दिवाळी
होऊन २ महिने होत आले तरी
घेतलेल्या अंकांपैकी एकही
वाचायचा मुहूर्त लागला नव्हता.
तो मागच्या
आठवड्यात लागला.
तेव्हा आधी
लोकसत्ताचा अंक वाचून काढायचं
ठरवलं.
नेहमीच्या
शिरस्त्याप्रमाणे आधी यादी
आवडलेल्या लेखांची.
प्रथम उल्लेख
करावा लागेल तो 'काश्मीर:
आरपारची लढाई'
ह्या महेश
सरलष्कर ह्यांच्या रिपोर्ताजचा.
आजकाल काश्मीरबद्दल
बरंच काय काय ऐकू
येतं. त्यात
'काश्मिर
हा भारताचा अविभाज्य भाग आहे'
हे वाक्य नेहमीचंच.
त्यातून आपलं
सर्वांचं इतिहासाचं ज्ञान
म्हणजे 'अगाध'
ह्या एकाच
शब्दाने वर्णन करता येण्यासारखं.
ह्या अज्ञान
आणि गैरसमजाच्या धुक्याला
एखाद्या लेझरबीमसारखा हा लेख
छेदत जातो. काश्मीर
भारतात 'सामील'
झालं ही समजूतच
मुळात कशी चुकीची आहे,
तिथल्या
पंडितांच्या स्थलांतराचा
मुद्दा नेमका काय आहे
आणि ह्या प्रश्नाला कसे
वेगवेगळे पैलू आहेत हे समजून
घ्यायची इच्छा असणाऱ्या
साऱ्यांनी हा लेख वाचणं अतिशय
गरजेचं आहे.
'मेडिसिन
मर्चंट्स' हा
मृदुला बेळे ह्यांचा लेख
बहुराष्ट्रीय फार्मा कंपन्या,
त्यांचे रिसर्च
आणि औषधांच्या किमती ह्या
सर्व बाबींवर प्रकाश टाकतो.
व्होटसएपच्या
माध्यमातून मला कोणीतरी हा
फोरवर्ड केला होता.
पण तो इतका
प्रबोधक आहे की मी पुन्हा
संपूर्ण वाचला.
‘जागतिकीकरण
आणि उजवी लाट' हा
विशाखा पाटील ह्यांचा लेख
हुकुमशाहीकडे वाटचाल करणाऱ्या
जगातल्या देशांबद्दल चांगली
माहिती देतो. अर्थात
मोदीभक्तांनी तो वाचायच्या
भानगडीत पडू नये हेच उत्तम.
सामान्य
मराठी माणसाप्रमाणे तुम्हीही
नाटकवेडे असाल तर 'तिसरी
घंटा घणघणतेय' हा
कमलाकर नाडकर्णी ह्यांचा,
‘प्रायोगिक
रंगभूमीची वळणे'
हा माधव वझे
ह्यांचा आणि 'दिग्दर्शकाची
रंगभूमी' हा
विजय केंकरे ह्यांचा लेख वाचणं
इज अ मस्ट. काय
ताकदीचे नट/नट्या
आणि नाटकं पूर्वी होऊन गेले
हे वाचून अचंबा वाटतो.
तसंच हे आपल्याला
पाहायला मिळालं नाही ह्याची
फार चुटपूटही लागते.
'मनातल्या
वाफ्याची कहाणी'
हा विजय पाडळकर
ह्यांचा लेख दिग्दर्शक इंगमार
बर्गमनची, प्रशांत
कुलकर्णींचा लेख अमेरिकन
व्यंगचित्रकार गेरी लार्सनची
आणि वीणा गवाणकर ह्यांचा लेख
इस्त्रायलच्या गोल्डा मेयर
ह्यांची सुरेख ओळख करून देतात.
गवाणकरांचं
ह्यावरचं आगामी पुस्तक वाचायला
हवं. देशोदेशीच्या
खाद्यसंस्कृतीमध्ये झालेल्या
बदलांवरचा सचिन कुंडलकर
ह्यांचा लेख काही वेगळे विचार
मांडतो. ‘काही
पाने' ही
आसाराम लोमटे ह्यांची कथा
आवडली पण मध्येच संपल्यासारखी
वाटली. ‘डेटा
सायन्स' ह्या
विषयात गम्य असल्याने संहिता
जोशींचा 'विदा:
आजचं सोनं'
हा लेख आवडायला
हवा होता. पण
'डेटा'
ह्या शब्दाला
'विदा'
हा पर्यायी
मराठी शब्द अजिबात पटला नाही.
तरी गुगलला
आपल्याविषयी सर्व माहिती होऊ
नये म्हणून त्याला चकवायला
अधूनमधून अजिबात आवड नसलेल्या
विषयांवर उगाच सर्च करायची
कल्पना आवडली मला.
ती अंमलात नक्कीच
आणेन. त्यासाठी
लेखिकेचे आभार.
विवेक शानभाग
ह्यांची 'कारण'
आवडली पण शेवटी
एखादा ट्वीस्ट असेल असं वाटलं
होतं त्यामुळे थोडी निराशा
झाली. शफाअत
खान ह्यांची 'डेरिंग
मंगताय' आवडली.
त्यामानाने
राजेश्वरी देशपांडे आणि नागराज
मंजुळे ह्यांचे ‘राजकारणावर
आधारलेले मराठी चित्रपट’
ह्या विषयावरचे लेख फारसे
आवडले नाहीत.
देशपांडेंचा
लेख तर अतिशय विस्कळीत वाटला.
‘इमिटेशन गेम'
वरचा महेंद्र
दामले ह्यांचा आणि ‘अभिव्यक्तीच्या
आधाराची काठी' हा
अभिजित ताम्हणे ह्यांचा असे
दोन्ही लेख सुरुवातीलाच
इंटरेस्टीन्ग न वाटल्याने
पूर्ण वाचले नाहीत.’आनंदात
घाबरलेपण' ही
श्याम मनोहर ह्यांची कथा झेपली
नाही. लेखकाला
काय सांगायचंय हे कळलंच नाही
मला. ग्रामीण
भागातलं, विशेषत:
शेतकरी समाजाचं,
दु:ख
आजकाल रोज वर्तमानपत्रातून
आपल्यापर्यंत पोचतं.
एक सामान्य
नागरिक असल्याने आपल्याला
त्याबद्दल काही ठोस करता
येण्यासारखं नसतंच.
उगाच मानसिक
त्रास होतो. त्यामुळे
'चपाटा'
ही कथा वाचली
नाही.
सारांश
काय तर सुरुवात चांगली झालेली
आहे. वाचनासाठी
योग्य अंक निवडल्याचं समाधान
काही वेगळंच असतं.
:-)
No comments:
Post a Comment