Friday, April 8, 2011
आज दुबईच्या एका मैत्रिणीचा फ़ोन आला होता. ती एक आठवड्यासाठी फ़ोटोग्राफ़ीच्या वर्कशॊपसाठी लडाखला चालली आहे. तिचं कौतुक वाट्लंच पण मनात विचारही आला ’आपल्याला कधी असं जायला मिळणार?". पण ह्या वेळी ठरवलंय की तिच्याकडून सगळे डिटेल्स घ्यायचे आणि जायचंच. फ़क्त कॆमेराच्या नावाने बोंबाबोंब आहे. माझा लाडका पेन्टेक्स किती वर्षांपासून कपाटात धूळ खात पडलाय. किती वेळा ठरवते की तो नीट करून आणता येतो का ते पहायचं. पण त्याची काय अवस्था झाली असेल ह्या विचारानेच पोटात धस्स होतं आणि मग मी त्याला हातच लावत नाही. माझी बिचारी मैत्रिण म्हणालीसुध्दा की पुढच्या वेळी हवं तर येताना तुझ्यासाठी कॆमेरा घेऊन येईन. पण मी तिला नको म्हटलं. मला माझा जुनाच कॆमेरा नीट करून हवाय. पाहू कधी योग येतो ते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment