Wednesday, December 22, 2010

एक चित्ता सिगरेट फ़ुंकत होता. एक उंदीर येऊन म्हणाला "माझ्या बंधू, सोड ही नशा, माझ्यासोबत ये, बघ हे जंगल किती सुंदर आहे. ये, जग पाहू"
चित्त्याने विचार केला आणि उंदरासोबत निघाला.

पुढे त्यांना एक हत्ती ड्रग्ज घेताना दिसला.
उंदराने सुरुवात केली "माझ्या बंधू, सोड ही नशा....."
हत्तीसुध्दा उंदरासोबत निघाला.

पुढे एक वाघ व्हिस्कीचा पेग बनवत होता. उंदीर त्याला तेच म्हणाला.
वाघाने ग्लास बाजूला ठेवला आणि उंदराच्या ५-७ कानाखाली वाजवल्या.

हत्ती अवाक होऊन म्हणाला "अरे, उंदीर चांगलंच सांगतोय की. का मारलंस बिचायाला?"

वाघ म्हणाला "हा जेव्हा जेव्हा भांग पितो, तेव्हा असंच बोलतो. ३ वेळा पूर्ण जंगल फ़िरून आलोय मी ह्याच्याबरोबर" :-)

No comments: