हा अंक मी आधीच्या दिवाळीत घेतला होता की नाही ते आता आठवत नाही. पण मेजेस्तिक बुक दालनात अंक बघायला गेले असताना हा दिसला, इंटरेस्टिंग वाटला म्हणून विकत घेतला. अंकासोबत एक छोटी बाटली होती त्यात काही बिया दिसत होत्या. अंक वाचायला घेतला तेव्हा त्याचा उलगडा झाला. बाटलीत ५ प्रकारच्या बिया दिलेल्या होत्या - अश्वगंधा, आवळा, गुंज, आपटा आणि बहावा. पैकी सध्या अश्वगंधा आणि बहावा लावायचं ठरवलं आहे.
तरआता अंकाबद्दल. भवतालचे अंक पर्यावरण ह्या विषयाशी निगडीत असतात. ह्यावेळचा अंक 'देवराई' ह्या विषयावर. देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेलं जंगल. ह्या देवराईतली फुलं, फळंच काय पण जमिनीवर पडलेल्या काटक्यासुध्दा कोणी घरी न्यायच्या नाहीत असा पूर्वापार चालत आलेला दंडक. अर्थात आजच्या युगात तो पाळला जातोय क्क्चीतच. अंकात देशोदेशीच्या देवराया, त्यातली वनस्पती, प्राणी, पक्षी ही विविधता, तिथली देवळं, देवरायांबद्दल प्रचलित कथा, देवरायांचं मानवी जीवनाच्या बाबतीत असलेलं अनन्यसाधारण महत्त्व, त्यांची सध्याची भारतातली स्थिती, ती सुधारण्यासाठी होत असलेले प्रयत्न ह्याविषयीचे लेख अंकात आहेत.
खरे तर हे सगळेच लेख खूप माहितीपूर्ण आणि वाचनीय आहेत. पण मला खास आवडलेले लेख म्हणजे देशोदेशीच्या देवराया, भारतवर्षातील देवराई साम्राज्य, सह्याद्रीतल्या देवराया, सांस्कृतिक वारसा, लोककथा, समृद्ध वनश्री वारसा, प्राणी-पक्षी वैभव, पुरातत्त्वीय वैभव, देवाडोहाचं वास्तव, एक तरी राई अनुभवावी आणि देवराई डायरी.
ह्या अंकातून भटकंतीची खूप ठिकाणं सापडली. बोन्दीर (सोनाळचा म्होबाचो गुणो परिसरातून म्हादई ओलांडून करंझोळमधल्या काजरे घाटीमार्गे कृष्णापूरला जाताना डाव्या बाजूला लागतं), साटेरी , कोदाळ आणि दरोडे गावातल्या देवराईतली साटेरी, केलबाय, ब्राह्मणी ही मंदिरं, कुडशेच्या देवारेतली गडल्क्ष्मी, पर्गे (बेळगाव-पणजी ह्या चोलीघाटमार्गे जाणाऱ्या रस्त्यावर वाटेत लागतं) गावातल्या सातेरी मंदिराचे अवशेष आणि ब्राह्मीलिपीतला पुरातन शिलालेख, कोपार्डेच्या (सत्तरी ह्या उत्तर गोव्यातल्या तालुक्याचं वाळपई ह्या मुख्यालयापासून ३ किमी अंतरावर) ब्राह्मणीमायेची देवराई नेत्रावळी अभयारण्यात येणाऱ्या सांगेतल्या वर्ले गावातली भूपपान्न (जलमी देव मंदिराचे अवशेष, सप्तलिंगेश्वर, वेताळ आणि अश्वारूढ पाईक देवांच्या मूर्ती), पाईका पान्न, सिया पुरुष पान्न, काणकोणमधल्या गावडोंगरीत सातुरली इथे पापकाची मूर्ती असलेली पान्न, तायडे (तांबडी सुर्लाच्या महादेव मंदिराकडे जाताना डावीकडे जाणाऱ्या रस्त्यावर)मधल्या ब्राह्मणी रास मधल्या महिषसूर मर्दीनीच्या मूर्ती, खाचकोण (साकोर्डाला जायच्या वाटेवर डाव्या बाजूला) मधली देवराई, खोतोडे ग्रामपंचायत क्षेत्रातल्या शेळप-बुद्रुक गावाची देवराई, हेवाळे (तिळारी खोर्यात नदीच्या डाव्या बाजूला) मधली सातेरीती देवराई, ह्याच खोर्यातल्या केर, मोर्ले, घोटगेवाडी, परमे गावातल्या देवराया, हनुमंतगडाच्या पायथ्याशी असलेल्या फुकेरी घारपीतल्या देवराया, पारगड किल्ल्याजवळच्या वाघोत्रे गावातली राई, संगमनेर जवळच्या पेमगिरी किल्ल्यातला मोठा वटवृक्ष, आजरा तालुक्यातल्या शिरसिंगे इथला गोठणदेव, चंदगडमधली इब्राहमपुरची जैन मंदिरं, चांदूर (अमरावती) इथलं पिराबाबाचा तरोडा हे ठिकाण. खरं तर ही सगळी ठिकाणं कुठे आहेत काही माहित नाही पण शोधून काढेन आणि जाऊन येईन एव्हढं नक्की.
देवराईबद्दल इतकं वाचलंय तर एकापेक्षा जास्त देवराया अनुभवायच्याच हे ठरवलंय :-)

No comments:
Post a Comment