परवा संध्याकाळी एका मैत्रिणीचा व्होट्सएपवर मेसेज आला....अगदी अर्जंट - रफार आणि रकार मधला फरक काय. नाही म्हटलं तरी मी थोडी उडालेच. कोणाकडून काय मेसेज यावेत ह्याचे आपले काही ठोकताळे असतात. ही मैत्रीण मूळची दाक्षिणात्य. लग्न केलंय गुजरात्याशी. हिच्याकडून अशी विचारणा झाल्यावर १-२ सेकंद मला काही कळेचना. मग हा 'रकार' काय आहे ते कळेना. तरी तिला 'रफार' म्हणजे काय ते सांगितलं. आणि मग विचारलं की तुला 'रकार' म्हणजे काय ते हवंय का? उत्तरादाखल एक छोटी इमेज आली. त्यात सिलेबसचा काही भाग होता. त्यात एक ओळ होती - रकार आणि रफार. आता ही काय मराठीची परीक्षा देतेय काय? विचारलंच. तर म्हणाली लेकीची परिक्षा आहे, ती आणि मी परिक्षेच्या आदल्या दिवशीच अभ्यास करतो. तरी मला अजून रकाराची भानगड लक्षात येत नव्हती. शेवटी समस्त लज्जा त्यजुनी 'मला माहीत नाही' असं सांगून मोकळी झाले आणि गुगलमहाराजांना शरण गेले. काय गम्मत आहे पहा. आपल्याच लिपिबद्दल माहिती मिळवायला गुगलची मदत घ्यावी लागली. ३-४ साईट्स धुंडाळल्यावर 'प्र' मधला 'मोडका र' म्हणजे 'रकार' हा साक्षात्कार जाहला. मग मैत्रिणीला मेसेज केला. बहुतेक तोवर तिला उत्तर मिळालं असावं. तरी तिचा Thanks चा मेसेज आला.
पण मला अजूनही लाज वाटत होती. म्हटलं बाई ग, शाळा सोडून इतकी वर्षं झाली, व्याकरणाचा आणि माझा संबंध नाही. तिनेही 'जाने दो' वगैरे म्हटलं.
तरी मी अजून दुग्ध्यात आहे - रफार म्हणजे काय हे मला लक्षात असायला हवं होतं का?
पण मला अजूनही लाज वाटत होती. म्हटलं बाई ग, शाळा सोडून इतकी वर्षं झाली, व्याकरणाचा आणि माझा संबंध नाही. तिनेही 'जाने दो' वगैरे म्हटलं.
तरी मी अजून दुग्ध्यात आहे - रफार म्हणजे काय हे मला लक्षात असायला हवं होतं का?
No comments:
Post a Comment