हर्बेरियमतर्फ़े येणारं शेवटचं नाटक म्हणून ’झोपी गेलेला जागा झाला’ ची जाहिरात आली तेव्हाच ठरवलं होतं की काहीही झालं तरी हे नाटक चुकवायचं नाही. ह्याआधी आलेलं ’आंधळं दळतंय’ पाहणं मनात असूनही शक्य झालं नव्हतं. १ तास रांगेत उभं राहून मान आणि पाठीचं धिरडं करून घेऊन तिकिट घेतलं. आणि प्रयोग पाहिल्यावर त्याचं अक्षरश: सार्थक झाल्यासारखं वाटलं. :-)
विजू खोटे, सतीश पुळेकर, सुनिल बर्वे, संपदा जोगळेकर, दिन्यार तिरंदाजच काय पण इतर सहकलाकारांचीही काम सुरेख होती. चक्क भरत जाधवचं कामही मला आवडलं. खास लक्षात राहतील ते सतीश पुळेकरांचे डॊक्टर आठवले आणि सीआयडी इन्स्पेक्टर सावंत झालेल्या संतोष पवारांचा अभिनय. अफ़लातून! दिनूच्या घराचा सेटसुध्दा छानच होता. :-)
फ़क्त २५ प्रयोग आणि त्यामुळे तिकिट काढायला होणारी प्रेक्षकांची गर्दी नसती ना तर मी पुन्हा एकदा नक्की हे नाटक पाहिलं असतं. ’सूर्याची पिल्लं’, ’हमिदाबाईची कोठी’ आणि ’झोपी गेलेला जागा झाला’ सारखी नाटकं पहायची संधी दिल्याबद्दल सुनिल बर्वेचे खरंच मनापासून आभार! आणि पुढच्या वर्षीही हर्बेरियमतर्फ़े आणखी नाटकं घेऊन याच ही कळकळीची विनंती :-)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment