साहित्य:
तेल, शेवग्याच्या शेंगा, गूळ, हळद, तिखट, मीठ, पाणी, थालीपीठाची भाजाणी, तांदळाचं पीठ, मोहरी, हिंग, सुक्या लाल मिरच्या, ओलं खोबरं, कोथिंबीर
कृती:
१. शेंगाचे तुकडे करून उकळत्या पाण्यात घाला. त्यात गूळ, हळद, तिखट, मीठ घाला. झाकण लावून १० मिनिटं शेंगा शिजू दया.
२. त्यात २ मोठे चमचे थालीपीठाची भाजाणी आणि एक चमचा तांदळाचं पीठ घाला. ढवळत रहा म्हणजे गुठळ्या होणार नाहीत.
३. ५ मिनिटं झाकण लावून शिजवा.
४. ओलं खोबरं, कोथिंबीर घाला.
५. तेल तापवून मोहरी, हिंग, सुक्या लाल मिरच्या, हळद, तिखट घाला आणि ही फोडणी भाजीवर ओता.
(मेजवानी परिपूर्ण किचन, २८ एप्रिल २०१४)
No comments:
Post a Comment