आजच्या लोकसत्तात उत्सुकतेने 'रमा माधव' चं परिक्षण वाचलं. चित्रपटात ऐतिहासिक घटनांवर अधिक भर दिलाय पण रमा-माधव ह्यांची प्रेमकहाणी म्हणावी तशी चित्रित झालेली नाही ह्याबद्दल लेखकर्त्याला दू:ख झालेलं दिसलं. पण मला मात्र हे वाचून बरं वाटलं. मराठीत फारसे ऐतिहासिक चित्रपट निघत नाहीत. प्रेमकथा काय जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पैश्याला पासरी झाल्या आहेत. असो. तर हा चित्रपट पहावा असं पुन्हा वाटू लागलं आहे. येत्या १५ ऑगस्टला जमतं का ते पहायचं.
Sunday, August 10, 2014
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment