ह्याही पुस्तकाबद्दल खूप ऐकलं होतं. म्हणून आवर्जून लायब्ररीत ते माझ्यासाठी काढून ठेवायला सांगितलं होतं. पण पुस्तक पाहिल्यावर माझी प्रतिक्रिया म्हणजे 'हा पुस्तकाचा पहिला भाग आहे का?’ पुस्तक काढून देणारी सहाय्यक मुलगी गोंधळली. ‘नाही हो, हे एकच पुस्तक आहे'. ‘हे एव्हढंच?’ मी चकित. पण ते पुस्तक फक्त ८०-८५ पानांचंच होतं हे खरं. पुढे पुस्तकाची प्रस्तावना वाचताना लक्षात आलं की माणूस नावाच्या मासिकाच्या दिवाळी अंकात हंसा वाडकर ह्यांचा एक लेख प्रसिध्द झाला होता. तो आणि पुढे त्याच मासिकात प्रसिद्ध झालेले काही लेख एकत्र करून हे आत्मचरित्र बनवलं आहे. ७०व्या दशकाच्या सुरुवातीला ह्यात भर घालायचं असं ठरलं आणि हंसाजींनी सुध्दा उत्साह दाखवला होता पण त्यांची प्रकृती भिघडली आणि मग काही वर्षांतच त्यांचं निधन झालं म्हणून ते काम होऊ शकलं नाही. रसिकांच्या दृष्टीने हे फार वाईट झालं पण नियतीपुढे इलाज नाही. असो.
लेख जोडून केलेलं पुस्तक असल्याने ह्यात टिपिकल आत्मचरित्रात आढळतो तो सुबकपणा किंवा रेखीव मांडणी नाही. जसं आठवलं तसं ते लिहिलं गेल्याचं जाणवतं. माझ्या पिढीला हंसाजींचं फक्त नाव ऐकून माहित. नाही म्हणायला 'भूमिका' मधली स्मिता पाटीलची व्यक्तिरेखा त्यांच्या जीवनावर बेतली आहे असं वाचलं होतं. पण तो चित्रपट काही पाहिलेला नाही. त्यामुळे त्यांचं लहानपण, चित्रपटसृष्टीतला प्रवेश, तिथे आलेले नानाविध अनुभव, तिथली काम करायची पध्दत ही सगळी माहिती नवी होती. अर्थात पुस्तकात बरेच प्रश्न अनुत्तरीत राहिले. उदा. लेखिका जोशी नावाच्या त्या गृहस्थाबरोबर त्यांच्या गावी का गेल्या? त्या magistrate च्या घरात त्यांनी आरडाओरडा का नाही केला? अर्थात ह्यात काही लपवण्याचा हेतू नसून केवळ लेखात अत्यावश्यक तेव्हढीच माहिती आल्यामुळे हे सर्व राहून गेलं असावं हे जाणवतं. हंसाजींना अधिक वेळ मिळाला असता तर ह्या प्रश्नाची उकल झाली असती. पुस्तकात फार फोटो नाहीत ही एक उणीव वाटते. निदान लेखांचं पुस्तकात रुपांतर करताना ते समाविष्ट करायला हवे होते असं वाटतं.
पुस्तक वाचून हे प्रकर्षाने जाणवतं की हंसाजींनी जे लिहिलं आहे ते अगदी प्रांजळपणे लिहिलंय. आपले पती आपल्याला समजून घेऊ शकले नाहीत ही खंत व्यक्त करतानाच कदाचित मी त्यांना समजून घेऊ शकले नसेन हे त्या मोकळेपणाने कबूल करतात. कुठेही कुठलाही कडवटपणा न येऊ देता जे घडलं ते तसंच्या तसं सांगणारं हे आत्मचरित्र म्हणूनच वाचायला हवं.

No comments:
Post a Comment