लोकसत्तात आलेलं
अंकाचं परीक्षण वाचून हा अंक
घेतला. मला
नीटसं आठवत नाही पण बहुतेक
२०१५ किंवा २०१६ च्या दिवाळीतसुध्दा
हा अंक घेतला होता.
पुढल्या
दिवाळीपासून ह्यावर लक्ष
ठेवायला हवं.
सगळ्यात आधी मला
आवडलेल्या लेखांबद्दल.
अतिशय आवडलेली
गोष्ट म्हणजे रत्नाकर मतकरींची
'डोरोथीची
गोष्ट'. ‘विझार्ड
ऑफ ओझ' ह्या
चित्रपटाबद्दल नुकतंच वाचलं
होतं. त्यामुळे
देशातल्या सद्यस्थितीचा
संदर्भ घेऊन लिहिलेली ही गोष्ट
जाम भावली. माननीय
पंतप्रधानांना कोणीतरी
भाषांतरित करून ऐकवली पाहिजे.
‘घाटमाथ्यावरून
चालताना' हा
प्रसाद निकते ह्यांचा त्यांनी
दोन-अडीच
महिने सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून
चालत एकट्याने केलेल्या
प्रवासावरचा लेख प्रवासाची
आवड असलेल्या कोणालाही आवडावा
असाच. द्वंद्व
ही अभय बंग ह्यांची आणि 'आमचं
त्रिकुट' हि
सिद्धार्थ अकोलकर ह्यांची
अश्या दोन कथा प्राणीविश्वावर
आधारित आहेत. बुलबुलच्या
तीन पिल्लांना मोठं करायला
अकोलकरांच्या लहान मुलाने
आणि सगळ्या कुटुंबाने जे कष्ट
घेतलेत ते 'कबिल-ए-तारीफ'
नक्कीच.
खारफुटीच्या
जंगलांबद्दल खूप काही छापून
येतं. पण
त्यापलीकडे मला त्यांच्याविषयी
काही माहिती नव्हती ती
'खारफुटीच्या
जंगलात' ह्या
अनिल अवचट ह्यांच्या रिपोर्ताजवरून
मिळाली. दुसरा
रिपोर्ताज हा आदर्श पाटील
ह्यांचा 'न
संपणारा वनवास' -
कोयना धरणामुळे
विस्थापित झालेल्या गावांवर
आधारित. विकासाच्या
नावाखाली सामान्य माणसाचे
जे हाल होतात ते अचूक समोर
मांडतो. डोनाल्ड
ट्रम्प प्रेसिडेंट झाल्यापासून
न्यू योर्करबद्दल बरंच वाचलं
होतं. पण
त्याचा इतिहास 'निळू
दामले' ह्यांच्या
लेखातून कळला. मेरील
स्ट्रीप वरचा राजेश्वरी
देशपांडे ह्यांचा लेख बरीच
माहिती असूनही थोडा विस्कळीत
वाटला. शरद
पवार ह्यांच्या कारकीर्दीचा
आढावा घेणारा सुहास पळशीकर
ह्यांचा लेख, ना.
धो.
महानोरांविषयी
माहिती देणारा रामदास भटकळ
ह्यांचा लेख,
इस्लामपूरमध्ये
राहणाऱ्या अन्वर हुसेन
ह्या चित्रकारावरचा शर्मिला फडके
ह्यांचा लेख आणि पश्चिम
महाराष्ट्रात टायरचे बांध
व्हावेत म्हणून झटणाऱ्या
संपतदादा पवार ह्यांच्यावरचा
गौरी कानेटकर ह्यांचा लेख हे
सगळे वेगवेगळ्या विषयांवरच्या
माहितीच्या शोधात असलेल्या
वाचकांना पसंत पडतील असेच
आहेत.
श्याम मनोहर ह्यांची
'योग्य
तेवढे प्रेम' ही कथा काही
कळली नाही. मध्यमवर्गीय
पांढरपेशा समाजाला कधीच न
दिसणारं असं जे एक जग असतं
त्याची ओळख जयंत
पवार ह्यांची 'मोरी
निंद न सानी होय'
करून देते.
पण मला असं
अति-वास्तववादी
काही पहावत किंवा वाचवत नाही.
त्यामुळे ती
फारशी आवडली नाही.
हे अपवाद वगळता अंक 'पैसा
वसूल' होता
ह्यात काही शंकाच नाही.
No comments:
Post a Comment