Sunday, December 6, 2015

लोकसत्तात दिवाळी अंकांचं परीक्षण दरवर्षी इतक्या उशिरा का देतात कोणास ठाऊक. ते वाचून मग अंक शोधायला जावा तर कुठेच मिळत नाही. मला 'उत्तम अनुवाद', 'दर्यावर्दी' आणि 'ऋतुरंग' असे ३ अंक हवे आहेत. मागल्या आठवड्यात तिन्ही अंक कुठेही उपलब्ध नव्हते. शुक्रवारी संध्याकाळी स्टेशनबाहेरच्या पेपरवाल्याकडे सहज म्हणून डोकावले. खरं तर देवानेच बुद्धी दिली म्हणायची. कारण मागच्या आठवड्यात त्यानेही नन्नाचा पाढाच लावला होता. पण शुक्रवारी चक्क 'उत्तम अनुवाद' दिसला त्याच्याकडे. मी लगेच झडप घालून उचलला. विचारलं तर म्हणाला की आजच आलाय. म्हटलं आणखी काही येणार आहेत का तर कुठले हवेत अशी विचारणा झाली. मोगेम्बो खुश हुआ! लगेच 'दर्यावर्दी' आणि 'ऋतुरंग' हवेत म्हणून सांगून टाकलं. आता उद्या-परवा विचारते.

No comments: