माणसाला कश्यावरून कशाची आठवण येईल सांगता येत नाही. परवा ब्रेड घेत होते तेव्हा शेजारी एका मुलीने बटाट्याच्या वेफर्स घेतल्या. एकदम वाटून गेलं आता लेज सारख्या फ्लेवर्ड चिप्स आल्यावर आपण ह्या प्लेन बटाट्याच्या वेफर्स विसरूनच गेलोत. लहानपणीची माझी एक सवय पण आठवली. ब्रेडच्या स्लाईसला मस्का थापून (लावून नव्हे, थापून!) त्यावर ह्या बटाट्याच्या वेफर्स ठेवून खात पुस्तक वाचायला मला खूप आवडायचं. अर्थात ही चैन सुट्टीच्या दिवसांत किंवा रविवारीच परवडायची कारण शाळा आणि क्लासेसच्या रोजच्या धबडग्यात ते जमणं कठिण होतं. दुसरा असाच आवडता प्रकार म्हणजे ब्रेडच्या स्लाईसला टोमेटो केचप फासून ते खाणे. आज कल्पना केली तरी पोटात ढवळतं पण तेव्हा ही अत्यंत आवडती डिश होती. आईने बटाट्याची भाजी करायला बटाटे उकडले की त्यातले बटाटे फस्त करणे हा आवडता उद्योग होता. आता बटाट्याची भाजी पण जपून खावी लागते. मोन्जीनीस मधला (इटालियन लोकांना फेफरं आणील असा!) छोटा चौकोनी व्हेज पिझ्झा तेव्हाही लाडका होता आणि डॉमिनो, पिझ्झा हट, स्मोकिंग जोजच्या आजच्या जमान्यातही आहे.
सहज विचार करायला बसले आणि शाळेतली मधली मोठी सुटी एकदम आठवली. प्रत्येकजण आपापला ग्रुप करून वर्गात खायला बसायचा. आज गार अन्न खायच्या कल्पनेने अंगावर शहारा येतो. तेव्हा सवय होती. मग प्रत्येकीच्या डब्याच्या झाकणात ग्रुपच्या प्रत्येक मेंबरच्या डब्यातल्या अन्नाचा थोडा थोडा भाग असायचा. काही मुली लोणच्याचा खार आणि चपाती किंवा चपाती आणि आणि केळं असलं काही भन्नाट कॉम्बिनेशन सुध्दा आणायच्या. पावसाळ्याच्या दिवसात प्रत्येकीच्या डब्यात लोणचं असायचंच. लिंबाचं गोडं लोणचं शाळेत कोणाच्या तरी डब्यात मी प्रथम खाल्लं होतं. आमच्या घरी नेहमी आंब्याचं नाहीतर लिंबाचं तिखट लोणचं आणायचे. किती वर्षं झाली असं जेवून. आता परत अशी संधी नाही मिळणार. शाळा सुटली की अश्या किती गमतीजमती कायमच्या दुरावतात ना. तेव्हा प्रत्येकीच्या आईच्या हातचा काहीतरी पदार्थ लाडका असायचाच. पण कुठले ते आता नाही आठवत. तेव्हा बहुतेक सगळ्या जणींच्या आई आजच्या भाषेत सांगायचं झालं तर होममेकर (तेव्हा 'हाऊसवाईफ' म्हणत). त्यामुळे डब्यात सकस, आरोग्याला चांगले वगैरे पदार्थ असायचे. चौथीच्या वर्गात तर डबा खाऊन संपवलेला बाईंना दाखवायला लागायचा. :-) त्यातल्या त्यात शनिवारी सकाळची शाळा असायची तेव्हा काहीतरी चटकमटक खायची किंवा डब्यात घेऊन जायची परवानगी घरून असायची. माझ्या एका मैत्रिणीच्या डब्यात त्या दिवशी हमखास मुगाची ड्राय डाळ आणि मावा केक्स असायचे. बहुतेक जण शाळेच्या canteen मध्ये मिळणारे वडे-सामोसे घ्यायचे. त्या दिवशी शाळेत canteen सोबत आणखी २ ठिकाणी वडे-सामोसे विकत कारण एव्हढा लोंढा सांभाळण्याइतकं canteen मोठं नाही. तेव्हा पेप्सीकोला (पेप्सी आणि कोकाकोला ह्या दोन्ही कंपन्यांच्या मालकांना झीट आणेल अश्या) नावाचा प्लास्टीकच्या छोट्या पिशवीत भरलेला एक प्रकार मिळायचा. त्यातसुध्दा पाण्यातला आणि दुधातला असे दोन प्रकार असायचे. दुधातला अधिक चविष्ट आणि म्हणूनच (अर्थात!) थोडा महाग असायचा. कालाखट्टा, ऑरेंज वगैरे बरेच फ्लेवर्स असायचे त्यात. सालाबादप्रमाणे मागच्या वर्षी दसऱ्याला मी आणि माझी मैत्रिण शाळेत गेलो तेव्हा canteen मध्ये पेप्सीकोला बघून मैत्रिणीने घ्यायचा का असं खवचटपणे विचारलं. तिला चांगलं माहीत आहे की मी खाणार नाही. ह्या वेळी जाऊ तेव्हा पेप्सीकोला असला आणि तिने पुन्हा 'घ्यायचा का' असं विचारलं तर घेऊन तिच्यासमोर फस्त करून तिला झीट आणणार आहे मी. :-) आणि हो, पानाच्या गोळ्यासुध्दा खूप जनता विकत घ्यायची. ह्या चपट्या लाल रंगाच्या गोळ्या पानाच्या फ्लेवर्सच्या असायच्या.२-३ वर्षांपूवी दसऱ्याला canteen मध्ये आवर्जून ह्या गोळ्यांविषयी विचारलं तेव्हा त्या काही दिवसांपूर्वीच बंद झाल्याचं कळलं तेव्हा किती वाईट वाटलं होतं. बाय पॉप्युलर डिमांड पुन्हा चालू करायला हव्यात. :-)
पुढे इंजिनिअरिंगला गेले तेव्हा एका मैत्रिणीच्या आईच्या हातची इडली-चटणी सगळ्या ग्रुपमध्ये फेमस होती. तशी स्मूथ एकजीव झालेली मुलायम खोबऱ्याची चटणी मी परत कधीही खाल्ली नाही.....अगदी उडप्याकडेसुध्दा नाही. तिच्याकडून रेसिपी लिहून घ्यायचं सुचायचं वय नव्हतं तेव्हा. :-( लिहून घेऊनही कितपत उपयोग झाला असता माहीत नाही. कारण पुढे एका ऑफिसात एक बंगाली ज्युनियर होती. तिच्या आईने केलेली गाजराची भाजी आणि एग रोल्स मला फार आवडायचे. तिने सांगितलेली रेसिपी वापरून भाजी करूनसुध्दा पाहिली पण तशी जमली नाही. एग रोल्स गार झालेले असतील तरी त्याला कधीही अंड्याचा वास यायचा नाही हेही नवलच होतं. त्याच्याआधी एका ऑफिसात गुजराती कुटुंबात लग्न होऊन आलेली साउथ इंडियन मैत्रिण होती. तिच्या डब्यातली गुजराती पध्दतीची गोड डाळ बघून मी एकदा आपला डबा तिच्या हवाली केला होता आणि तिचा फस्त केला होता. माझ्या आईंच्या हातचं काकडीचं तवसोळ तिला भारी आवडायचं. आणि ती गोड डाळ माझ्या आवडीची. युएस मध्ये असताना ओळखीच्या एक गुजराती मावशी होत्या त्यांच्याकडे तर कसलीही आमटी किंवा भाजी असली तरी मी आनंदाने जेवायचे. त्यांच्या हातालाच चव होती. फक्त त्यांची खिचडी मला अजिबात आवडायची नाही कारण ती खूप पातळ असायची. त्यांच्याकडून शिकलेली गोड डाळ आणि वांगी घालून केलेली मटारची उसळ अजून करते. ती मात्र जमते :-)
म्हटलं ना, खाणं हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. एकदा लिहायला बसले की थांबायचं नाव नाही. पण तूर्तास इतकं पुरे. पुन्हा एखाद्या आठवणीचं स्टेशन लागेल तेव्हा पुढली फेरी मारू. :-)