Monday, July 11, 2011

कानडा हो विठ्ठ्लू!

आज आषाढी एकादशी! तसं माझं आणि उपवासाचं कधी जमलं नाही. उपवास म्हटला रे म्हटला की मला जास्त भूक लागते. त्यातून शेंगदाणा असं नुस्तं म्हटलं तरी पित्ताने डोकं जड झाल्यासारखं वाटतं. मुंबईत विठूरायाचं देऊळ नाही असं नाही पण ’कशासाठी, पोटासाठी’ करणायां माझ्यासारख्यांना तिथे जायला वेळ पाहिजे ना? त्यामुळे कसली एकादशी आणि कसलं काय! पण वेळ मिळाला तर संध्याकाळी धिंगाणाच्या साईटवर काही अभंग ऐकता आले तरी सार्थक होईल. बाकी वारी वगैरे ह्या जन्मी तरी नशिबात असेल असं नाही वाटत. असो. जसं त्याच्या मनात असेल तसं. बोलावलंच त्याने तर तोच व्यवस्था करेल प्रवासाची. तोवर इथूनच विठूनामाचा गजर - पुंडलिकदा वरदे हरि विठ्ठल!

No comments: