शाळेत असताना आठवी ते दहावी संस्कृत घेतलं होतं. दहावी झाल्यावर संस्कृत सुटलं. आज लोकसत्तात एक लेख आला होता त्यात वाचलं की छत्तीसगड मध्ये एक बाई गुरुकुल पध्दतीने संस्कृत व्याकरण शिकवतात - ४५ दिवस. गुरुकुल पध्दतीने शिकायचं आणि ते पण संस्कृत. मस्तच! संस्कृत परत कधीतरी पहिल्यापासून शिकायचं अशी खूप दिवसांची इच्छा आहे. देव करो आणि भविष्यात ह्या गुरुकुलात ते शिकायची संधी मला मिळो. :-)
Friday, August 8, 2014
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment