महाराष्ट्रीयन असूनही मी मराठी चित्रपट पहात नाही. कारण एकतर ते अति विनोदी असतात नाहीतर महागंभीर. आणि मला दोन्ही तऱ्हेच्या चित्रपटांचं वावडं आहे. पण ऐतिहासिक चित्रपट दोन्ही पठडीत मोडत नाहीत कारण इतिहास घडून गेलेला असल्याने स्टोरीलाईन आपल्याला माहीत असते. :-) "रमा-माधव" बद्दल वाचलं तेव्हा हा चित्रपट पाहिला पाहिजे असं वाटलं. पेशवाईचा काळ माझ्यासाठी नेहमीच कुतूहलाचा विषय राहिला आहे. त्यातून ओरिजिनल "रमा-माधव" म्हणजे मृणाल कुलकर्णी आणि रविंद्र मंकणी ह्या दोघांनी गोपिकाबाई आणि नानासाहेब पेशवे ह्या भूमिका कश्या केल्या आहेत ह्याबद्दलही उत्सुकता होतीच.
पण काल कुठल्यातरी मराठी चेनेलवर चित्रपटाच्या प्रोमोजमध्ये रमा-माधवावर चित्रित झालेलं romantic गाणं पाहिलं आणि मी चित्रपट बघायचा, निदान चित्रपटगृहात जाऊन बघायचा, बेत बदलला. म्हणजे ते दोघं गाणं गात बागेतून नाचत-बागडत नव्हते. पण तरी असं फिरण्याइतका वेळ माधवराव पेशव्यांकडे असेल असं वाटत नाही. प्रत्येक चित्रपटात गाणं असलंच पाहिजे हा सोस का? :-(

No comments:
Post a Comment