विकेन्डला अष्टविनायकाच्या ट्रीपला जाऊन आले. जायचं जायचं असं डिसेंबरपासून घाटत होतं पण योग येत नव्हता. म्हणतात ना देवाचं बोलावणं यायला लागतं.:-)
तसे एकदा मी पूर्वीही अष्टविनायक केलेत पण ते एका टूरिस्ट कंपनीबरोबर. ह्या वेळी गाडी घेऊन गेलो होतो त्यामुळे प्रवास मजेत झाला. पाली, महड आणि थेऊर हे पहिल्या दिवशी. मोरगाव, सिध्दटेक आणि रांजणगाव दुसर्या तर ओझर आणि लेण्याद्री शेवटल्या दिवशी केले. बाप्पांना भेटून छान वाटलं. :-)
महडच्या मंदिराबाहेरच्या दुकानांत कसल्या सुरेख रंगांच्या बांगड्या होत्या पण सगळ्या काचेच्या. शहरातल्या धकाधकीत किती वेळ टिकाव धरतील काय माहित म्हणून घेतल्या नाहित. आता पश्चात्ताप होतोय :-( थेऊरच्या मंदिरात पोचेतो अंधार पडला होता. त्यातून ज्याला पत्ता विचारावा तो इथेच आहे, एक २५ किलोमीटरवर म्हणून सांगायचा. त्यातून आपण पोचेतो मंदिर उघडं असेल की नाही ही शंका पोटात घेऊन प्रवास केला पण पोचलो तेव्हा छान दर्शन झालं.
सिध्दटेकला मागल्या वेळी नावेतून प्रवास करून गेल्याचं आठवत होतं. आता मंदिरापर्यंत गाडी गेली. रांजणगावच्या मंदिरात खूप गर्दी होती. खरं तर पैसे देऊन रांगेत उभं न राहता दर्शन घेणं पटत नाही. पण आमचा नाईलाज होता कारण आम्ही मुक्कामाला पुण्याला परत जाणार होतो. त्यामुळे बाप्पाकडे माफी मागून दर्शन घेतलं.
लेण्याद्रीच्या पायर्या चढताना दमछाक झाली थोडी पण वर पोचल्यावर सार्थक झाल्यासारखं वाटलं. गुहेत कुलूप घालून ठेवलेली दारं कसली आहेत कळायला मार्ग नव्हता पण तिथे सफाई करणं आवश्यक आहे. कोळीष्टकं जमलेली पाहून वाईट वाटलं. :-( मूर्तीचे फोटो काढू नका असं लिहिलं असतानाही मूर्तीसोबत पोझ देऊन फोटो काढणारे लोक पाहून तिळपापड झाला :-(
Wednesday, April 14, 2010
मागल्या आठवड्यात पु.लं.चं "वंगचित्रे" परत वाचलं. वाचून एकाच वेळी आनंद झाला आणि दु:खही. शांतिनिकेतनमध्ये रहाण्याचा आनंद ह्या पुस्तकाने दिला. पण दु:ख ह्याचं की इतक्या वर्षांपूर्वीच गुरुदेवांच्या स्वप्नातून साकार झालेल्या ह्या वास्तूचे चिरे निखळायला सुरुवात झाली होती तर आता काय झालं असेल? आपण भारतीय दुर्दैवीच. अशी अनेक शिल्पं आपल्या देशात निर्माण झाली पण आपण सगळ्यांचं उध्वस्त होणं उघड्या डोळ्यांनी पहात आलो :-(
२-३ वर्षांपूर्वी एका मैत्रिणीच्या कोलकात्याच्या घरी नवरात्रीच्या दिवसात जायचा योग आला होता. शांतिनिकेतन सोडाच पण हावरा ब्रिज पहायचं पण स्वप्न पुरं होऊ शकलं नाही. पु.लं.च्याच शब्दात ह्याचं कारण सांगायचं तर "भीषोण लोकारण्य". दोर मो़कळा केल्यावर सैरावैरा धावणारे लोक पाहून मुंबईच्या गणपतीउत्सवातली गर्दी पाहिलेल्या माझीही छाती दडपली. बरं ह्या गर्दीत हरवले तर "आमार नाम स्वप्ना" ह्यापुढे माझी गाडी जाणार नाही ह्याची खात्री. त्यामुळे निमूटपणे मैत्रिण आणि तिचे कुटुंबिय जिथे नेतील तिथे जायचं असं शेवटी ठरवून टाकलं.
पुन्हा जायचा योग आलाच तर तिथली खादाडीची ठिकाणं, शांतिनिकेतन, हावरा ब्रिज आणि ट्राम हे कार्यक्रम पार पाडल्याशिवाय तिथून निघणार नाही अशी प्रतिज्ञा तूर्तास केली आहे :-)

Thursday, April 8, 2010
The weather has become so unbearable in Mumbai that I wonder how I am going to survive for 2 more months. :-( I just hope and pray that Monsoon comes earlier than usual this year though I know it's no use wishing for the same. :-(
In the meantime I am dreaming of the patter of the first raindrops, the smell of wet earth and a sky full of dark clouds :-)

76 lives lost! And now everyone is busy pointing fingers at each other. I don't know why we are told that intelligence sources had warned against this and that only after the tragedy has happened. Who is responsible for disseminating such information and acting on it? Why can't a common person like me know the names of these idiots who are responsible for deaths of these 76 people? Can we use RTI to get it?
I have stopped watching news because my blood boils every time the slain CRPF Jawans are mentioned. What makes it worse is that I know that this rage is impotent :-(

Tuesday, April 6, 2010
आहे मनोहर तरी - सुनिता देशपांडे
सध्या हा महिना तरी मराठी पुस्तकंच वाचायची असं ठरवलंय. लायब्ररीत गेले तेव्हा सुनिताबाईंचं हे पुस्तक दिसलं. पु.ल. हे सार्या महाराष्ट्रासारखंच माझंही आराध्य दैवत. त्यामुळे हे पुस्तक वाचावं का वाचू नये ह्यावर ह्याआधीही मी विचार केला होता. कारण ह्या पुस्तकात बाईंनी पु.लं.चं जे व्यक्तिचित्र रेखाटलंय त्याने पुलप्रेमी नाराज झाल्याचं मी वाचलं होतं. पण पुलं. वरच्या आपल्या प्रेमाची अॅसिड टेस्ट म्हणून का होईना पण ते वाचायचंच असं ह्यावेळी ठरवलं. आणि खरं सांगू? वाचून बरं केलं असंच वाटतंय.
कारण हे पुस्तक वाचून पु.ल. हेही आणखी चार भारतीय पुरुषांसारखेच होते असंच मला वाटतंय. सुनिताबाईंनी दुसर्या कोणा भारतीयाबरोबर लग्न केलं असतं तरी त्यांना १०० तले ९६-९७ टक्के हाच अनुभव थोड्याफार फरकाने आला असता. त्यांनी स्वतःबद्दल फार प्रांजळपणाने लिहिलंय, आपल्या चुका, आयुष्याच्या अखेरीस वाटणारी खंत सच्चेपणाने लिहिली आहे हे खरंच. पण काही ठिकाणी उगाच नको इतकी स्वतःची स्तुती केली आहे असंही वाटून गेलं. परफेक्शनिस्ट असणार्या माणसाला 'पाट्या टा़कण्याची' सवय असलेल्यांचा त्रासच होतो तसा तो त्यांना झाला. दुर्दैवाने ही पाट्या टाकायची सवय भारतात जवळजवळ सर्वांनाच आहे ह्याचा मीही अनुभव घेतला आहे, घेते आहे. :-( असो. तरी एकूणात त्या कालावधीचं आणि त्यांच्या सहजीवनाचं फार छान चित्रण आहे ह्यात.
आणि ह्या पुस्तकाचं प्रूफ-रिडींग खुद्द पुलंनी करून दिलं होतं असं जेव्हा मला कोणीतरी सांगितलं तेव्हा मात्र मी अवाक झाले. माझी पुलंवरची भक्ती अजून वाढली. खरंच जगावेगळंच जोडपं होतं हे.
लायब्ररीत बाईंची आणखी काही पुस्तकं आहेत. ती मात्र मी वाचणार हे नक्की. :-)

नर्मदे हर हर - जगन्नाथ कुंटे
तसं बघायला गेलं तर मला साधू-संन्यासी ह्यांचं वावडंच. त्यांच्यावरचा लोकांचा विश्वास उडावा अश्याच गोष्टी आजकाल ऐकू येतात. पण झालं काय की नर्मदा परिक्रमेवरच्या एका पुस्तकाचं लोकसत्तेत आलेलं परिक्षण वाचलं आणि दोन मित्रांना त्याबद्दल लिहिल. दोघांनीही एकदम हे पुस्तक रेकमेन्ड केलं. मग म्हटलं वाचायलाच पाहिजे. :-) लायब्ररीत आहे का म्हणून विचारलं तर होतं मग आणलं घरी.
वाचायला सुरू करण्याआधी सहज पुस्तकाच्या किती आव्रृत्या झाल्या आहेत ते पहात होते. सातव्या आव्रृत्तीपर्यंत पोचतो लेखक "जगन्नाथ कुंटे" यांचा " जगन्नाथ कुंटे (अवधूतानंद)" झालेला होता. मग पुस्तक वाचावं का वाचू नये हा विचार करण्यात पाचेक मिनिटं गेली कारण ह्या आनंद वगैरे स्वामी मंडळींची मला अॅलर्जीच. भरीला भर म्हणून आतल्या पानांत कोणा २-३ महाराजांच्या तसबिरी पण होत्या. तरी एव्हढं आणलं आहे तर वाचू म्हणून सुरुवात केली.
प्रथम काय खटकलं ते लिहिते. शूलपाणीच्या जंगलात लुटवून घेणे हा प्रकार अजब वाटला. एके ठिकाणी लेखकाने त्याला खायला देऊन अद्र्ष्य झालेले लोक आणि त्यांची झोपडी ह्यावर लिहिलंय ते वाचून हसावं का रडावं हे कळेना. पुढे एका अव्याहत नाद ऐ़कू येणार्या माणसाबद्दल उल्लेख आहे - त्याला काही कानाचा प्रोब्लेम असावा अशी शंका आली. ही साधनेची उच्च पातळी आहे असे लेखक म्हणतो. असेलही. पण हे पचायला कठिण गेलं एव्हढं मात्र नक्की. तसंच अश्वत्थामा दिसल्याचा उल्लेखसुध्दा झेपला नाही.
पण लेखकाने पुस्तकभर विनोदाचा वापर सुरेख केलाय. त्यामुळे ते कोरडं आध्यात्मिक पाल्हाळ झालं नाहिये. एव्ह्ढ्या वेळा परिक्रमा करणं त्याला कसं जमलं देव जाणे. माझी वाचूनच दमछाक झाली.
एकूणात परिक्रमा नर्मदामाई करवून घेईल अश्या विश्वासावर बायकांना तरी हे करणं अशक्य आहे असंच माझं मत ह्या पुस्तकावरून झालंय.:-( लोकसत्तात ज्या पुस्तकाबद्दल वाचलं होतं ते मिळालं तर नर्मदा परिक्रमेला आजच्या काळाचं परिमाण लाभेल. पाहू कधी वाचायची संधी मिळाली तर.

Subscribe to:
Posts (Atom)