आज आषाढी एकादशी ! सकाळी सकाळी मुंबइतल्या रस्त्यावरून विठुच्या दर्शनाला निघालेल्या वारकर्यांच्या दिंड्या पाहिल्या आणि वाटलं आपण कधी जाणार पंढरपुरच्या वारीला - घाटात पाउस अंगावर घेत, झेंडे नाचवत, विठुनामाचा गजर करत, देवाचे पाय कधी दिसतात ह्याची वाट पाहात आणि अन्तिम मुक्कामाइतकाच प्रवासाचा आनंद घेत....
क्षणभर मन खंतावतं पण मग लगेच लक्षात येतं देवाचे पाय दिसायला त्याचं बोलावणं यावं लागतं। ते येई पर्यंत थान्बावंच लागतं। म्हणून इथुनच विठू-रखुमाईला दण्डवत आणि जयजयकार - पुंडलिकवरदे हरी विठ्ठला, श्री द्यानदेव तुकाराम!
No comments:
Post a Comment