माझ्या यंदाच्या दिवाळी अंक वाचनाची सुरुवात लोकसत्ताच्या अंकापासून झाली. अभिराम भडकमकर ह्यांच्या आगामी कादंबरीतलं प्रकरण खूप आवडलं. 'डेली सोप्स' हा जो काही तापदायक प्रकार टीव्हीवर रोज संध्याकाळी घरोघरी चालू असतो त्याचं पडद्यामागचं कटू वास्तव - स्ट्रगलर्सची धडपड, आशा-निराशेचे क्षण, पोलिटीकली करेक्ट राहण्यासाठी लेखकांना करावी लागणारी तडजोड, त्यातून होणारी सुमार दर्जाची निर्मिती आणि पर्यायाने चांगलं काम करायची इच्छा असलेल्या लोकांची होणारी घुसमट - एका प्रकरणातून सुध्दा जळजळीतपणे सामोरं येतं. वाचायला हवी ही कादंबरी.
'विवेकाचा आवाज हरवलाय' ह्या लेखमालेमागची कल्पना स्तुत्य आहे पण शुध्द मराठीत लिहायच्या नादात ह्यातले काही लेख उगाच क्लिष्ट झाले आहेत असं आपलं मला वाटलं. गिरीश कुबेर ह्यांचं लोकसत्तातलं स्तंभलेखन वाचलं असल्याने तो लेख मात्र मी नेट लावून वाचला आणि आवडलाही. पण राजेश्वरी देशपांडे आणि डॉ. भारत पाटणकर ह्यांचे लेख वाचायच्या फंदात मी पडले नाही. नाही म्हणायला 'महाराष्ट्र - सामाजिक यादवीच्या उंबरठयावर' हा प्रताप आसबे ह्यांचा लेख वाचला ह्याचं समाधान आहे. तरीही कदाचित कुठल्याही प्रकारचं गंभीर विश्लेषणात्मक लिखाण वाचायची सवय आता मोडली असावी ह्याचा विषाद मात्र कुठेतरी जरुर आहे.
'लेखक आणि ग्रेट डिप्रेशन' मधून एका नव्या अमेरिकन लेखकाची ओळख झाली. त्याची सगळी पुस्तकं आता माझ्या टू-रीड लिस्टमध्ये. 'राजकीय दहशतीचा उदयास्त' ह्या मालिकेतले चारही लेख सुरेख. किशोर प्रधान ह्यांना टीव्हीवर बघूनसुध्दा किती वर्ष झाली. ह्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने त्यांच्या कलाजीवनाच्या प्रवासाची मस्त माहिती मिळाली - तीही त्यांच्याच शब्दांत. गुलजार ह्यांची 'चिन्हं आणि चेहेरे' न आवडायचा सवालच नव्हता. मीनाकुमारीवरची कविता फार चटका लावून गेली.
टिंग्या आणि फेडरी च्या लेखकाचं मनोगत, मिठालाही इतिहास आहे, संगीत शारदा वरचा लेख आणि गणितज्ञ सुभाष खोत ह्यांची मुलाखत काहीतरी वेगळें वाचल्याचं समाधान देऊन गेले.शेवटच्या न्यू यॉर्कर मधल्या व्यंगचित्रांवरच्या लेखामुळे त्यातली सगळी व्यंगचित्र एकदा पहायचीच असं वाटलं.
अंकाच्या शेवटचा भविष्याचा भाग न वाचण्यासाठी असतो असा माझा गेल्या काही वर्षांचा अनुभव आहे :-)
एकूणात सुरुवात तर चांगली झाली आहे. टेबलावर पडलेले धनंजय आणि नवल खुणावताहेत. पाहू कसं जमतंय ते.

No comments:
Post a Comment