Saturday, March 23, 2019

महालक्ष्मी सरस २०१९


ह्या प्रदर्शनाला जवळपास २ महिने लोटले. लिहेन लिहेन म्हणत लिहायचं राहून गेलं होतं. तेव्हा म्हटलं आता लिहावं. 

मी गेली ३-४ वर्षं ह्या प्रदर्शनाला जातेय. आधी ते रेक्लेमेशनला भरायचं. आता मला वाटतं गेल्या वर्षीपासून बीकेसीला असतं. पहिली १-२ वर्षं मी तिथे जेवणसुध्दा घेतलं आहे. पण तेव्हा तिथे राजस्थान, दिल्ली अश्या राज्यांचेही स्टोल्स असायचे. गेली काही वर्षं नुसते महाराष्ट्रातले स्टोल्स असल्याने सगळीकडे तोच तोच तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, गावरान चिकन, भाकरी, सोलकढी, तळलेले मासे असं दिसायला लागलंय. जेवणातलं नाविन्य संपून गेलं. तरी एकदा एक थाळी मागवली होती. नुसता भाताचा डोंगर, त्याला पुरेल एव्हढा रस्साच नाही. स्टोलवर गेस दिसत होता पण जेवण मात्र गारढोण. तेव्हापासून कानाला खडा लावला. अजिबात जेवायचं नाही. नुसती खरेदी करायची. ह्यावेळी बाजारात कुठेच ज्वारीचाच काय पण गव्हाचासुध्दा हुरडा मिळाला नव्हता. पावसाने ओढ दिल्याने हुरडयाची खास ज्वारी असते तिचं पीक आलंच नाही असं काहीतरी पेपरात आलं होतं. इथे हुरडा नाहीतर किमानपक्षी हुरडयाचं थालीपीठ मिळेल असं वाटलं होतं. पण हुरडा तर नव्हताच आणि थालीपीठसुध्दा हुरडयाच्या पीठाचं होतं. फार हिरमोड झाला. :-(

खरेदीच्या स्टोल्समध्येसुध्दा पूर्वी बरंच नाविन्य असायचं. गेल्या काही वर्षांपासून तेही गेलंय बरंचसं. त्यामुळे मी आता काही ठराविक गोष्टीच घेते – बेळगावचा (पुरोहितचा) कुंदा, फणसाच्या चिप्स, केरळचा हलवा. ह्यावेळी सांगलीच्या भडंगसोबत जयसिंगपूरचीसुध्दा भडंग मिळाली. गुळाची मुलायम पट्टी घेतली. एका दुकानात गव्हाचा अप्रतिम चिवडा मिळाला. तो पुढल्या वर्षीही नक्की घेणार. एकीकडे नाचणीची बिस्कीटस घेतली. आंब्याच्या शेवयासुध्दा होत्या पण घ्यायचा धीर नाही झाला. शेवाळापासून बनवलेली चॉकलेटस विक्रीला असणार असं पेपरमध्ये वाचलं होतं पण ती काय कुठे दिसली नाहीत. चुल आणि जाती पण होती विकायला. दोन्ही इतकी क्युट होती की अगदी घ्यायचा मोह झाला होता :-) डाळी मात्र एकाच दुकानात होत्या. खरं तर डाळी आणि बाकी धान्यं विकणाऱ्या दुकानांची संख्या जास्त असायला हवी.

असो. आणलेले सगळे पदार्थ झक्कास होते. फेरी सार्थकी लागली.

Friday, March 22, 2019

संगीत चि. सौ. कां. रंगभूमी

बघायच्या असलेल्या नाटकांची लिस्ट मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढतच चालल्याचं अलीकडेच लक्षात आलं. तेव्हा एप्रिल-मेंच्या उन्हात नाटक पाहायला बाहेर पडायचं टाळायचं असेल तर दुपारच्या झोपेचं खोबरं करून विकांताला नाटक पहावं लागेल हेही जाणवलं. सुदैवाने चि. सौ. कां. रंगभूमीचा प्रयोग पुढल्याच विकांताला होता तेव्हा निर्णय बदलायच्या आधी तिकीट काढून आले.

तरी नाटक सुरु व्हायच्या आधी थोडी धाकधूक होतीच. ह्यात संगीत नाटकातली पदं येतील तेव्हा झोप तर लागणार नाही ना. J ही भीती अनाठायी होती हे पहिल्याच पदात पक्कं झालं. मग मात्र मी सगळी पदं आणि अख्खं नाटक मस्त एन्जॉय केलं. संगीत मानापमान, संगीत शारदा, संगीत संशयकल्लोळ ह्यासारख्या माहित असलेल्या आणि संगीत बावनखणी ह्या कधी नावही न ऐकलेल्या नाटकातल्या, ज्यांचे आजवर फक्त शब्द वाचले होते अशा कशी ह्या त्यजू पदाला, नरवर कृष्णासमान सारख्या पदांवर माझी मान डोलताना पाहून ही माझीच मान आहे ह्यावर माझाच विश्वास बसेना. ‘अवघे पाउणशे वयमान’ तर मला फार आवडलं. फक्त प्रेक्षकात बहुतकरून सिनियर सिटीझन्सचा भरणा असल्याने त्यातल्या ‘अवघे पाउणशे वयमान’ असणाऱ्या काकांना ते ऐकून काय वाटलं असेल ह्याची मात्र उत्सुकता राहिली J

बरं, नाटकात नुसती संगीत नाटकातली पदं नव्हती तर काही जुन्या प्रसिध्द नाटकातले प्रसंगही होते. त्यात ‘तो मी नव्हेच’ मधला ‘तो मी नव्हेच’ म्हणणारा लखोबा लोखंडे पाहिला. ‘नटसम्राट’ मधले आप्पासाहेव बेलवलकर आपल्या भूमिकांबद्दल बोलताना पाहिले. ‘ती फुलराणी’ तल्या फुलराणीचा ‘तुला शिकवीन चांगला धडा’ ऐकलं. मोरूच्या मावशीचं ‘टांग टिंग टिंगाक’ ऐकलं. काही वर्षांपूर्वी पाहिलेल्या ‘हमिदाबाईची कोठी’ तला सत्तार ग्रामोफोन कोठीवर आणतो तो प्रसंग पाहिला. मस्त वाटलं.

मला शास्त्रीय संगीतातलं काहीच कळत नाही. पण सगळे गायक-गायिका छान गायले असं मला वाटलं. सर्वांनीच जीव ओतून अभिनय करून मराठी नाट्यभूमीचा इतिहास समोर उभा केला. फक्त संपदा-जोगळेकरची फुलराणी थोडी वयस्कर वाटली. अर्थात आता मला कुठे भक्ती-बर्वे पाहायला मिळणार. तेव्हा दुधाची तहान ताकावर हे आलंच.

अजून लिस्टमध्ये एपिक गडबड, व्हेक्युम क्लीनर, चल तुझी सीट पक्की, मोरूची मावशी, सोयरे सकळ, गुमनाम है कोई आणि द परफेक्ट मर्डर ही सारी नाटकं आहेत.

नाटक अभी बाकी है मेरे दोस्त J 

Supernatural S14, E8


There was a time, eons ago, when the death of any one of the major characters of this show made me anxious. As seasons rolled by, I realized that none of them stay dead for long - maybe for a season at the most. Except for Crowley, of course J

So I wasn’t too perturbed when Jack fell sick in previous episode. Hell, I didn’t even bat an eyelid when he breathed his last right at the very beginning of this one. They would bring him back sooner or later, I told myself. A deal with a Ripper, a summons to the crossroads demon, more of Rowena’s spells or- if all else fails - a desperate plea to the God Almighty (where in the world is Chuck BTW?). But even I was surprised when Jack was resurrected right at the end of this very episode. That was super-fast.

No prizes for guessing that Lily would be admitted through the pearly gates for this selfless act. People dying and going straight to Heaven or Hell kind of stumped me. Here I was thinking that they have to wait till the Judgement Day. Not sure exactly how an Egyptian God fits in the Christian idea of Heaven but there he was, armed with an abacus, ready to slot people neatly into upstairs or downstairs quarters depending upon how their life’s actions tallied up. He looked more Indian than Egyptian though. Wonder if that was the result of outsourcing J

It was good to see Kelly after a long time. If I ever made it to Heaven my place will have a huge garden and a huge library. Oh, and a huge kitchen stocked with lots of ice-cream, chocolates, sweets and Lay’s Sour cream-onion and barbecue chips J

Why did Castiel have to make that nasty deal with the Empty? It is going to hang over my head like the proverbial sword of Damocles for the seasons to come. But wait, don’t the Winchesters always find a way out? Yes sir, they do. So no worries.

I am just not too happy to see Lucifer back. Will we ever see the last of him?  

६. ऋतुरंग (दिवाळी अंक 2018)


मागच्या दिवाळीला हा अंक मी घेतला होता की नाही ते आता आठवत नाही. ह्या वेळी लोकसत्तामध्ये त्याबद्दल वाचल्यावर आणला खरा पण मला काही तितकासा आवडला नाही.

फक्त काही लेख आवडले – मेघना गुलजारचा ‘मी आणि माझे चित्रपट’, गिरीश कुबेर ह्यांचा ‘तेल त्रिवेणीचा उगम’, डॉक्टर आनंद नाडकर्णीचा ‘माझी रेषामैत्री’, मुकेश माचकरांचा ‘बीजमंत्र’, प्रदीप म्हापसेकर ह्यांचा ‘तो कधी एकटा नसतो’ आणि कल्पना दुधाळ ह्यांची कथा ‘वाफसा’.

पुढल्या वर्षी हा अंक बहुधा घेणार नाही.

५. लोकमत (दिवाळी अंक 2018)


गेली काही वर्षं मी लोकमतचा दिवाळी अंक घेतेय. अंकाने एकदाही निराश केलेलं नाहीये. इतकंच काय तर लोकमतचं वर्तमानपत्र घेऊन पहावं काय असाही विचार कट्टर ‘लोकसत्ता’ fan असलेल्या माझ्या डोक्यात येऊन गेलाय इतकं सरस लेखन ह्या अंकात दरवर्षी असतं. मला जर फक्त २-३ अंकच घ्यायचे असतील तर मी लोकमत, किल्ला आणि भवताल ह्या ३ अंकांची डोळे झाकून निवड करेन.

ह्या वर्षीचा अंकसुध्दा पुरेपूर वैचारिक खाद्य देणारा होता ह्यात शंकाच नाही. मग तो अफगाणिस्तानमध्ये डॉक्टर अहमद सर्मस्त ह्यांनी काढलेल्या ‘जोहरा’ नावाच्या वाद्यवृंदावरचा लेख असो की सोनम वांगचुक ह्यांच्या लडाखी शाळेवरचा लेख असो. आसाममध्ये एनआरसी वरून चाललेल्या गोंधळावरचा लेख असो नाहीतर गडचिरोली, भामरागड, दांतेवाडा आणि सुकमा हा नक्षलवादी भाग कशी कात टाकतोय त्यावरचा लेख असो. मध्येच एका लेखात आपल्याला ‘कयामतसे कयामत’ वाल्या मन्सूर खानने कुन्नूरमध्ये सुरु केलेल्या फार्मस्टेची माहिती मिळते. आंध्र प्रदेशात टेक्नोलॉजीचा वापर करून रोजगार हमी योजना अधिक लोकाभिमुख कशी करण्यात आलेय त्याबद्दल वाचायला मिळतं (महाराष्ट्राच्या प्रगतीचा डंका (उगाचच!) पिटणाऱ्या फडणवीस सरकारने हा लेख वाचायला हवा एकदा). उत्तर कोरियाच्या मानाने पुढारलेला समजल्या जाणाऱ्या दक्षिण कोरियातल्या जगण्यातले काही पैलू एखाद्या लेखातून उलगडतात.

एकीकडे स्त्रियांच्या घसरत्या जन्मदराबद्दल कुप्रसिध्द असलेल्या हरयाणातले नवे बदल मनाला सुखावून जातात तर दुसरीकडे युपीएससीच्या बाजाराबद्दल वाचून मन खंतावतं. काही लेख राहुल गांधी, दीपिका पादुकोण ह्यासारख्या well-known  व्यक्तींबद्दल काही वेगळी माहिती देतात तर एखादा लेख बेगम फरीदा खानम ह्यांच्यासारख्या (निदान माझ्यासाठी तरी!) अनोळखी व्यक्तीची ओळख करून देतात. अंकाचा समारोप गावाकडच्या गोष्टी घेऊन वेबसिरीज बनवणार्या तरुण मंडळीवरच्या लेखाने होतो.

थोडक्यात काय तर लोकमतचा दिवाळी अंक वाचायला मिळावा म्हणून तरी ह्या वर्षी दिवाळी लवकर यावी असं पुन्हा एकदा वाटून गेलं J

Thursday, February 14, 2019

My Conversations With Money - Shweta Jain

The Firm: The Story Of McKinsey - Duff McDonald

The Journey Within - Radhanath Swami

A Game Changer's Memoir - G. N. Bajpai

The Khyber Pass: A History Of Empire And Invasion - Paddy Docherty

Dandho Investor - Mohnish Pabrai

Animals In Translation - Temple Grandin, Catherine Johnson

Learning In Thin Air - Scott Kress

Crucial Conversations - Joseph Grenny, Al Switzler, Ron McMillan


The Art Of Thinking Clearly - Rolf Dobelli

Tools Of Titans: The tactics, Routines And Habits Of Billionaires, Icons And World-Class Performers - Timothy Ferris

Every Vote Counts: The Story Of India’s Elections – Navin Chawla

The Verdict: Decoding India’s Elections – Prannoy Roy, Dorab R. Sopariwala

The Great March Of Democracy – S.Y. Quraishi

Sunday, January 13, 2019

3. मुशाफिरी (दिवाळी अंक 2018)

'मुशाफिरी' हा २०१८ चा मी वाचायला घेतलेला तिसरा दिवाळी अंक. भटकंतीला वाहिलेले अंक माझ्या नेहमीच आवडीचे राहिले आहेत. आपल्याला सगळीकडे जायला जमणार नाही. मग लेख वाचून तिथे जाण्याचा आनंद आणि अनुभव दोन्ही मिळवता येतात. हो की नाही?

पहिलाच लेख 'रूपकुंड' वर पाहुन मस्त वाटलं. नुसतं बेस कॅम्पपर्यन्त जायचं तरी काय दिव्य करावं लागतं ते ह्या लेखातून चांगलंच समजलं. हे दिव्य करणाऱ्या लेखक असीम आव्हाड ह्यांना मनापासून दाद गेली. पुढला लेख म्यानमारवरचा. हां आपला शेजारी देश. मध्यंतरी रोहिंग्या मुस्लिमांच्या वादामुळे बराच गाजलेला. त्यापलीकडे त्याची फारशी माहिती नव्हती ती आतिवास सविता ह्यांच्या ह्या लेखामुळे झाली। काळ्या मानेच्या क्रौंच पक्षाच्या शोधमोहिमेवरचा श्री. द. महाजन ह्यांचा लेख, 'माणसं असलेल्या परग्रहावर' हां आईसलंडवरचा प्रकाश दिवाकर ह्यांचा लेख, 'सुई - दोरा ट्रेकची कहाणी ' (नचिकेत जोशी), पनामा कालव्यावऱचा जयप्रकाश प्रधान ह्यांचा लेख, राजस्थानमधल्या ऑफ़ -बीट ठिकाणांबद्दल माहिती देणारा आशिष महाबळ ह्यांचा लेख, यशोदा वाकणकरांचा मोरावरचा लेख, केरलवरचा स्मिता जोगलेकर ह्यांचा लेख खुपआवडले. नेहा घाटपांडेचा 'अवेळी पावसातलं कान्हा' वाचून आपणही पावसाळ्यात एखादं जंगल पहावं ऐसा नवा आयटम टूडु लिस्ट मध्ये जमा झालाय. बघू 'कायनात' कधी कृपा करते ते. ट्रेन हां अति-जिव्हाळ्याचा विषय असल्याने विनय खण्डागळे ह्यांचा भुसावल-दिल्ली प्रवासावरचा लेख जाम आवडला. दूसरा जिवलग विषय म्हणजे खाणं। जुई जोशींचा 'पूर्णब्रह्माशी गळाभेट' आणि पदमनाथ  डुंबरे ह्यांचा 'परमहंसांची दाल -बाटी' आवडले  त्यामुळे. जुई जोशींची करिड एग सेण्डविचची  रेसिपी  मेल करून  विचारली आहे. मिळते का पाहु.

'मेरु' नावाचा पर्वत अस्त्तित्त्वात आहे हेच मला माहित नव्हतं. त्यामुळे त्यावरचा सायली महाराव ह्यांचा लेख उत्सुकतेने वाचला. अगदी जवळ पोचून चढ़ाई न करण्याचा निर्णय घेणं खरंच कठिण। सायली घोटीकर ह्यांचा जॉर्जियामधल्या गर्दबनीतल्या प्रवासाचा वाईट अनुभव वाचून खंत वाटली. जॉर्जियासारख्या टिनपाट देशातसुध्दा 'इथे भारतीय लोक नकोत। ते आले की जात नाहीत' हे स्थानिकांचं मत बनण्यासारखी परिस्थिती आपण आणली आहे हे पाहुन खरोखर लाज वाटली. 'शेवटी फ्लाईट  मिळतेच आपल्याला' (रोहित भोसले) आणि 'पर्यटन म्हटलं की हेही आलंच' (उर्मिला चाकुरकर) वाचून प्रवासात अडचणी येणारे आपणच एकटे नाही हे जाणवून हायसं वाटलं. :-)

'बागा त्यांच्या आणि आपल्या' (मैत्रेयी केळकर), 'दक्षिणेतल्या डोंगरवाटांवर' (अपर्णा करमरकर), 'परदेशतला एक उनाड डीवास (पूनम छत्रे), 'कच्छच्या रणातली सायकल सफर (अमित गाडगीळ), 'आधुनिक भारत प्राचीन भारत' (मनीषा चितले) हे लेख ठीकठाक वाटले.

Laptop ने राम म्हटल्याने टेम्पररी Laptop वरुन transliteration वापरून ही पोस्ट टाकताना जाम दमछाक झाली. तुर्तास  इतकेच पुरे.