सकाळपासून बॉलिवूडमधली तीच ती गोकुळाष्टमीची गाणी ऐकून डोकं उठलंय. ह्या लोकांना दरवर्षी बडवायला मिळावी म्हणून तरी गीतकार आणि संगीतकार ह्यांनी गोकुळाष्टमीची नवी गाणी आगामी चित्रपटात आणावी अशी नम्र विनंती आहे :-)
मला मात्र आज सकाळपासून शाळेत असताना व्हायचा तो दहीहंडीचा कार्यक्रम आठवतोय. पांढर्याशुभ्र लोण्याचा भलामोठा गोळा हातात घेतलेली, डोक्याला मोरपीस लावलेली आणि गालाला खळ्या पाडत हसणारी गोबर्या गुटगुटीत बालक्रृष्णाची छबी आज सकाळपासून डोळ्यापुढे आहे. मुलांनी हंडी फोडली की त्याचे तुकडे उचलायला एकच झुंबड उडायची. ते तुकडे म्हणे फ्रीजमध्ये ठेवले की दह्यादुधाची कधी ददात पडणार नाही अशी समजूत होती. अश्या समजुतींवर विश्वास ठेवणारं वय आणि भोळं मन कधीच निघून गेलंय. :-( पण बालक्रृष्ण मात्र लाडका होता, आहे आणि असणार आहे.
हाथी घोडा पालखी, जय कन्हैयालालकी! :-)
Thursday, September 2, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment