लोकसत्तेत मोठा गाजावाजा करून प्रकाशित झालेलं वैद्य खडीवाले ह्यांचं 'पूर्णब्रम्ह' हे पुस्तक मोठ्या उत्सुकतेने विकत आणलं खरं पण पुस्तकाने साफ निराशा केली. साधारण सर्वच मराठी घरात होतात अश्या न्याहारी, भाज्या, आमट्या, भात ह्या प्रकारातल्या रेसिपीज पुस्तकात आहेत. पारंपारिक महाराष्ट्रीयन पदार्थ अभावानेच दिलेत. मात्र Russian Salad सारख्या पदार्थाचा उल्लेख आहे. बांधणीही एव्हढी विसविशीत आहे की आणून जेमतेम एक महिना झाला नाही तोच पानं सुटी व्हायला सुरुवात झाली आहे. :-(
असो. विस्मृतीत जाऊ पहाणारया पारंपारिक महाराष्ट्रीयन पदार्थांबद्दल मला लोकसत्तेतल्या एका लेखात मात्र छान माहिती मिळाली - विदर्भीय झटका, चवीचा ठसका. ह्या लेखाबद्दल लेखिकेचे मनापासून आभार!
असो. विस्मृतीत जाऊ पहाणारया पारंपारिक महाराष्ट्रीयन पदार्थांबद्दल मला लोकसत्तेतल्या एका लेखात मात्र छान माहिती मिळाली - विदर्भीय झटका, चवीचा ठसका. ह्या लेखाबद्दल लेखिकेचे मनापासून आभार!
No comments:
Post a Comment