Tuesday, January 25, 2011
पंडित भीमसेनजी जोशी गेले. :-( खरं तर मला शास्त्रीय संगीताचा कान नाही त्यामुळे गॊडीही नाहीच. पण काही वर्षांपूर्वी षण्मुखानंदमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्यांना ऐकायचा योग आला होता. अगदी पंढरीत असल्यासारखं वाटलं होतं. असा योग पुन्हा येणार नाही ह्याची खंत आयुष्यभर राहिल. कालच iPod विकत घ्यायचा निर्णय घेतलाय. त्यात भजनांचा वेगळा फ़ोल्डर करायचं पक्कं केलंय आता. पंडितजी नाहीत तरी त्यांचा आवाज आपल्यासोबत राहिल ही देवाची कमी कृपा नाही. पुनर्जन्म असलाच तर पंडितजी पुन्हा पंडितजी म्हणूनच भारतात जन्माला यावेत ही देवाकडे प्रार्थना.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment