सकाळपासून वेगवेगळया ग्रुप्सवर मेसेज यायला सुरुवात झाल्यावर आज गुरुपौर्णिमा असल्याचं कळलं. त्या निमित्ताने आजवर भेटलेल्या सगळ्या शिक्षकांचं स्मरण करावं म्हणून बसले तर किती जण आठवले.
तसं पहायला गेलं तर चालायला आणि बोलायला शिकवणारा पहिला गुरु म्हणजे आईच. मग रूढार्थाने शिवाजीपार्कच्या समोर असलेल्या बालमोहनच्या छोट्या शाळेपासून माझं शिक्षण सुरु झालं. तिथे शिशुवर्गातल्या वासंतीताई आणि बालवर्गातल्या सुलभाताई आठवतात. पुढे मोठ्या शाळेत गेल्यावर पहिलीच्या शकुंतलाताई रांगणेकर, दुसरीच्या नर्मदाताई राजाध्यक्ष, तिसरीच्या प्रतिभाताई करंदीकर, चौथीच्या भारतीताई नवलकर, पाचवीच्या अनघाताई राजिवडेकर, सहावीच्या शैलाताई परळकर अश्या वर्गशिक्षिका आठवतात. दहावीला वर्गशिक्षिक मराठे सर होते. पण सातवी ते नववी च्या वर्गशिक्षिका नीट आठवत नाहीत हे अनाकलनीय आहे खरं. मराठीच्या खळेबाई, इंग्लिश-संस्कृत शिकवणाऱ्या कामतबाई, सायन्स आणि भूमिती घेणाऱ्या चौधरी बाई, ऑफ तासाला हॉरर गोष्टी सांगून आमची टरकावणारया शामाताई ह्यांच्यापैकी तिघी असणार हे नक्की. बाकीचे अनेक शिक्षक आठवले - गाण्याचे तास घेणाऱ्या दिपाताई आणि कुमुदताई (अजूनही अंबेचा जोगवा वाचला की त्यांची आठवण होते), छोटे आणि मोठे सावे सर, कार्यानुभव शिकवणारे एक सर (ह्यांचा चेहरा आठवतो पण दुर्दैवाने नाव काही केल्या आठवत नाहीये), फिजिकल ट्रेनिंगचे पापल सर, सविताताई, आणखी अजून एक उंच बाई होत्या (ह्याम्चाही चेहरा आठवतो पण नाव आठवत नाही), भूगोल शिकवणाऱ्या सावेबाई, हिंदीचे तास घेणाऱ्या परुळेकर बाई, मराठी शिकवणाऱ्या चौबळबाई, चौथीत असताना 'ही गोज, शी गोज' असं करतकरत इंग्लिशशी ओळख करून देणाऱ्या भटबाई, नाईक सर आणि नाईक बाई, हिंदीचे तास घेणाऱ्या किल्लेदार बाई, दसऱ्याला सुरेख अक्षरात फळ्यावर माहिती लिहिणारे दाभोळकरसर (हे गेल्याचं काही महिन्यांपूर्वी कळलं). शिवण हा प्रकार मला कधीच जमला नाही पण ते शिकवणाऱ्या दोन शिक्षिका मला अजूनही आठवतात. चित्रकला हा विषयसुध्दा नावडताच. त्यातून 'हैथोर, सुबेक' अश्या इजिप्शियन देवांबद्दल आम्हाला तेव्हा का शिकवत होते कोणास ठाऊक. पण ते शिकवणारे राजाध्यक्षसर होते. काही शिक्षक-शिक्षिकांना आम्ही दिलेली टोपणनावं आठवताहेत फक्त :-( दरवर्षी दसऱ्याला शाळेत जाते तेव्हा ह्यातलं कोणीतरी पुन्हा एकदा दिसावं असं नेहमी वाटतं.
शाळेच्या बाहेर क्लासेस् लावले होते त्यात सातवीच्या स्कॉलरशिपसाठी लावलेल्या क्लासचे रावलेसर, कोरगावकरसर आठवतात. नववी-दहावी साठी लावलेल्या आठ्यले क्लासचे गोडसेसर, मराठी शिकवणाऱ्या विजुताई पटवर्धन, आणखी एक बाई इंग्लिश शिकवायला होत्या त्यांचं नाव आठवत नाही, संस्कृत शिकवणारे आठल्येसर, गांधीसर आणि गांधीबाई. आठल्येसर गेले ते मला २-३ दिवसांनी कळलं. त्यांचं शेवटचं दर्शन घेता आलं नाही ही चुटपुट जन्मभर राहील. त्यांनी संस्कृतची खूप गोडी लावली होती. माझे किती पेपर्स त्यांनी न कंटाळता तपासले होते. अजूनही संस्कृत शिकावंसं वाटतं ह्याचं सारं श्रेय त्यांना.
पुढल्या काळात बारावीची तयारी करून घेणारे फिजिक्सचे पै सर, गणिताचे कारखानीससर आणि केमिस्ट्री शिकवणारे नाडकर्णीसर. रुपारेलला दोन वर्षं होते पण तिथले केमिस्ट्रीचे सोहोनी सर, चव्हाण सर, अल्जिब्रा शिकवणारया लोबो मॅडम आणि इलेक्ट्रॉनिकस शिकवणाऱ्या दोन मॅडम्स वगळता फारसं कोणी आठवत नाही. आठवीला जॉईन केलेल्या रेगे क्लासेस् मधलं तर कोणीच आठवत नाही. व्हीजेटीआयला मेकेनिक्स शिकवणारे जोशीसर, अय्यंगारसर, सिंगसर, कम्युनिकेशन्स शिकवणाऱ्या दोन मॅडम्स, इंजिनियरींग ड्रॉइंग शिकवणारे वेणूगोपाल सर असे काही शिक्षक अजून आठवतात. मजा अशी की लायब्ररीत बसलो आणि आमचा गलका खूप वाढला की तिथे काम करणाऱ्या एक मॅडम 'शेमलेस, टोटली शेमलेस' असं दटावायच्या हे अजून आठवतंय :-) फॉर्मल शिक्षणाचा शेवटचा टप्पा अर्थात आय.एस.बी मधले सी. रंगराजन, भगवान चौधरी, मार्क फिन, कृष्ण कुमार.
अगदी अलीकडच्या काळातले गुरुवर्य म्हणजे स्पॅनिश शिकवणाऱ्या गजाला मॅडम आणि मोडी लिपी शिकवणारे राजेश खिलारी सर.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ह्या सगळ्या शिक्षक-शिक्षिकांना मनापासून धन्यवाद. देव त्यांना आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो.

No comments:
Post a Comment