सकाळी सकाळी विठूनामाचा गजर केल्यावर कसं बरं वाटलं. आज आषाढी एकादशी आहे ह्याची आठवण करून द्यायला पाऊस सकाळपासून येऊन बसलाय. ऑफिसला निघायच्या आधी टीव्ही लावला तर सगळ्या मराठी चॅनेल्सवर वारकरी, भगवे झेंडे आणि कटेवरी हात घेऊन विटेवरी उभी असलेली विठोबाची मूर्ती. बाजूला रखुमाई. बघूनच जीव एव्हढा एव्हढा झाला. "काळा" म्हणून तुकोबांच्या आवडीने हिणवलं असलं तरी त्याच सावळ्या रूपाने अवघ्या महाराष्ट्राला शतकानुशतकं वेडं केलंय आणि वेडं करत रहाणार आहे.
आमच्या नशिबी देवाचे पाय कधी दिसणं लिहिलंय माहित नाही. अगदी पंढरपूर नाही तरी देहू आणि आळंदी ह्यावर्षी त्याने घडवून आणावी एव्हढीच प्रार्थना आहे.
बोला "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल! श्री ज्ञानदेव तुकाराम"!
Wednesday, July 21, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment