ह्या मालिकेच्या प्रत्येक एपिसोडच्या आधी एक डिसक्लेमर येतं. मला वाटतं त्यात आणखी एक वाक्य टाकायला हवं - ह्या मालिकेचा आणि इतिहासातल्या जोधा-अकबर ह्या व्यक्तींचा काहीही संबंध नाही. एव्हढी ही मालिका भरकटली आहे.
राजकन्या निगार आणि कोण ती महाचुचक (ह्या दोघी खर्याच होत्या का?) दोघींच्या सैन्याने अकबराच्या जनानखान्यावर हल्ला केला तो त्या बायांनी परतवून लावला म्हणे. एक जोधा सोडली तर बाकी कोणी आयुष्यात कधी लढल्या असतील असं वाटत नाही. पण रुकैय्याने धनुष्यबाण चालवलं. सलीमाबेगम तर मुलाला पाठीला बांधून झाशीच्या राणीसारख्या लढत होत्या. हे सगळं खोटं खोटं आहे हे कळत होतं तरी ते पहाताना आतून कुठेतरी बरं वाटत होतं ह्याचं मलाच आश्चर्य वाटलं. थोडा विचार केल्यावर लक्षात आलं की आजकाल समाजात स्त्रियांवरच्या अत्याचारांचं प्रमाण वाढलंय (ते कधी कमी होतं म्हणा!) आणि ते कमी करायला बायकांनी पुढे सरसावायला पाहिजे हे कळत असलं तरी नेमकं काय करायचं ते कळत नाहीये. कदाचित त्यामुळेच कदाचित ही लुटूपुटूची लढाई बघून बरं वाटलं असेल. :-(

No comments:
Post a Comment