Tuesday, April 27, 2010

स्म्रृतिचित्रे - लक्ष्मीबाई टिळक

किती दिवसांपासून स्म्रृतिचित्रे वाचायचं म्हणत होते. पण दर खेपेला लायब्ररीत गेले की दुसरंच पुस्तक घेऊन यायचे. मागल्या आठवड्यात मात्र पक्कं केलं की आज स्म्रृतिचित्रे आणायचं म्हणजे आणायचं. समोर कुठे दिसलं नाही म्हणून अटेन्डन्टला खास सांगून काढून घेतलं.

वाचायला सुरुवात केली आणि मग काही पानांनंतर लक्षात आलं की हे पुस्तक आपल्याच्याने वाचलं जाणार नाही. लक्ष्मीबाईंच्या वडिलांचा विचित्र स्वभाव (सोवळ्याचा अतिरेक नसून बहुतेक ज्याला आजकालच्या भाषेत OCD म्हणतात तसलं हे काहीतरी असावं), नंतर सासर्‍यांचा तापटपणा (बायकोला लाथ मारणारा हा नवरा!), मग खुद्द त्यांच्या नवर्‍याचा व्यवहारशून्यपणा (मिळालेले पैसे लोकांना देऊन टाकणे, बायकोच्या माहेरी जाऊन रहाणे), त्यांचा तापटपणा (गर्भार बायकोला जिन्यावरून ढकलून देणे) हे सगळं वाचणं असह्य होऊ लागलं. तरी नेटाने वाचत राहिले. पण मग डोकं दुखणं, चिडचिड सुरू झालं. मनाची कित्ती समजूत घालायचा प्रयत्न केला की हे सगळं १९ आणि २० व्या शतकातलं आहे पण त्रास व्हायला लागला.

शेवटी लायब्ररीत जाऊन पुस्तक परत केलं आणि दुसरं घेऊन आले. मला नाही वाटत की पुन्हा हे पुस्तक वाचायचा मी प्रयत्न करेन. :-(

No comments: