Saturday, November 21, 2015

ह्या वर्षी अजूनपर्यंत तरी फक्त लोकसत्ता दिवाळी अंकच वाचून झालाय. "धनंजय" आणून ठेवलाय पण एव्हढ्यात वाचायला मिळेल असं वाटत नाही. २-३ दिवसांपूर्वी लोकसत्ताच्या दिवाळी अंकाच्या माहितीत 'आकंठ' बद्दल वाचलं आणि थेट आयडियल गाठलं. त्यांचं दिवाळी अंकांचं प्रदर्शन सुदैवाने अजून चालू आहे. तिथे 'आकंठ' तर मिळालाच पण 'मुशाफिरी' आणि 'भटकंती' सुध्दा हाती लागले. आणखी काही खरेदी करायची होती म्हणून 'दीपोत्सव' आणि 'किल्ले' घेतले नाहीत. प्रदर्शन ३० तारखेपर्यंत आहे तेव्हा पुढल्या आठवड्यात जाऊन तेही घेऊन येईन. :-)

No comments: