अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मला हे पुस्तक अनुवादित वाटलं होतं. कारण विजया मेहतांची विजया जयवंत आणि विजया खोटे ही ओळखच मला माहीत नव्हती. त्यांनी बेरीस्टर ह्या नाटकात भूमिका केली आहे हे मला माहित होतं तसंच रंगायनबद्दल थोडंसं कुठेतरी वाचल्याचं आठवत होतं. पण विजयाबाई ह्या मूळच्या मराठी आहेत ही नवी माहिती होती. आपण त्यांचं मूळ पुस्तक वाचतोय हे समजताच खूप मस्त वाटलं.
पुस्तकाची पहिली काही पानं वाचणं थोडंसं जड गेलं. विजयाबाईंच्या आईचं, आजीचं, त्यांच्या कुटुंबातल्या आधीच्या पिढीतल्या काही स्त्रियांचं आयुष्य कसं गेलं ते वाचून अंगावर काटा आला. कसं जगात असतील ह्या बायका, किती जबरदस्त घुसमट, स्वत:च्याच आयुष्यावर ताबा नसणं, एव्हढासा आनंद मिळवायला करावा लागणारा सायास, सगळं अगम्य. हे सगळं काही मी नव्याने वाचत नव्हते. पण एव्हढा त्रास झाला वाचताना की पुस्तक बंद करून काही क्षण नुसतीच बसले. :-( तेव्हाच्या काळातल्या चालीरीती, सणवार ह्यांची माहिती वाचून मात्र किती आणि काय काय आपल्या सर्वांच्या हातातून निसटून गेलंय हे वाचूनही थोडीशी खंत वाटली.
पुढची पानं वाचताना मात्र प्रकर्षाने वाटलं की नाटकावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचायलाच हवं. अल्काझी आणि आदी मर्झबान ह्यांच्याकडून काय काय शिकायला मिळालं ह्याचं विस्ताराने वर्णन आहे. एक नट म्हणून आणि एक दिग्दर्शक म्हणून विजयाबाईनी केलेले नवनवे प्रयोग, नाटकं बसवायचं म्हणताना अनेक गोष्टींची ठेवावी लागणारी व्यवधानं, भूमिकेचा बारकाईने करावा लागणारा विचार, त्यासाठी वापरावी लागणारी तंत्रं उदा. इमप्रोव्हायझेशन, त्या अनुषंगाने येणारे Body Image सारखे concepts, नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना, संवाद अश्या नाटकांशी संबधित अनेक बाबींचा उहापोह ह्यात आहे. विशेष म्हणजे हे सगळं कुठेही रटाळ किंवा किचकट होत नाही. बाईंनी दिग्दर्शित केलेल्या तसंच त्यांचा अभिनय असलेल्या अनेक नाटकांचा मनोरंजक वृत्तांत वाचनीय आहे. पैकी बेरीस्टर, पुरुष, संध्याछाया ही नाटकं पहाणं झेपणारं नाही हे माझ्या पूर्वीच लक्षात आलं आहे. पण शाकुंतल, हयवदन, मुद्राराक्षस, लेटर्स टू माय डॉटर, नागमंडल, पीटर ब्रुक ह्यांचं महाभारत, स्मृतीचित्रे ही नाटकं दूरदर्शनवर पहायला मिळावीत अशी खूप इच्छा आहे. हमीदाबाईची कोठी नाटकाच्या मूळ प्रयोगात विजयाबाई हमीदाबाई आणि नीना कुलकर्णी शब्बो झाली होती हे वाचून मजा वाटली. मी पाहिलेल्या हमीदाबाईच्या प्रयोगात नीनाने हमीदाबाई साकारली होती तर शब्बो झाली होती मनवा नाईक. :-) Avignon चा जुलै महिन्यात होणारा आर्ट फेस्टिव्हल कधीकाळी अनुभवायला मिळावा अशीही इच्छा झाली. इतकंच काय तर शाळा-कॉलेजात असताना मजा म्हणून का होईना पण एखाद्या नाटकात भाग घेऊन पाहायला हवा होता अशी चुटपुटही ह्या पुस्तकाने लावली.
लाईफलाईन ही दूरदर्शनवरची माझी आवडती सिरियल विजयाबाईनी दिग्दर्शित केली होती हे मला माहीतच नव्हतं. ह्या अश्या जुन्या मालिका दूरदर्शनने पुन:प्रक्षेपित कराव्यात असं मलाही त्यांच्याप्रमाणेच प्रकर्षाने वाटतं.
एका वेगळ्या विषयावरचं ज्ञान देणारं, एका वेगळ्या कालखंडाची ओळख करून देणारं असं हे पुस्तक कुठल्याही नाटकप्रेमी मराठी माणसाने वाचावं असंच आहे.

No comments:
Post a Comment