Monday, October 3, 2016

काल ग्रोसरी स्टोअर मध्ये खरेदी करताना तिथे काम करणारे तीन कर्मचारी आपापसांत बोलत होते - २ बायका आणि एक पुरुष. संवाद असा झाला:

महिला नं. १: (पुरुषाकडे पाहून) कसलं रे रिमांयडर?
पुरुष: आजचं संध्याकाळचं...सैराट चं.
महिला नं. १: आज आहे?
पुरुष: हो
महिला नं. २: सैराट क्या है?
महिला नं. १: मला तो पिक्चर बघितला की काय वाटतं माहीत आहे?
पुरुष: मुव्ही है....आप मराठी में बात कर सकते हो ना?
महिला नं. २: हां....पर तुम्हे पता है ना मै मुस्लीम हु
पुरुष: मग मराठीत बोला ना
महिला नं. १: मला तो पिक्चर बघितला की काय वाटतं माहीत आहे? इथे येणाऱ्या सगळ्यांना मारावं.

हा संवाद ऐकून मनात अनेक प्रश्न आले. पण मी आपलं सामान घेतलं आणि चेकआऊट काउंटरच्या दिशेने चालू पडले कारण मी बोलणाऱ्यांचे चेहेरे पाहिले नव्हते. बहुतेक ते गंमतीने एकमेकांशी बोलत असावेत. पण तरी वाटलंच तसं नसेल तर? समाजात जे चाललंय ते पिक्चरमध्ये दाखवलं जातं ते बरं आहे नाहीतर असं काही होतंय हे कळलंसुध्दा नसतं - हे बरोबर आहे. पण असं माहीत झाल्यावर त्याचे उफराटे परिणामसुध्दा होऊ शकतात त्याचं काय करायचं?

No comments: