बाहेर जेवायला जाताना मी शक्यतो मराठी उपहारगृहात जात नाही. घरी जेवतो तसंच जेवण बाहेर जाऊन खाण्यात काय मतलब आहे, नाही का? पण त्या दिवशी मात्र का कोणास ठाऊक, मराठी जेवण जेवावंसं वाटलं आणि पावलं वळली ती शिवाजी पार्कच्या जिप्सीकडे. त्या दिवशीच्या मेन्यूत अंबाडीची भाजी बघून क्षणभर ती ऑर्डर करायचा मोह झाला खरा पण मी तो आवरला. आवडली नाही तर जेवण पानात टाकता येत नाही, संपवावी लागेल. मग ऑर्डर केल्या दोन डिशेस - तांदळाची भाकरी आणि झुणका आणि तांदळाची भाकरी आणि भरली वांगी :-)
|
तांदळाची भाकरी आणि भरली वांगी |
|
तांदळाची भाकरी आणि झुणका |
No comments:
Post a Comment