Wednesday, November 8, 2017

२. महाअनुभव (दिवाळी २०१७)

लोकसत्तात आलेलं अंकाचं परीक्षण वाचून हा अंक घेतला. मला नीटसं आठवत नाही पण बहुतेक २०१५ किंवा २०१६ च्या दिवाळीतसुध्दा हा अंक घेतला होता. पुढल्या दिवाळीपासून ह्यावर लक्ष ठेवायला हवं.

सगळ्यात आधी मला आवडलेल्या लेखांबद्दल. अतिशय आवडलेली गोष्ट म्हणजे रत्नाकर मतकरींची 'डोरोथीची गोष्ट'. ‘विझार्ड ऑफ ओझ' ह्या चित्रपटाबद्दल नुकतंच वाचलं होतं. त्यामुळे देशातल्या सद्यस्थितीचा संदर्भ घेऊन लिहिलेली ही गोष्ट जाम भावली. माननीय पंतप्रधानांना कोणीतरी भाषांतरित करून ऐकवली पाहिजे. ‘घाटमाथ्यावरून चालताना' हा प्रसाद निकते ह्यांचा त्यांनी दोन-अडीच महिने सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून चालत एकट्याने केलेल्या प्रवासावरचा लेख प्रवासाची आवड असलेल्या कोणालाही आवडावा असाच. द्वंद्व ही अभय बंग ह्यांची आणि 'आमचं त्रिकुट' हि सिद्धार्थ अकोलकर ह्यांची अश्या दोन कथा प्राणीविश्वावर आधारित आहेत. बुलबुलच्या तीन पिल्लांना मोठं करायला अकोलकरांच्या लहान मुलाने आणि सगळ्या कुटुंबाने जे कष्ट घेतलेत ते 'कबिल-ए-तारीफ' नक्कीच.

खारफुटीच्या जंगलांबद्दल खूप काही छापून येतं. पण त्यापलीकडे मला त्यांच्याविषयी काही माहिती नव्हती ती 'खारफुटीच्या जंगलात' ह्या अनिल अवचट ह्यांच्या रिपोर्ताजवरून मिळाली. दुसरा रिपोर्ताज हा आदर्श पाटील ह्यांचा 'न संपणारा वनवास' - कोयना धरणामुळे विस्थापित झालेल्या गावांवर आधारित. विकासाच्या नावाखाली सामान्य माणसाचे जे हाल होतात ते अचूक समोर मांडतो. डोनाल्ड ट्रम्प प्रेसिडेंट झाल्यापासून न्यू योर्करबद्दल बरंच वाचलं होतं. पण त्याचा इतिहास 'निळू दामले' ह्यांच्या लेखातून कळला. मेरील स्ट्रीप वरचा राजेश्वरी देशपांडे ह्यांचा लेख बरीच माहिती  असूनही थोडा विस्कळीत वाटला. शरद पवार ह्यांच्या कारकीर्दीचा आढावा घेणारा सुहास पळशीकर ह्यांचा लेख, ना. धो. महानोरांविषयी माहिती देणारा रामदास भटकळ ह्यांचा लेख, इस्लामपूरमध्ये राहणाऱ्या अन्वर हुसेन ह्या चित्रकारावरचा शर्मिला फडके ह्यांचा लेख आणि पश्चिम महाराष्ट्रात टायरचे बांध व्हावेत म्हणून झटणाऱ्या संपतदादा पवार ह्यांच्यावरचा गौरी कानेटकर ह्यांचा लेख हे सगळे वेगवेगळ्या विषयांवरच्या माहितीच्या शोधात असलेल्या वाचकांना पसंत पडतील असेच आहेत.

श्याम मनोहर ह्यांची 'योग्य तेवढे प्रेम' ही कथा काही कळली नाही. मध्यमवर्गीय पांढरपेशा समाजाला कधीच न दिसणारं असं जे एक जग असतं त्याची ओळख जयंत पवार ह्यांची 'मोरी निंद न सानी होय'  करून देते. पण मला असं अति-वास्तववादी काही पहावत किंवा वाचवत नाही. त्यामुळे ती फारशी आवडली नाही.

हे अपवाद वगळता अंक 'पैसा वसूल' होता ह्यात काही शंकाच नाही.

Sunday, November 5, 2017

http://www.loksatta.com/lokbhramanti/

http://www.loksatta.com/lekhaa-news/khau-gali-in-chennai-street-food-in-chennai-sundal-chennai-food-1568721/

http://www.loksatta.com/lekhaa-news/article-on-kolhapur-food-kolhapur-fast-food-kolhapur-speciality-kolhapuri-misal-1576015/


A Passion For Excellence - Tom Peters

Agile Software Development Ecosystems - by Jim Highsmith

User Stories Applied for Agile Software Development - by Mike
Cohn

R L Ackoff (1978), The Art of Problem Solving (John Wiley, New York).

My Startup Life: What a (Very) Young CEO Learned on His Journey Through Silicon Valley - Ben Casnocha


Some Patterns for Software Architectures - Mary Shaw

Stop Setting Goals if you Would Rather Solve Problems - Bobb Biehl

Goldratt, Eliyahu M. (2006). The Haystack Syndrome: Sifting Information Out of the Data Ocean. North Riven Press.

The Craft of Software Testing - by Brian Marick

Antipatterns: Refactoring, Software Architectures, and  Projects in Crisis - William J. Brown, Raphael C. Malveau,Hays W. "Skip" McCormick III, and Thomas J. Mobray
Kasse, T., McQuaid, P., ‘Software Configuration Management for Project Leaders’,
Software Quality Professional, September 2000.

Sutherland, Jeff (2013). Finish Early, Accelerate Faster.

WICKED PROBLEMS, RIGHTEOUS SOLUTIONS” - DeGrace & Stahl

J.R. Katzenbach and D.K. Smith, The Wisdom of Teams: Creating the High-Performance Organization

Rosemary Stewart, Managers and Their Jobs

Sune Carlson, Executive Behavior

Francis J. Aguilar, Scanning the Business Environment

Richard E. Neustadt, Presidential Power
--
Truman - by David McCullough

Hermann Hesse’s Journey to the East

Wednesday, November 1, 2017

Succeeding with Agile - by Mike Cohn

User Story Mapping - by Jeff Patton

Agile Product Management with Scrum - by Roman Pichler with Rakuten Kobo

Essential Scrum - by Kenneth Rubin

Drive: The Surprising Truth About What Motivates Us - by Daniel Pink

Wisdom of Teams - by Katzenbach, Jon R. and Smith, Douglas K.

The People's Scrum - by Tobias Mayer

Software Project Manager’s Bridge to Agility - Sliger, Michele and Broderick, Stacia

User Stories Applied - by Cohn, Mike

Disciplined Agile Delivery: A Practitioners’ Guide to Agile Software Delivery in the Enterprise - by Ambler, Scott M. and Lines, Mark

Roock, Arne (2012). Stop Starting, Start Finishing! Lean-Kanban University.

THE LEADER WHO HAD NO TIITLE - Robin Sharma
Indira: The Life Of Indira Nehru Gandhi – by Katherine Frank

My Years With Indira Gandhi - by P. C. Alexander

Indira Gandhi, A Biography - by Pupul Jaykar

Indiraji Through My Eyes - by Usha Bhagat

Mrs. Gandhi – by Dom Moraes

Indira Gandhi: Letters To An American Friend – by Dorothy Norman 
 
Mrs. Gandhi’s Second Reign – by Arun Shourie

A Cabinet Secretary Looks Around – by B. G. Deshmukh

The Judiciary I Served – by P. Jaganmohan Reddy

Six Crises - by Richard Nixon

१. लोकसत्ता (दिवाळी अंक २०१७)

ह्या वर्षीचा पहिला दिवाळी अंक. अमिताभ आणि इंदिरा गांधी ह्या दोघांवरचे लेख आहेत म्हणून खरं तर घेतलेला. पण अंकाने बरीच निराशा केली.

प्रथम  इंदिरा गांधी ह्यांच्यावरच्या लेखांबद्दल. तसं मला कुठल्याच राजकीय पक्षाबद्दल फारसं ममत्त्व नाही. पण तरी भारताची महिला पंतप्रधान म्हणून थोडासा सोफ्ट कॉर्नर होता. ‘होता' असंच म्हणावं लागेल कारण त्या पंतप्रधान होत्या त्या काळात 'राजकारण' हा विषय खिजगणतीतही नसण्याचं माझं वय होतं. आणीबाणी वगैरे गोष्टींचा गंध नव्हता. पण पुढे ह्यावर बरंच काही वाचलं. विचार केला. त्यांचेच काय पण कुठल्याच राजकारणी व्यक्तीचे पाय मातीचेच असतात हे पक्कं लक्षात आलं. सर्वसाधारण भारतीय माणसात आढळणारी व्यक्तीपूजेची भावना माझ्यात आधीही फारशी नव्हती आणि नंतर कधीच निर्माण झाली नाही.  पण तरी आधी कधी न वाचलेल्या काही गोष्टी कदाचित समजतील म्हणून मोठ्या अपेक्षेने लेख वाचले. त्यातल्या त्यात माधव गोडबोलेंचा लेख आवडला. मिसेस गांधींच्या कारकिर्दीतल्या अनेक घटनांचं चांगलं विवेचन त्यांनी केलंय. सुजाता गोडबोलेंचा लेख इंदिराजी आणि डोरोथी नॉर्मन ह्यांच्या मैत्रीवर छान प्रकाश टाकतो. संजीव केळकर आणि शशिकांत सावंत ह्यांच्या लेखांतूनही बरीच चांगली माहिती मिळाली. विनय हर्डीकर ह्यांनी मात्र मिसेस गांधींवरचा खुन्नस काढायला लेख लिहिलंय का काय असं वाटावं एव्हढा विखार त्यात आहे. लेख थोडा निष्पक्षपातीपणाने लिहिला असता तर बरं झालं असतं.

‘बिनीचे पर्यावरणवाडी' हा माधव गाडगीळ ह्यांचा लेख थोडा विस्कळीत वाटला पण आवडला. वा. द. वर्तक ह्यांचा 'हिर्डोशीचा हिरडा की कोळसा' हा १९६७ सालचा लेख वाचून आजही परिस्थितीत  फारसा फरक पडलेला नाही, उलट ती अधिक भीषण झालेली आहे हे जाणवलं. ह्या विषयावरची आणखी पुस्तकं मिळवून वाचली पाहिजेत असं प्रकर्षाने वाटलं. ‘परतून घराकडे' ह्या लेखाच्या नावावरून परदेशातून भारतात परतणार्या लोकांवर असावा असं वाटलं होतं पण प्रत्यक्षात त्यात 'The Wizard Of Oz’ ह्या चित्रपटाची मस्त माहिती मिळाली आणि आपण अजून तो पाहिलेला नाही ह्याची खंत वाटली. ‘Over The Rainbow’ हे गाणं डाऊनलोड करून ऐकणार आहे. :-) गुलझार हा माझा खूप आवडता गीतकार. पण त्याच्या कित्येक गाण्यांची नव्याने ओळख मृदुला बेळे ह्यांच्या 'मुझको भी तरकीब सिखा दे' ने करून दिली. खरंच मला गुलझार किती वरवर कळला होता. आता त्याची गाणी नव्याने ऐकायला खूप मजा येईल. त्यांची 'यार जुलाहे' हि कविता दिल्याबद्दल तर लेखिकेचे शतश: आभार. आता त्याच्या कविता कुठूनतरी मिळवून वाचल्या पाहिजेत. नाहीतर 'बेवजह जिंदगी जा रही ही' असंच म्हणावं लागेल :-)

अमिताभ बच्चन हाही माझा आवडता हिरो वगैरे नव्हे. खरं तर कुठल्याही चेनेलवर तो कधीही दिसतो त्यामुळे आजकाल त्याचं अजीर्णच झालंय. तरी हिंदी चित्रपटसृष्टी हा नेहमीच माझ्या कुतूहलाचा विषय राहिलेला आहे. अमोल पालेकर ह्यांचा अमिताभवरचा लेख आवडला. केवळ एक नट म्हणूनच नव्हे तर माणूस म्हणूनही त्यांनी अमिताभचं चांगलं निरीक्षण केलं आहे. राज ठाकरेंचा  लेखसुध्दा आवडला. आधी 'राज ठाकरे' हे नाव वाचून हे मनसेचेच राज ठाकरे का हा प्रश्न पडला होता पण लेखातली खुसखुशीत भाषा वाचून खात्री झाली. त्यामानाने 'यार अमिताभ' हा सतीश जकातदार ह्यांचा लेख फारसा आवडला नाही.

श्याम मनोहर ह्यांना 'परिवर्तन' ह्या कथेतून काय सांगायचं होतं ते कळलं नाही. कॉ. सीताराम येचुरी ह्यांचा लेख वाचायची इच्छा होती. (साम्यवाद, समाजवाद वगैरे भानगड आहे तरी काय हे एकदा जाणून घ्यायचं आहे!) पण सुरुवातीचे काही परिच्छेद वाचून पुढे वाचावंसं वाटेना तेव्हा सोडून दिला. मुकुंद तळवलकर ह्यांच्या लेखातून  भूतकाळातल्या काही व्यक्तींची माहिती झाली तरी हाही लेख बराच विस्कळीत वाटला. अर्थात लेखाचं शीर्षकच 'आठवणी दाटतात' असल्याने थोडा विस्कळीतपणा क्षम्य आहे :-) प्रणव सखदेव ह्यांची 'गर्भगळीत' सुरुवात छान केली असून शेवटाला ढेपाळल्यासारखी वाटली. 

कविता मला फारश्या कळत नसल्याने त्या विभागाबद्दल काही लिहित नाही.  चंद्रकांत कुलकर्णी ह्यांनी मराठी नाटकातल्या बदलाचा चांगला आढावा आपल्या लेखात घेतलाय. मला स्वत:ला नाटक पहायला खूप आवडतं म्हणून हा लेख विशेष आवडला. ‘मंजिले और भी है' हा हिंदी चित्रपटसृष्टीतल्या बदलांवरचा अमोल उदगिरकर ह्यांचा लेख, ‘बदलणारं चित्र' हा चित्रकलेच्या क्षेत्रातली स्थित्यंतरं दर्शवणारा लेख वाचनीय. विजय केंकरेनी दत्ता भट, डॉ. श्रीराम लागू, मधुकर तोरडमल ह्यांच्यासारख्या नटाबद्दल लिहिलेलं वाचून आपण काय काय मिस केलंय हे जाणवलं. ‘हर्बेरियम' तर्फे आलेलं 'पती गेले ग काठेवाडी' बघणार होतेच. आता कसंही करून जमवायचं असं  ठरवलंय. 

जागतिक राजकारण हाही आवडीचा विषय असल्याने 'अनिश्चीततेची सावली' हा सचिन दिवाण ह्यांचा लेख खूप इंटरेस्टिंग वाटला. प्रशांत कुलकर्णी ह्यांची व्यंगचित्रे मस्त. वार्षिक राशीभाविष्य कापून ठेवून त्याची सत्यासत्यता पडताळून पहायची दरवर्षीची उर्मी ह्याही वर्षी दडपली :-)

अरे हो, अंकाचा सुरुवातीला सुधीर पटवर्धन ह्यांनी 'एनिग्मा' ह्या चित्राचं जे विवेचन केलंय ते मात्र साफ बम्पर गेलं. :-)

Sunday, October 29, 2017

http://www.livemint.com/Money/wOHRlIjvFRhhrlsjhMpfZL/Books-that-your-fund-managers-read.html

Tent City - George Saunders

A Land Girl's Tale - by Mona McLeod

The Subtle Art Of Not Giving A F*uck - A Counterintuitive Approach To Living A Good Life - by Mark Manson

Thunder Dog: The True Story of a Blind Man, His Guide Dog, and the Triumph of Trust eBook: Michael Hingson, Susy Flory

Jim Farrell Books