्या वर्गात फुकट का घालवतात असं मला तेव्हा वाटायचं आणि आजही माझं तेच मत आहे. पण लोकसत्तात गेले वर्षभर सुभाष अवचट चालवत असलेलं सदर मी आवडीने वाचलं. त्यामुळे त्यांचा 'सेल्फ पोर्टेट' वरचा लेख आवर्जून वाचला. डॉ. शंतनू अभ्यंकर ह्यांचा 'जन्मरहस्याची जन्मकहाणी' हा लेख मानवी जीवाची वाढ कशी होते हे साध्या सोप्या शब्दात समजावून देतो. ही प्रक्रिया किती गुंतागुंतीची असते ते वाचून अवाक व्हायला होतं. वर्षानुवर्षं हे चक्र अविरत चालू राहण्यामागे कुठली शक्ती असेल असाही विचार मनात येतोच. राजकारण - मग ते देशांतर्गत असो वा विदेशी - हा मला एक अतिशय इंटरेस्टिंग विषय वाटत आलाय. त्यामुळे निळू दामलेंचा अँगेला मर्केलवरचा लेख फार आवडला. 'द वायर' ह्या न्यूज पोर्टलबद्दल माहीत नव्हतं. ती माहिती नितीन ब्रम्हेच्या लेखातून मिळाली. हे पोर्टल चेक करून सबस्क्राईब करायला आवडेल. 

'माणसं' विभागातले लेखही उत्तम. पैकी एगथा ख्रिस्ती माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक. तिच्यावर राजेश्वरी देशपांडे ह्यांनी लिहिलंय. डिआन अरबसबद्दल कधी ऐकलं नव्हतं. ती माहिती नितीन दादरावाला ह्यांच्या लेखातून मिळाली. पॉल सॅलोपेकचं नाव ऐकलं नव्हतं त्यामुळे अश्मयुगीन मानवाच्या स्थलांतराच्या वाटेवरून तो करत असलेल्या प्रवासाचीही काही माहिती नव्हती. https://www.nationalgeographic.org/projects/out-of-eden-walk/ वर जमेल तसं ह्याबाबत वाचणार आहे. जग फिरायचं स्वप्न आता स्वप्नच राहतंय का काय अशी शंका आजकाल येते. पण देवाजीच्या कृपेने संधी मिळालीच तर ह्या लेखात उल्लेख केलेली स्थळं - रिफ्ट व्हॅलीतलं गोना (जिथे २६ लाख वर्षांपूर्वीची उपकरणं सापडली आहेत), जॉर्डनमधलं घोर-अल-साफी (जगातली सगळ्यात कमी उंचीवरची जागा आणि तिथली पाचव्या शतकातली मॉनेस्ट्री) आणि वादी -अल -रमचं वाळवंट, वादी -हाफीर, वादी - नातुफ अझरबैजानमधलं गोबुस्थान नेशनल पार्क, खिवा-बुखारा-समरकंद ही शहरं, रेशीम कारागिरांचं मार्गिलन गाव - त्या यादीत जाऊन बसली आहेत.

'ललित' मधले सगळे लेख छान आहेत. कथा विभागातल्या रन -आउट (प्रदीप चंपानेरकर) आणि पॉपअप (मेघश्री दळवी) आवडल्या. गंगोचं पोर (भीष्म सहानी) आणि डान्स बार (मानसी) जराश्या चाळलया तेव्हा ट्रॅजेडी वाटल्या. अश्या कथा वाचायला नको वाटतात म्हणून स्किप केल्या. 

Monday, April 29, 2019




(Source: Loksatta)

Monday, December 24, 2018

Monday, December 10, 2018

Wednesday, October 24, 2018

Monday, October 1, 2018

Friday, August 3, 2018

https://www.livemint.com/Leisure/bUjcy8sQfQt8UrPEkWm4eK/The-Ramzan-effect.html

Thursday, July 5, 2018

Thursday, May 31, 2018

Damchoe's Homestay in Thimphu, Bhutan - to explore organic farms or try a hot stone bath

Sapoi Tea Estate, Assam - to take part in farming activities or tour the tea factory

Lalhous Homestay, Kohima - Homestay near the Hornbill Festival site

Thursday, February 1, 2018

Tuesday, December 5, 2017

भूतान – भूमतंग, योन्गाद, त्राशिगंग, संदृप जोखर, जांबे लाखंग, जाकर झोंग, ताम्शिंग लाखंग देऊळ, मेबर तेशो उर्फ बर्निंग लेक, मोन्गरचा रविवारचा बाजार, बुमदालिंग (बर्ड वोचींग)

व्हिएतनाम – हानोई (होन किएम लेक, म्युझियम ऑफ फाईन आर्ट, Water puppet theatre, हो ची मिन्ह स्मारक, वन पिलर पागोडा, टेम्पल ऑफ लिटरेचर, बाय दिन्ह टेम्पल, त्रेंग आन ग्रोटोज) दानांग, होचीमीन, कंबोडिया, हालोंग बे क्रुझ, बन चा (ग्रिल्ड पोर्क नुडल्स), फो नुडल सूप, एग कॉफी, कोल्ड नुडल्स

इस्त्रायल - नेगेव वाळवंट, मसादा किल्ला, डेड सी, एन अवादात नेशनल पार्क, माखतेश रेमोन

साउथ कोरिया - sea-parting

रायगड (पालीजवळ उन्हेरे गावातली गरम पाण्याची कुंडं), रत्नागिरी प्रचीतगड किल्ला (कंदारडोह हा महाराष्ट्रतला सर्वात मोठा धबधबा, कातळसडे), रायगड लिंगाणा किल्ल्याच्या पायथ्याशी पाणे दापोलीजवळून वाहत जाणार्या काळ नदीच्या पात्रात 'वाळणकोंड' इथला डोह, वरदायिनी देवी देऊळ, हरिहरेश्वर Honeycomb Weathering, कल्याण-अहमदनगर महामार्गावर अणे घाटातला गुळुंचवाडी इथला नैसर्गिक सेतू, संगमनेर तालुक्यातल्या पेमगिरीतल्या मोरदरी  गावातला महावृक्ष, पेम्गीरीचा किल्ला (भीमगड/शहागड), नगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातलं वडगाव दर्या (दर्याबाईचं मंदिर, लवणस्तंभ), पुणे जिल्ह्यातल्या तळेगावजवळच्या घोरावडेश्वर डोंगरातली प्राचीन लेणी आणि अग्निजन्य गुहा, पुणे-नगर रस्त्यावरच्या निघोजाच्या कुकडी नदीतल्या पात्रातले रांजणखळगे, नाशिकमधल्या ब्रह्मगिरी/त्र्यंबकगडवरच्या शंकराच्या जटा, अहमदनगर जिल्ह्यात रतनवाडीच्या सामद गावापाशी असलेली सांधणघळ (नोव्हेंबर ते एप्रिल)

राजापूर तालुक्यातालं कशेळीचं कनकादित्य मंदिर (रथसप्तमी उत्सव), आरवली आणि माखजनचा आदित्यनारायण, परुल्याचा आदिनारायण, गावडेगुडे, नेवरे, कायाळघे, आजगाव, सातार्डे, खारेपाटणे इथला आदित्यनाथ, मुरुड, कुर्ध्ये इथला सुर्यनारायण, संगमेश्वर कर्णेश्वर मंदिर, रत्नागिरी भैरी देऊळ

अमृतेश्वर मंदिर (रतनवाडी, भांडारदरा, अहमदनगर),आयरेश्वर मंदिर (नाशिक-शिर्डी मार्गावर सिन्नर बस डेपोच्या अलीकडे , नाशिक), गोंदेश्वर मंदिर (सिन्नर, नाशिक), लक्ष्मीनारायण मंदिर (बहादूरगड, पेडगाव, तालुका श्रीगोंदा, अहमदनगर), कोपेश्वर मंदिर (खिद्रापूर, तालुका शिरोळ, कोल्हापूरपासून ६५ किमी), कुकडेश्वर मंदिर (जुन्नरपासून १८-२० किमी वर चावंड किल्ल्याजवळ पूर ह्या गावी), सिद्धेश्वर मंदिर (अकोले, अहमदनगर), जगदंबा मंदिर (अकोले तालुक्यापासून १५-१६ किमी वर टाहाकारी गावात आढळा नदीच्या काठावर), माणकेश्वर मंदिर (माणेगाव तालुक्यातल्या झोडगे इथल्या टेकडीच्या पायथ्याशी, जिल्हा नाशिक), अंबरनाथाच्म शिवमंदिर, भुलेश्वर मंदिर (यवत, जिल्हा पुणे)

गोठलेल्या झान्स्कर नदीवरचा चददर ट्रेक, pengong lake काठी तंबूत राहून नदीच्या तळ्याकाठचा ट्रेक

सोलापूरच्या अलीकडे ३० किमी वर लांबोटी गाव (जय शंकर - मका चिवडा, गुलाबजाम, चहा),  तुळजाभवानी मंदिराच्या जवळ असलेलं हॉटेल दुर्गाई (मटण थाळी), सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यातल्या कोळेगावात सुगरण रेस्तोरांत (खेकडा भजी, कडक चहा), पुणे सोलापूर हायवे वर चिलापी मच्छी फ्राय), भिगवणपासून १५ किमी वर 'हॉटेल श्री' (मिसळ आणि कडक चहा)

Saturday, December 2, 2017

https://www.loksatta.com/lekhaa-news/food-speciality-in-aurangabad-shahi-food-1589788/

http://www.livemint.com/Leisure/QdWbf4DI5TntzyaSnMyhXM/A-trip-to-the-Sundarbans.html

http://www.livemint.com/Leisure/vGOh6JHuRnHy7OIpjcaWkN/Whose-Bandra-is-it.html

https://www.loksatta.com/lekhaa-news/pondicherry-food-culture-south-food-in-pondicherry-1593628/

Thursday, November 23, 2017

http://www.livemint.com/Leisure/dkKR8FmVU2Sbwblxuzve5L/Delhi-to-Kasar-Devi-Natures-canvas.html