Thursday, May 7, 2020

How about going on a safari to a tiger reserve in India, from the comfort of your own living rooms? Sounds interesting? Check out https://www.youtube.com/channel/UCzj_lZkssvEhK3GykJ0A1sw for the daily safaris in Maharashtra's Tadoba Andhari Tiger Reserve.

Take it from me. You will love it.
Sometimes it all seems so unreal - the life that you, I and the rest of the world is living right now. It almost seems as if we were watching a Hollywood movie like Contagion and somehow managed to walk out of our living rooms right into the movie. The virus that spreads through coughing and sneezing and kills people sounds rather apocalyptic, no? But somehow it has become our reality for the here and now, and perhaps for the near future as well.

A couple of weeks back I came across this question - what have you done in this lockdown that you have never before done in your life? The first answer that came to my mind was - wore a mask. But then I realized that I have never before in my life seen empty shelves in the grocery stores and at chemist shops. I have never been told that there is no soap left or that there are only a couple of packs of biscuits left, and that too of a single brand. This happens in countries that have been ravaged by wars or ruled by dictators, right? Countries that we won't be able to locate on the world map even if our lives depended on it. How did we all get here again?

People are busy fighting over whether China is to be blamed or not, whether the world can teach them a lesson or not. Whether to allow maids to come into the society premises or not. Celebrities are sharing things about them that we are supposed to find fascinating. Quite a few of them - who might not have set a foot in kitchens for years - have suddenly become expert cooks, dishing out a delicacy a day. There have been pictures of peacocks dancing on the streets in parts of Mumbai. News of the Himalayan peaks being sighted after eons from parts of Northern India. Everyone is talking about the Earth healing, rebooting, reinventing itself. Why, even the Ganga has managed to clean herself back again, it seems. Oh, and even though the Pentagon has released footage of some pilots seeing unidentified flying objects in the skies, no one is going gaga over it. Perhaps no one will bat an eyelid if the little green men do decide to make an appearance now. It will fit in right with the current scheme of things, no?

And yet, on more web pages than one, I see a rotating cube, giving the latest statistics about the number of the infected and the number of the dead. What am I supposed to do with these numbers? Lately, I find myself staring at the cube for a fraction of a second and then reaching over to close it. Again and again and again. No, I am not an insensitive person. Any loss of life is sad. But the constant daily barrage of news - whether I want it or not - has numbed me to all this. I do not know what is the truth and what is not. And I am tired of Googling for it every time.

They say there is light at the end of every tunnel. But this one seems interminable. The light seems light years away. At least for now. :-(

Tuesday, March 10, 2020

1. Shivaji Park, Dadar 28: History, Places, People - Shanta Gokhale

2. DRI & The Dons: The Untold Stories - BV Kumar

3. The Rules: Time-tested Secrets for Capturing the Heart of Mr. Right - Ellen Fein

4. The Little Prince by Antoine De Saint-Exupery

5. Books by Wilfred Thesiger


Monday, January 6, 2020

६. कालनिर्णय (दिवाळी अंक २०१९) (रुपये १४०)


कालनिर्णयचा अंक घ्यायचं माझं पहिलंच वर्ष. मेजेस्तिकमध्ये अंक घ्यायला गेले तेव्हा सहज म्हणून चाळला. इंटरेस्टीन्ग वाटला म्हणून विकत घेतला. वाचायला आत्ता मुहूर्त लागला.

खरं तर पहिल्याच लेखाचं शीर्षक वाचून पोटात धडकी भरली होती – गीता आणि गांधी. ह्या दोन्ही विषयांवर व्हॉटसएप युनिव्हर्सिटीमध्ये एव्हढं भरभरून येतं की आणखी काही वाचायलाच नको. पण प्रथम ग्रासे मक्षिकापात: असला प्रकार नको म्हणून लेख वाचायला घेतला. गांधीजींच्या गीतेविषयीच्या भुमिकेसोबतच डॉक्टर आंबेडकर, विनोबा भावे, विवेकानंद आदींच्या त्याबाबतच्या विचारांचा उत्तम उहापोह लेखात केलाय. लेखाच्या शेवटी एक संदर्भग्रंथांची छोटी सूचीही आहे. त्याचा वापर करायची वेळ ह्या जन्मात येणार नाही ही खात्री असल्याने त्याचा फोटो काढून घ्यायच्या भानगडीत अस्मादिक पडले नाहीत. J आंतरराष्ट्रीय (आणि आजकाल देशीसुध्दा) राजकारण हा आत्यंतिक जिव्हाळ्याचा विषय असल्याने ‘सेक्युलेरीझ्म कालबाह्य होत आहे का?’ हा लेख उत्तर माहित असूनही वाचला. तरी अजूनही काही मुद्दे ह्यात घेता आले असते असं वाटून गेलं.

पुढले काही लेख व्यक्तीचित्रणात्मक. ह्यात रामदास फुटाणे, परमवीर चक्र डिझाईन करणार्या मूळच्या स्विस असलेल्या सावित्री खानोलकर (हेही ज्ञान व्हॉटसएप युनिव्हर्सिटीतून मिळालेलं!), ना.धों. महानोर, महेश काळे अश्या परिचित व्यक्तीसोबत धोंड मास्तर, शशिकांत धोत्रे, डॉक्टर शरच्चंद्र विष्णू गोखले, छत्तीसगढमधली पंडवानी शैलीची गायनकला प्रसिध्द करणाऱ्या तिजनबाई, सत्तरच्या दशकातले प्रसिद्ध रहस्यकथा लेखक दिवाकर नेमाडे अश्या निदान मला तर अपरिचित असलेल्या व्यक्तींबद्दल छान माहिती मिळाली. सावित्री खानोलकर ह्यांच्यावरील लेखात इंद्रवज्राबद्दल बरीच माहिती असली तरी त्यामुळे लेख सावित्रीबाईंवरचा का इंद्रवज्रावरचा असा प्रश्न पडलाच. शशिकांत धोत्रेची चित्रं पाहून लहानपणी चित्रकलेच्या शिक्षकांवर उपकार म्हणून काढलेल्या महाभयानक चित्रांची आठवण होऊन हसू आलं.

आर्ट डेको हा शब्द बर्याच वेळा वाचनात आलेला असूनही तो गुगल करून पहाण्याची तसदी मी घेतली नव्हती. हे प्रकरण नेमकं आहे तरी काय हे प्रसिद्ध आर्किटेक्ट कामू अय्यर ह्यांच्या मुलाखतीत समजतं. हेल्वेटीका हे फोन्टसच्या लिस्टमध्ये अनेक वर्षं पाहिलेलं नाव. पण त्याच्या जन्माची कथा त्यावरला लेख वाचून कळली. सुचित्रा सेनवरचा बुरोशिवा दासगुप्तांचा लेख तिच्याबद्दल बरंच काही सांगून जातो. लदाखवरची महेंद्र सिंग ह्यांची छायाचित्रं सुरेख. इथं जायचं आहे हे पुन्हा एकदा जाणवलं. ‘रानभूल आणि चकवा’ हा नारायण डोंगरवार-पाटील ह्यांचा त्यांचे वडील माधवराव ह्यांना अरण्यात आलेल्या अनुभवांवरचा लेख खूप आवडला. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ हा लेख मेट्रोच्या कारशेडसाठी रात्री अपरात्री झाडं तोडणार्या ‘मी परत येणार’ छाप लोकांना वाचायला दिला पाहिजे. तरीही अक्कल येईल असं वाटत नाही.

कवितांचं आणि माझं कधी पटलं नाही ही बाब मी दिवाळी अंकांच्या परीक्षणात ह्याआधीही नमूद केली आहे. असं असूनही शिवकन्या शशी ह्यांची ‘काहीच नाही म्हणता म्हणता’ आणि ‘काचेवर थांबलेला पक्षी’ ही शर्मिला रानडे ह्यांची अश्या दोन्ही कविता फार भिडल्या. ‘आज पु. लं. असते तर’ ह्या भागातली व्यंगचित्रं भावली. पु.लं. खरंच असायला हवे होते असं वाटून गेलं. :-(

‘कालनिर्णय पाकनिर्णय २०२०’ मधल्या पाककृती मात्र निराशाजनक वाटल्या. एकही करून पहायची इच्छा झाली नाही. दिवाळी अंकातल्या कथा मला फारश्या आवडत नाहीत. ह्या अंकातल्या कथाही, एक ‘टेक्नोसेव्ही कुसुम’ सोडली तर, अपवाद नव्हत्या.

एकंदरीत वेगळ्या विषयावरचे लेख घेऊन आलेला अंक आवडला. पुढल्या वर्षी नक्की घेईन म्हणते.

Friday, November 22, 2019

४. भवताल (दिवाळी अंक २०१९) (रुपये २५०)


भवतालचे देवराई आणि जलव्यवस्था अंक मागल्या दोन वर्षी वाचले होते. त्यामुळे ह्या वर्षी अंकाकडून अपेक्षा बऱ्याच वाढल्या होत्या. पण अंकाने जराशी निराशाच केली.

तज्ञ मंडळी जेव्हा एखाद्या विषयाबद्दल सर्वसामान्य लोकांनी वाचायच्या प्रकाशनात लिहितात तेव्हा सर्वसामान्य लोकांना समजेल अश्या भाषेत लिहिणं अपेक्षित असतं. मग त्यात फार शास्त्रीय परिभाषा टाळणे, इंग्रजी शब्द लोकांच्या परिचयाचे असतील तर उगा मराठीतले जड प्रतिशब्द न वापरता इंग्रजी शब्द वापरणे, लेखात माहितीचा पसारा न मांडता थोडे मुद्दे घेऊन पण त्यावर विस्ताराने लिहिणे, एकंदर लिखाणाचा बाज आटोपशीर आणि सहज आकलन होण्यासारखा ठेवणे अशी अनेक व्यवधानं सांभाळण गरजेचं असतं. पण इथे दुर्लक्ष झालं तर ते लिखाण रुक्ष, कंटाळवाणे आणि नीरस होऊन बसतं. ‘महाराष्ट्राच्या मातीतील जीवांचा पट उलगडून दाखवणारा विशेषांक’ अशी थीम असलेल्या ह्या वर्षीच्या अंकातल्या काही लेखांचं दुर्दैवाने नेमकं तेच झालंय.

त्या लेखांचा उहापोह करायच्या भानगडीत न पडता जे लेख माहितीपूर्ण, रंजक आणि समजण्यास सोपे आहेत त्यांच्याविषयी लिहिते. पहिला लेख ‘दख्खनचे जागतिक बंध उलगडताना’. ह्या लेखात वरदा खळदकर ह्यांनी आता जिकडेतिकडे दिसते ती महाराष्ट्रीय अस्मिता म्हणजे नेमकं काय हे प्राचीन काळातील पिकं, प्राणी आणि खाद्यसंस्कृती ह्या सर्वांचा आधार घेऊन स्पष्ट केलंय. प्राचीन महाराष्ट्रात आढळणाऱ्या चित्रकला आणि शिल्पकला ह्यावरचा श्रीकांत प्रधान ह्यांचा लेख नक्कीच वाचण्याजोगा. नाणी आणि शिलालेख हा माझा अत्यंत आवडता विषय. डॉक्टर पद्माकर प्रभुणे ह्यांचा लेख म्हणूनच मी मोठ्या उत्सुकतेने वाचला. खरं तर त्यांनी अधिक विस्ताराने लिहायला हवं होतं असं वाटलं. ‘वनस्पतींचे कुळ आणि मूळ’ हा लेख तर माहितीचा खजिना आहे कारण त्यात भाज्या, धान्य, फुलं, औषधी वनस्पतीं आणि फळं ह्या पाच वर्गांत कोणती देशी आणि विदेशी पिकं आहेत त्याचं विस्तृत विवेचन आहे. आणि एव्हढं असूनही हा लेख अजिबात रटाळ झालेला नाही हे विशेष. बागकामात आणि शेतीत रुची असणाऱ्यांना हा लेख नक्की आवडेल असाच आहे.

वेरूळच्या लेण्यातल्या भित्तीचित्राच्या गिलाव्याच्या एका तुकड्यावरून त्यात कोणते घटकपदार्थ आहेत ह्याच्या घेतलेल्या शोधाबद्दल डॉक्टर मिलिंद सरदेसाई ह्यांनी एक छोटेखानी लेखात सांगितलं आहे. अशीच एक शोधकथा सुनील भोईटे ह्यांनी लिहिलेय - ‘पत्थरचाटू’ किंवा ‘पालमासा’ ह्या नावाने ओळखला जाणाऱ्या माशाच्या शोधाची.

डॉक्टर योगेश शौचे ह्यांनी महाराष्ट्रात राहणाऱ्या जीवाणूंची ओळख ‘जीवाणूंच्या विश्वात’ ह्या लेखात करून दिली आहे. कधी कोणाचं लक्षही जाणार नाही अश्या सर्वसामान्य गवतातही किती प्रकार दडलेले आहेत ह्याबद्दलची मनोरंजक माहिती प्रा. डॉक्टर श्रीरंग यादव ह्यांच्या ‘गवतांचे असणे’ मध्ये मिळते. पश्चिम घाटाच्या प्रदेशनिष्ठ पक्ष्यांवर धर्मराज पाटील ह्यांनी तर प्राण्यांवर डॉक्टर संजीव नलावडे ह्यांनी छान लेख लिहिलेत. हे दोन्ही लेख अधिक विस्तृत असते तरी चाललं असतं. महाराष्ट्रात आढळणाऱ्या काही वैशिष्ट्यपूर्ण देवराया आणि त्यातल्या अनोख्या वृक्षांची माहिती विनया घाटे ह्यांच्या ‘अधिवासी देवराया’ मध्ये मिळते.

तुम्ही महाडी, डांगी, तिवश्या ह्या तांदळाबद्दल ऐकलंय? सावा, भादली, बरटी ही तृणधान्ये माहित आहेत? इरवड आणि माळीव ह्या मिश्र पीक पध्दतीबद्दल काही माहिती? मलाही हे काही माहित नव्हतं. तांदूळ म्हणा, गहू म्हणा की कुठलं दुसरं अन्नधान्य. काही जाती सोडता आपल्याला त्यातला फरक कळत नाही. पण ह्या अन्नधान्यांच्या दर्जेदार स्थानिक वाणांबद्द्ल आणि ती टिकवण्याच्या प्रयत्नांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर विजय सांबरे ह्यांचा ‘गावरान वाण’ हा लेख वाचावा असाच आहे. नुसती पिकंच नव्हेत तर बैल, घोडा, गाय, शेळ्या-मेंढ्या ह्यासारख्या प्राण्यांच्या देशी जातीबद्दलसुध्दा ह्या लेखात वाचायला मिळतं. बदलतं हवामान माणसाच्या शारीरिक आणि सामाजिक परिस्थितीत कसा बदल घडवत गेलं ते डॉक्टर सुभाष वाळिंबेनी आपल्या ‘माणसाच्या पाऊलखुणा’ ह्या लेखात फार छान समजावून दिलंय. त्यापुढला डॉक्टर शौनक कुलकर्णीचा लेख गोंड, कोरकू, वारली, भिल्ल आदी आपल्याला माहित असलेल्या आणि मल्हार कोळी, दुबळा, पावरा अश्या कधी नावंही न ऐकलेल्या आदिवासी जमातींची आणि त्यांच्या रीतीभाती, सणांची ओळख करून देतो.

मूळच्या इथल्या नसलेल्या आणि स्थानिक वृक्षांना घातक ठरणाऱ्या झाडांची लागवड कशी धोकादायक ठरू शकते ते केतकी घाटेंचा लेख वाचून लक्षात येतं. तर ‘परदेशी वनस्पती सरसकट वाईट असं म्हणणं चुकीचं आहे. त्यांचा अतिरेकी वापर टाळला आणि त्या बेफाट वाढणार नाहीत एव्हढी काळजी घेतली म्हणजे झालं’ असा विचार मांडणाऱ्या विनया घाटे ह्यांच्या लेखाने अंकाची सांगता होते.

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे अंकातले पहिले काही लेख वाचून निराशा झाली खरी पण नेट धरून बाकीचा अंक वाचल्याने मनोरंजन आणि ज्ञानप्रबोधन असं दुहेरी समाधान पदरात पडलं.

Sunday, November 17, 2019

३. लोकसत्ता (दिवाळी अंक २०१९) (रुपये १४०)

लोकसत्ताच्या दिवाळी अंकात नेहमीच वैचारिक खाद्य मिळतं हा आजवरचा अनुभव असल्याने अंक मोठ्या उत्सुकतेने उघडला.

पहिला लेख विश्वनाथन आनंदवरचा. बुद्धिबळ खेळणाऱ्या लोकांबद्दल मला नेहमीच प्रचंड आदर. आनंदबद्दल आजवर पेपरमधून वाचलं असलं तरी त्याच्या कारकिर्दीबद्दल अथ पासून इति पर्यंत माहिती नव्हती. तशी ती करून घेण्याचंही काही कारण नव्हतं. सिध्दार्थ खांडेकर ह्यांच्या लेखाने ती झाली. आणि ती वाचून ह्या आयुष्यात बुद्धिबळाची निदान एखादा सामना समजण्यापुरती तरी ओळख करून घ्यावी अशी एक नोंद आधीच मोठ्ठी असलेल्या माझ्या लिस्टमध्ये झाली  हजारो ख्वाहिशे ऐसी.....

पुढला ‘स्थलांतर’ ह्या विषयावरचा लेखविभाग थोडा निराशाजनक वाटला. कारण ह्या विषयावर आधीच पेपरातून रकानेच्या रकाने भरून लिहून आलंय, येतंय. त्यामुळे हा विषय लोकसत्ताने दिवाळी अंकासाठी निवडावा ह्याचं थोडं आश्चर्य वाटलं. ‘भारत कधी कधी (च) माझा देश आहे’ हा गिरीश कुबेर ह्यांचा लेख सोडला तर बाकीच्यात तोच तोच मजकूर आहे असं वाटलं. ह्या विभागातले शेवटले ४ लेख त्यात का घातलेत असाही प्रश्न पडला. उदा. सत्यजित रेंच्या लग्नावरचा विजय पाडळकर ह्यांचा लेख छान आहे पण ‘स्थलांतर’ ह्या विषयाशी त्याचा काय संबंध ते कळलं नाही. मनोहर चंपानेरकर ह्यांनी हेडन, मोझार्ट, बेथोवन आणि शुबर्त ह्या चार पाश्चात्त्य संगीतरचनाकारांबद्दल चांगली माहिती दिली आहे. पैकी मोझार्ट आणि बेथोवन ऐकून माहित होते. बाकी दोघांविषयी आता कळलं. इतिहास सत्यघटना म्हणून कधीच नोंदवला जात नाही तर एखाद्या विचारप्रणालीला सोयीस्कर म्हणून लिहिला जातो हे श्रद्धा कुंभोजकर ह्यांनी त्यांच्या लेखात मांडलेलं मत एकदम पटलं. अतुल देऊळगावकर ह्यांचा एमेझोनच्या विध्वंसावरचा लेख अस्वस्थ करून गेला. एमेझोनच्या जंगलात लागलेली आग विझवण्यासाठी जी-७ च्या देशांनी दिलेली मदत नाकारण्याचा करंटेपणा करणाऱ्या ब्राझीलच्या अध्यक्षाना आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहोळ्याचं निमंत्रण आहे हे वाचून ‘हरे रामा!’ अशी प्रतिक्रिया झाली होती. उभ्या जगात हे एकच राहिले होते का आमंत्रण द्यायला? असो.

दुसरा विभाग ‘नाटक’ ह्या माझ्या अतिशय जिव्हाळ्याच्या विषयावरचा. एकूण एक लेख अप्रतिम. मग तो शांता गोखलेंचा मुंबई-पुणेच्या पलीकडे मराठी नाटकं आजकाल का जात नाहीत ह्याची कारणं शोधणारा लेख असो वा लहान मुलांसाठीची नाटकं बसवताना आलेल्या अनुभवावर आधारलेला माधव वझेंचा लेख असो. नाटकाचे दौरे का कमी झालेत ह्यावर अभिराम भडकमकर ह्यांचा लेख प्रकाश टाकतो. नाटक म्हटलं की व्यावसायिक रंगभूमीच आठवते. पण संगीत, बालरंगभूमी, हौशी, प्रायोगिक, महाविद्यालयीन अश्या अनेक प्रकारच्या रंगभूमीबद्दल जयंत पवार ह्यांच्या लेखात वाचायला मिळतं. ’गांधीजी आणि व्यवहारी राजकारण’ आणि ‘आकाश धरतीको खटखटाता है’ हे दोन्ही लेख नाटकविभागात का घातलेत ते कळलं नाही. पैकी पहिला लेख गांधीजीच्या विचारप्रक्रीयेबद्दल चिंतन करणारा आणि वाचकांकडून करवून घेणारा असा आहे. दुसरा लेख ‘विनोदकुमार शुक्ल’ ह्या हिंदी लेखकाची ओळख करून देतो. हिंदी लेखकांचं साहित्य वाचायला हवंय ह्याची पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणीव झाली.

तिसरा विभाग ‘वेब विश्व’. सध्या क्रेझ असलेल्या वेब सिरीज ह्या विषयावरचा. विभावरी देशपांडे, हृषीकेश जोशी आणि गिरीश कुलकर्णी तिघांचे लेख उत्तम. पैकी हृषीकेश जोशींचा लेख वेब सिरीज हे प्रकरण मुळात काय आहे इथपासून सुरुवात करून त्याचं अर्थकारण, ह्या इकोसिस्टीम मधले विविध घटक, त्यातल्या बऱ्यावाईट गोष्टी सगळ्याची यथास्थित छाननी करतो. मला हा लेख फार आवडला. तूर्तास तरी podcasts मध्ये रमले असल्याने वेब सिरीज हे प्रकरण मी समजूनउमजून दूर ठेवलंय. सध्या तरी त्यात पडण्याचा विचार नाही. पण पुढेमागे एखाददुसरी सिरीज पाहण्याचा विचार करायला मला ह्या लेखांनी भाग पाडलं हे नक्की. ‘इव्हिनिंग इन पेरीस’ ही डॉक्टर शरद वर्दे ह्यांची गोष्ट खास वाटली नाही. शेवटी काहीतरी ट्वीस्ट असेल असं वाटलं होतं. पण पदरी निराशाच आली.

शेवटच्या विभागात चित्रपटांच्या दुनियेत सध्या चलनी ठरलेल्या बायोपिक्सचा लेखाजोखा रेखा देशपांडे आणि अमोल उदगीरकर दोघांनी सुरेख मांडला आहे.

अंकाच्या सुरुवातीला थोडी निराशा झाली असली तरी पुढल्या लेखांनी ती उणीव नक्कीच भरून काढली. विचारांना चालना देणारं बरंच काही वाचल्याचं समाधान अंकाने पुरेपूर पदरात टाकलं.