बाजीराव-मस्तानी चा निषेध करणारे जहाल व्हॉटसेप मेसेजेस आता जरा कमी झालेत असं म्हणे म्हणेतो काल एक आला. आणि शेवटी धमकीवजा संदेश - मराठी असल्याचा अभिमान असेल तर हा मेसेज फॉरवर्ड करा नाहीतर तिकीट काढून भंसालीचा गल्ला भरा - असा काहीतरी. वा! म्हणजे हा मेसेज आणखी दहा लोकांना पाठवला नाही तर मला महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान नाही? हे ठरवणारे हे कोण टोकम्मजी? मी एकालाही फॉरवर्ड न करता तो मेसेज डिलीट केला. आधीच्या सगळ्या मेसेजेस बद्दलही मी हेच केलं. आणि पुढे आले तरी हेच करणार.
मला असं नाही म्हणायचं की भंसालीने जे केलंय ते योग्य आहे. ह्या गाण्याचा प्रोमो मी फार उशिरा पाहिला. बेंबीच्या खाली नऊवारी नेसून (हे असं नेसता येतं हेही मला तेव्हाच कळलं!) नाचणाऱ्या काशीबाई आणि मस्तानी, भोवती शनिवारवाड्याचा सेट आणि वर पूर्ण चंद्र बघून का कोणास ठाऊक पुलं.नी म्हटलेल्या राधा-कृष्ण आणि वरून उडणारं विमान ह्या चित्राची आठवण झाली. कशाचा कशाशी सुतराम संबंध नाही. पण भंसालीला का दोष दया? तो पैसा करायला पिक्चर काढतो. इतिहास दाखवायला नाही.
मग एखादी मराठी निर्माता-दिग्दर्शक जोडी का नाही एखादा चित्रपट काढत बाजीरावावर? उच्च निर्मितीमूल्य असलेला. इतिहासाशी प्रामाणिक पण महाराष्ट्रीयनांसोबत अन्य भाषिकांना सुध्दा बघावासा वाटेल असा. नुसते निषेधाचे खलिते पाठवून काय होणार?

No comments:
Post a Comment