लायब्ररीतून हे पुस्तक आणून २-३ दिवस झाले तरी मला वाचायची संधी मिळत नव्हती. मग विकेंड आला आणि दुपारी पुस्तक घेऊनच बसले. 'यात्रा' आणि 'खिडकी' हे दोन लेख विशेष आवडले. लेखिकेने केलेल्या केदारनाथ, बद्रीनाथ यात्रेची माहिती यात वाचायला मिळते. विसाव्या शतकाच्या मध्याच्या सुमारास अश्या यात्रा कश्या केल्या जात ते वाचून आश्चर्य वाटलं. यात्रा कंपनीत नोंद करायची, मग ते पोर्टर, स्वयंपाकी बरोबर देत. सामानाचं वजन करणे, मुक्कामाच्या ठिकाणी राहायची सोय बघून शिधा विकत घेणे, स्वयंपाक, आंघोळी उरकणे, यात्रेसाठी घोडे वगैरे ठरवणे - कसली दिव्यं करावी लागत. मी तेव्हाच्या काळात असते तर ह्या भानगडीत पडले नसते असंच वाटलं. ह्यानंतरचे आवडलेले लेख म्हणजे 'तितिक्षा' आणि 'कुंकवाची उठाठेव'. पैकी 'तितिक्षा' हा स्थितप्रज्ञतेचा महामेरू असणारया बस कंडक्टरवर तर 'कुंकवाची उठाठेव' हा बायका कुंकू का लावतात ह्यावर जावईशोध लावणाऱ्या महाभागांवर. 'सुटका' हा लेखिकेला सभेत बोलायला आमंत्रित करणारया लोकांच्या अनुभवावर लिहिलेला लेखही मजेशीर आहे.
'किती घेशील दो कराने' वाचून आपणही हिमालयात जावं असं प्रकर्षाने वाटलं. अर्थात टीव्हीवर बर्फ बघून हुडहुडी भरणाऱ्यांपैकी अस्मादिक असल्याने ते कितपत शक्य होईल ह्याची शंकाच वाटते. पण तशी इच्छा मात्र झाली. हिंदू धर्मात खास स्थान असलेली केदारनाथ, बद्रीनाथ ही ठिकाणं 'सिनियर सिटीझन' व्हायच्या आधी हातपाय धड असेतो पहावीत असं खूप वाटतं पण तिथल्या देवळांच्या झालेल्या बाजाराबद्दल वाचून त्यात काही अर्थ राहिला असेल का ते त्या देवालाच ठाऊक.
'भटके', 'दोन टोके', 'विनाशाची सुरुवात', 'सत्याचा शोध', 'भ्रमंती', 'डार्विनचा सिध्दांत' हे लेख वेगळेच विचार मांडतात. महर्षी धोंडो केशव कर्वे हे लेखिकेचे सासरे. त्यांच्यावर लिहिलेल्या 'आजोबा' नावाच्या लेखात अगदी प्रांजळपणे तिने त्यांच्याविषयीची आपली मते मांडली आहेत.
'प्रवास संपला' ह्या लेखाने पुस्तकाची सांगता होते. त्यातलं एक वाक्य पुस्तक मिटून ठेवलं तरी माझ्या मनात घुमत राहिलं - मला आवडलं घर, छान आहे. मरायलाही छान आहे न् जगायलाही छान आहे.
एखादं प्रवासवर्ण वाचावं असं हे पुस्तक वाचल्यावर वाटतंय. मीना प्रभूंची काही पुस्तकं २-३ वर्षांखाली वाचली होती. अजून एखादं लायब्ररीत आहे का विचारायला हवं. तूर्तास विश्वास् पाटील ह्यांनी लिहिलेलं 'संभाजी' आणलंय. पहिला भाग जवळपास वाचून होत आलाय. कदाचित पुढल्या रविवारपर्यंत दुसराही वाचून होईल.