सकाळी सकाळी ’शोर मच गया शोर’ च्या ठणठणाटाने जाग आली आणि आज दहीहंडी असल्याची जाणीव झाली. खरं तर कृष्णावरची कितीतरी हिंदी आणि मराठी गाणी आहेत. पण का कोणास ठाऊक, ह्या लोकांना ती आठवतच नाहीत. कदाचित माहितसुध्दा नसतील. ’अमर प्रेम’ मधलं ’बडा नटखट है रे’, शागिर्दमधलं ’कान्हा, कान्हा आन पडी मै तेरे द्वार’, ’जागते रहो’ मधलं ’जागो मोहन प्यारे’ आणि ’बुढ्ढा मिल गया’ मधलं ’आयो कहासे घनश्याम’. मराठीतली माणिक वर्मांची घननीळा लडिवाळा, सावळाच रंग तुझा, झालंच तर केशवा माधवा, आज गोकुळात रंग खेळतो हरी आणि ’वजीर’ मधलं ’सांज ये गोकुळी सावळी सावळी’......
कोट्यावधी रुपयांच्या हंड्या, थर लावताना पडून जखमी होणारे गोविंदा आणि अचकिट विचकट हातवारे करत नाचणारे लोक. :-( ह्या युगात ह्यांचंच निर्दालन करायला यावं लागेल तुला पुन्हा कृष्णा!
Monday, August 22, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment