Monday, January 30, 2017

लोकसत्ता व्हिवाच्या २० जानेवारी २०१७ च्या अंकातल्या 'चेरीस पाव ते फिश कटलेट व्हाया बन मिरची' ह्या मनस्विनी प्रभुणे-नायक ह्यांच्या लेखातून घेतलेली गोव्यात करायच्या खादाडीची ही लिस्ट:

- मडगाव-पणजी रस्त्याला लागून असलेल्या 'आगाशी' गावातला चेरीस-पाव (बीफ चालत नाही आणि पोर्क आणि प्रोन्स आवडत नाहीत म्हणून चिकनवाले चेरीस खावे लागतील)
- पणजीतलं रस्सा-आमलेट
- पणजी चर्चवरून चालत पुढे गेलं की उजव्या हाताला केफे भोसले लागतं तिथले बन्स आणि मिरची भजी
- जवळच असलेल्या केफे सेंट्रल मधला मश्रुम समोसा
- त्याच रस्त्यावरच्या केफे आराममधली बटाट्याची कापं आणि कांदा भजी
- पणजीतला १८ जून रस्ता, 'चायपानी' नावाच्या स्टोलवरची बोंडा भजी
- मिरामार सर्कलवरून पुढे गेल्यावर डाव्या हाताला संध्याकाळी लागणाऱ्या डिसिल्व्हाच्या स्टोलवर मिळणारी फिश कटलेट्स (हा खरं तर बीफ कटलेट्ससाठी प्रसिद्ध आहे म्हणे. पण बीफ खाता येत नाही म्हणून फिश कटलेट्स)

अगदी आत्ताच फ्लाईट पकडून जावंसं वाटतंय :-)

No comments: