नव्या वर्षाचं पाहिलं पोस्ट आणि तेसुध्दा मराठीतून! हम्म, हा मातृभाषेचा अभिमान म्हणायचा का दुराभिमान? दुराभिमान नक्कीच नाही. कारण मला इंग्लिश आवडते, हिंदी आवडते - विशेषत: तिचा दुसर्यांना आदर देऊन बोलायचा लेहेजा. आता मी हिंदी बोलताना दुसर्याला 'आप' म्हणत असले तरी अजूनही माझं हिंदी बरचसं 'बंबैय्या' आहे हेही तितकंच खरं :-) मुंबईत रहात असल्याने गुजराती बोलता येत नसलं तरी बोललेलं बऱ्यापैकी कळतं (काठीयावाडी वगैरे नसेल तर!) खरं तर एक भारतीय आणि एक विदेशी भाषा शिकायची हा निश्चय करून अनेक वर्षं झाली. विदेशी भाषेत का कोणास ठाऊक पण मला स्पेनिश शिकायची आहे. आणि भारतीय भाषेत बंगाली - ह्याचं कारण मात्र रविंद्रनाथ टागोर आणि इतर बंगाली लेखकांचं साहित्य मूळ बंगालीतून वाचायची इच्छा हे आहे. एखादी तरी दाक्षिणात्य भाषा शिकायला हवी हे खरंय. एक शिकली की बाकीच्या दाक्षिणात्य भाषा शिकणं थोडं सोपं जातं हेही ऐकलंय. पण ती एकच दाक्षिणात्य भाषा शिकायची हे काम कठीण वाटतंय. :-(
देवा! निदान ह्या वर्षी तरी माझ्या ह्या भाषा शिकायच्या निर्णयाची अंमलबजावणी होऊ देत :-)
Monday, January 2, 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment