Friday, September 10, 2010
गणपती बाप्पा मोरया!
आज महाराष्ट्रात कुठेही गेलात तरी तुम्हाला हेच शब्द ऐकायला येतील. गेल्या काही दिवसांपासून अवघा महाराष्ट्र ज्या दिवसाची डोळ्यात तेल घालून वाट पहातोय तो दिवस उद्यावर येऊन ठेपलाय. बाप्पा येताहेत - नेहमीप्रमाणेच वाजतगाजत, एका हातात मोदक घेऊन, दुसर्या हाताने भक्तांना आशिर्वाद देत. घरोघरी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी तर झाली आहेच पण गल्लीगल्लीतले मंडपसुध्दा सजलेत. आता अनंतचतुर्दशीपर्यंत आम्हाला दुसरं काही सुचायचंच नाही. बाप्पांची कितीही रुपं पाहिली तरी मन भरायचं नाही. आरत्या म्हणून म्हणून घसा बसेल पण उत्साह कमी व्हायचा नाही. त्याला त्याच्या मुक्कामी पोचवायला जाताना नेहमीसारखंच रडू येईल. आणि मग पुन्हा एकदा चहूबाजूंनी जयघोष होईल - गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या. :-)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment