Wednesday, August 31, 2011
गणपती बाप्पा मोरया! :-)
यंदा मुंबई, ठाणे व नवी मुंबईत गणेशोत्सवातील कर्णकर्कश आवाजाला रोखण्याचे काम ‘आवाज’ ही स्वयंसेवी संस्था करणार आहे.
गणरायाच्या स्वागताचा अख्खी मुंबापुरी सज्ज झालेली असताना या महाउत्सवावार घातपाती कारवायांचे सावट पडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे.
गणेश आगमनाच्या मिरवणुकीत खड्डे अडथळा ठरू नयेत यासाठी युद्धपातळीवर ते बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
काय दिवस आलेत बघा. बाप्पा येताहेत ह्याची चाहूल ह्या बातम्यांनी मिळते आजकाल. :-(
पण तरी मी खूश आहे. आज सकाळी ऒफ़िसात येताना बाजारात झेंडूच्या फ़ुलांच्या माळा तयार करणारे लोक दिसले. भाजीच्या टोपल्यातून डोकावणारी हिरवीगार हळदीची आणि केळीची पानं दिसली. ठिकठिकाणच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात तयारीची लगबग चालू आहे. काही ठिकाणी पडदे ओढून ठेवलेत तिथे आत बाप्पा आधीच येऊन बसले असणार ह्याची खात्री आहे. त्यामुळे ह्या वर्षी ते कसे दिसत असतील ह्याची खूप उत्सुकता आहे. डिजिकॆमची बॆटरी चार्ज करून ठेवायला हवी. :-)
बाप्पा, आम्ही तयार आहोत, येताय ना?
(बाप्पाचा फ़ोटो लोकसत्ताच्या साईटवरून घेतला आहे)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment