कधी कधी मला काय वाटतं माहीत आहे? मी एक पिढी आधी जन्माला यायला हवं होतं. ५० ते ७० च्या दशकातल्या हिंदी सिनेमातली गाणी मला खूप आवडतात. त्या सिनेमाच्या साध्यासरळ सोप्या, काहीश्या भाबड्या वाटणार्या कथा भावतात. सिनेमा म्हणजे नुसती तीन तासांची करमणूक नाही तर त्यातून समाजाला काहीतरी शिकवण मिळाली पाहिजे असं मानणारे दिग्दर्शक त्या काळात होते ह्याचं आश्चर्य वाटतं. दु:खीकष्टी, निराश मनाला उभारी देणार्या चाली तेव्हाच्या संगीतकारांना कश्या सुचल्या असतील ह्याचं कुतुहल वाटतं. जवळजवळ अर्धा शतक उलटून गेलं तरी तेव्हाच्या गाण्यांच्या ओळी आत्ताही सच्च्या वाटतात. म्हणूनच हे सिनेमे कसे बनले असतील ह्याची उत्सुकता वाटते.
ह्या उत्सुकतेपोटी अभिजीत देसाईंचं "'शिणेमाच्या स्टोरी'मागील गोष्ट" वाचायला आणलं आणि खजिना हाती आल्याचा आनंद झाला. मुगल-ए-आझम, प्यासा, पाकिजा, मदर इंडिया, गाईड, संगम पासून ते शोलेपर्यतच्या १०-१५ सिनेमाच्या निर्मितीबाबतच्या सुरस कथा ह्यात आहेत. एका दमात सर्व पुस्तक वाचायचा मोह कोणालाही व्हावा. एव्हढी सगळी माहिती त्यांनी जमवली तरी कशी ह्याचं कौतुक वाटत रहातं. :-) ह्या लेखकाची बाकीची पुस्तकं मिळवून मी वाचणारच आहे.
५० ते ७० च्या दशकातले हिंदी सिनेमे हा तुमचा weak point असेल तर हे पुस्तक नक्की वाचा असंच मी सांगेन. :-)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment