Tuesday, May 13, 2014

यळकोट यळकोट जय मल्हार

'तू तिथे मी' नामक महाभयंकर पिळवणूक १७ मे ला संपतेय ह्यावर विश्वासच बसत नाहीये. मला तर भीती वाटत होती की प्रिया, मंजिरी आणि त्यांच्या मुलींची गोष्ट एकता कपूरच्या 'कुसुम' ह्या सिरीयलीच्या वाटेने जाणार आणि प्रेक्षकांची वाट लावणार. ज्या कोण्या व्यक्तीने ही पिळवणूक थांबवली त्याला/तिला माझे शतश: धन्यवाद. मी वाट बघतेय ती १८ मे च्या संध्याकाळी ७ वाजताच्या ह्या स्लॉटवर सुरु होणार्या नव्या मालिकेची. मालिकेचं नाव आहे 'यळकोट यळकोट जय मल्हार'. अगदी प्रथम मालिकेबद्दल ऐकलं/वाचलं तेव्हा नेहमीचीच सास-बहु इस्टोरी आणि त्याला background म्हणून जेजुरीचा खंडोबा आहे की काय अशी भीती वाटत होती. पण नंतर वाचलं त्यानुसार आणि प्रोमोज बघून तरी असं वाटतंय की ही पौराणिक मालिकाच आहे. निदान माझ्या आठवणीप्रमाणे तरी झी मराठी वर सुरु होणारी ही पहिली पौराणिक मालिका असावी. अनेक वर्षापूर्वी अष्टविनायकांसोबत जेजुरीलाही जाऊन आल्याचं अंधुक आठवतंय. अंधुक अशासाठी की आम्ही तिथे रात्री पोचलो होतो आणि मी अर्धवट झोपेत होते. इथे हळदीचा भंडारा उधळला जातो एव्हढं ऐकून माहीत होतं. काही दिवसांपूर्वी ह्या भंडार्यात भेसळ असल्याने अनेक भक्तांना स्कीन एलर्जीचा त्रास होतो असंही वाचनात आलं होतं. खरं सांगायचं तर ह्यापलीकडे ह्या देवाविषयी मला काहीच माहिती नाही. म्हणून मालिकेबद्दल जास्त उत्सुकता वाटतेय.

प्रोमोजवरून निर्मितीमूल्य लाईफ ओके वरच्या 'देवोंके देव महादेव' सारखं असावं अशी आशा वाटतेय. काय ते कळेलच.

No comments: