Monday, December 28, 2009

मागच्या आठवडयात टिटवाल्याच्या गणपतीला जाउन आले। अनेक वर्ष जायचं मनात होतं पण योग आत्ता आला। सुट्टी असल्याने गर्दी होती। कुठल्याही धार्मिक ठिकाणी आजकाल ती गृहीत धरूनच जायला लागतं। रांग शिस्तीत आणि चटकन पुढे सरकत होती ही समाधानाची बाब। त्यातही काही बायका जोरजोरात भजन गाउन डोकं उठवत होत्या। :-(

गाभार्यात गेल्यावर सिध्दिविनायकाला गेल्यासारखे वाटले। पुजार्याची घाई, आरडाओरडा, धक्काबुक्की, हातातली फुलं देवापर्यत पोचवायला करावी लागणारी कसरत - जीव उबून गेला। देवाच्या दर्शनाच समाधान पदरात पडायच्या आधीच हरवल। तिथे एक विठ-रखुमाईच मंदिर आहे हे वाचल होतं। पण तिथे जायला मन तयार होईना। शेवटी मनातच विठ-रखुमाईला नमस्कार करून निघालो। :-(

No comments: