Friday, August 21, 2009

बाप्पा, तुम्ही येणार येणार म्हणताना आता तुमचं आगमन दोन दिवसांवर आले। :-) तुमच्या मंगलचरणांच्या नुसत्या चाहुलीने स्वाईन फ्लूने काढता पाय घेतलाय. आता एक क्रृपा आणखी करा. येताना तुमच्याबरोबर वरुणराजाला घेऊन या. यंदा आमच्यावर रुसलाय तो. चूक आमचीच आहे म्हणा. झाडं तोडून पर्यावरणाची वाट आम्हीच लावली आहे. त्याला का दोष द्यायचा? तरी एव्हढी चूक पोटात घाला बाप्पा. येताना पाऊस घेऊन या. मग भले तुमच्या दर्शनाला आम्हाला छत्र्या घेऊन उभं रहायला लागू देत.

लवकर या. आम्ही सगळे आतुरतेने वाट पहातोय. :-)

No comments: