Friday, December 11, 2015

व्हॉटसेप वर एक व्हिडीओ पाठवला होता कोणीतरी. परदेशातलं कुठलं तरी शहर. त्यातल्या रस्त्यावर प्लास्टीकचा छोटा हाडाचा सांगाडा लीलया नाचवणारा कोणी अनाम कलाकार. दाद द्यावी असं, नव्हे, आपल्या नकळत दाद जाईल अशी हुकमत. तो सांगाडा तो कसा नाचवत होता देव जाणे. निदान मला तरी कुठे दोर दिसले नाहीत. बहुतेक चुंबकाचा उपयोग केला असावा. मस्त टाळी वाजवावीशी वाटली आणि मग लक्षात आलं की अरे, आपली टाळी त्याला ऐकू जायची सोय नाहीये. :-( अचानक मीना प्रभूंच्या रोमवरच्या पुस्तकातले केवळ लेखिका प्रेक्षक असताना सुरेख खेळ दाखवणारा म्हातारा आणि खेळ दाखवूनसुध्दा फार गल्ला जमला नाही म्हणून निराश होणारा असे दोन्ही कलाकार आठवले. कोणीतरी फॉरवर्ड केलेल्या मेसेज मधले 'हुनर सडकोंपर तमाशे करता है' हे शब्द आठवले आणि आतून खूप निराश व्हायला झालं. :-(

No comments: