अंकात काय आहे ह्याची खातरजमा न करता खुशाल डोळे झाकून विकत घ्यावा अश्या काही मोजक्या अंकांपैकी लोकमत एक आहे. गेली २ वर्षं मी दिवाळीला हा अंक विकत घेतेय. अजून पर्यंत निराशा झालेली नाही. ह्या वर्षी अंकात काय लेख असतील ह्याची भलती उत्सुकता होती. वाचायला थोडा वेळ मिळेल असं वाटलं तेव्हाच मी कपाटातून अंक काढला.
पहिलाच लेख आमीर खानच्या पाणी फाउंडेशनवरचा. सततच्या दुष्काळावर मात करता यावी, पाणी अडवून जिरवायचं महत्त्व गावोगावच्या शेतकऱ्याना कळावं ह्यासाठी काम करणारी ही संस्था. ह्या कामात येणाऱ्या अडचणीवर मात करून त्यांनी हे काम कसं सुरु ठेवलंय, त्यात आलेले बरेवाईट अनुभव, गावातल्या लोकांची जिद्द, आपल्या समस्यांवर त्यांनीच शोधलेले अनोखे उपाय हे सगळं वाचणं विलक्षण रोमांचकारी आहेच पण खूप काही शिकवणारंदेखील आहे. सरकारची वाट न बघता आपले प्रोब्ल्मेस आपणच सोडवायचे असं एकदा ठरवलं की माणसं कायकाय करू शकतात ह्याचं ही संस्था एक उत्तम उदाहरण आहे.
बाबा, संन्यासी, साधू, महात्मे ह्या सगळ्या प्रकारांबद्द्ल नाही म्हटलं तरी माझ्या मनात एक प्रकारचा आकस आहे. ह्या सगळ्यांचे पाय शेवटी मातीचेच आहेत ह्याबद्दल खात्रीच आहे माझी. त्यामुळे 'पतंजली' च्या उत्पादनांबद्दल आधी ऐकलं तेव्हा 'घ्या, पतंजलीच्या नावावर पैसे राजरोस पैसे करताहेत आता' अशीच भावना झाली आणि ती अजून तशीच आहे. त्यात ही उत्पादनं कशी बनवली जातात, त्यात नमूद केलेले घटक आहेत की नाहीत ह्याची बाहेरच्या जगाला कुठलीही शहानिशा करू दिली जात नाही हे कुठेतरी वाचनात आलं आणि ह्यातलं एकही प्रोडक्ट आपण वापरायचं नाही हे मी ठरवून टाकलं. तरी एक कंपनी, एक brand म्हणून 'पतंजली' बद्दल उत्सुकता होतीच . ती 'कहो न, करो' ह्या लेखाने थोडीफार शमली. कंपनीची सुरुवात कशी झाली, त्याचं व्यवस्थापन कसं चालतं, तसंच कंपनीचा चेहेरा असलेले बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण ह्यांच्यासंबंधी बरीच माहिती ह्या लेखातून मिळते. अर्थात ह्या दोन व्यक्ती आणि कंपनी ह्यांचा फक्त उदोउदो न करता त्यांच्यासंबंधात असलेले प्रवाद, काही टोचणारे मुद्दे ह्यांचाही आवर्जून समावेश लेखात आहे हे सांगावसं वाटतं.
कुठलीही गोष्ट कठीण नाही हे सांगताना 'रॉकेट सायन्स नाहीये ते' असं आपण सर्रास म्हणतो. हे रॉकेट सायन्सच नव्हे तर उपग्रह - मग ते भारताचे असोत वा इतर देशांचे - अवकाशात सोडणे ह्याबद्दल ख्याती असलेल्या इस्रो ह्या मान्यवर संस्थेबाबत लेख ह्या अंकात समाविष्ट केल्याबद्दल संपादक मंडळाचं खरं तर कौतुकच करायला हवं. रॉकेट आणि उपग्रह ह्याशिवाय सामान्य माणसाचं आयुष्य विज्ञानाच्या मदतीने सुसह्य व्हावं ह्यासाठीसुध्दा ही संस्था काम करते हे निदान मला तरी प्रथमच कळलं. इस्त्रोचा इतिहास, कार्यपध्दती, शिस्त, संशोधन ह्याविषयी खूप मोलाची माहिती ह्या लेखातून मिळते.
Sanitary napkins हा विषय शहरातूनसुध्दा फार उघडपणे चर्चिला न जाणारा. गावात तर ह्याचा वापर दूरच, ह्याविषयी फार माहितीही असणं दुरापास्त. अशी स्थिती असताना गावातल्या बायकांना वापरता येतील असे स्वस्त पण दर्जेदार napkins बनवण्यासाठी झटलेल्या अरुणाचलम मुरुगनाथम ह्या अफलातून माणसाची कहाणी विश्वास बसू नये अशीच आहे. घरच्या बायकांचा विरोध, समाजातून होणारी कुचेष्टा, आर्थिक ओढाताण सगळं सगळं सहन करूनही ह्या माणसाने आपली जिद्द सोडली नाही. आज गावातल्या बायकांना परवडतील असे napkinsत्या स्वत:च बनवतात, ते विकतात ह्या अशक्य वाटेल अश्या गोष्टीचं सारं श्रेय अरुणाचलम ह्यांना आहे. Hats Off!
ह्या लेखांव्यतिरिक्त ८०७ शाळांतल्या एक लाख तीस हजारांहून अधिक मुलांना सकस, स्वच्छ आणि ताजं गरमागरम जेवण रोज दुपारी पुरवणाऱ्या अक्षयपात्र ह्या योजनेची माहिती देणारा ‘अक्षयपात्र’, आपल्या अथक प्रयत्नांनी गावोगावच्या जिल्हा परिषदांच्या दुर्लक्षित शाळांचा कायापालट करणाऱ्या तरुण धडपड्या शिक्षकांवरचा 'डिजिटल शाळा', गुजरातेतल्या धुंडी गावातल्या सहकारी तत्वावर सौर उर्जा निर्माण करणाऱ्या शेतकर्यांवरचा ‘शेतात जेव्हा वीज पिकते', चीनच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणाऱ्या भारतीय सैन्यावरचा 'बुमला पास', तसंच अन्नपूर्णादेवी, आलिया भट, रजनीकांत ह्या व्यक्ती आणि व्हीएफएक्स हे तंत्रज्ञान ह्यांच्याविषयीची माहिती देणारे लेखसुध्दा वाचनीय.
‘तिघी' मध्ये ३०० हून अधिक वडाची झाडं लावून पोटाच्या मुलाप्रमाणे त्यांचा सांभाळ करणाऱ्या थिमक्का, तरुणाला लाजवतील अश्या चपळाईने योगासनं करणाऱ्या ९८ वर्षांच्या नानम्मल आणि वय वर्षं १०६ असतानासुध्दा शेतात चूल पेटवून स्वयंपाक करणाऱ्या मस्तानम्मा भेटल्या. ह्या तिन्ही आजीबाईना अक्षरश: लोटांगण घातलं मी मनातल्या मनात. हे वर्ष संपत आलं असताना ह्या सगळ्या भेटल्या ते बरंच आहे. पुढच्या वर्षीचे संकल्प तडीस नेताना कठीण जाईल तेव्हा ह्यांची आठवण केली तरी पुरे :-)
फक्त शर्मिला फडके ह्यांचा अमृता शेरगिलवरचा लेख मला खास आवडला नाही. तिच्याविषयीची फार माहिती नव्हती.....नुसतेच शब्दांचे बुडबुडे.
एक मनोरंजक पण माहितीपूर्ण अंक वाचल्याचं पुरेपूर समाधान ह्या अंकाने पदरात टाकलं. दिवाळी अंकाकडून आणखी काय अपेक्षा असते?

No comments:
Post a Comment