Saturday, June 7, 2014

क्षुल्लक कारणावरून बसच्या स्त्री वाहकाला पुरुष प्रवाशाने मारहाण करण्याच्या घटनेबद्दल वाचून मनस्वी चीड आली. आजूबाजूच्या पुरुषांनी (ह्यात ती ज्या वयस्कर ड्रायव्हरच्या बाजूने बोलली तोही होता) जवळजवळ अर्धा तास बघ्याची भूमिका घेतली ह्यात नवीन काही नाही. फक्त असं करण्यात स्वत:ची कातडी बचावायाची एव्हढा स्वार्थच होता का 'ह्या बायकांना घरात राहून चूल आणि मूल करायला काय होतं? चांगली अद्दल घडली' अशी मानसिकता होती हे कळायला मार्ग नाही. मला आश्चर्य वाटलं ते ह्या गोष्टीचं की बायकाही ह्या बघ्यात सामील झाल्या. पायातल्या चपला काढून त्या प्रवाश्यांच्या झिंजा धरून त्याला उभा-आडवा बडवून काढायला त्या का पुढे सरसावल्या नाहीत? एखाद-दुसरीला जमलं नसतं पण दहा-पंधरा जणी एकत्र आल्या असत्या तर त्या प्रवाश्याला चांगला खरपूस मार पडला असता आणि परत हे असं करायची त्याची हिम्मत झाली नसती हे नक्की. एकीने जरी धाडस करून पाउल पुढे टाकलं असतं तर बाकीच्या लगेच पुढे आल्या असत्या. पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधायला कोणी तयार होत नाही हेच खरं. :-(

No comments: